Home » भारतात Wife Swapping ची प्रकरणे वाढली

भारतात Wife Swapping ची प्रकरणे वाढली

by Team Gajawaja
0 comment
Wife Swapping
Share

वाइफ स्वॅपिंग ही महानगरांमध्ये पड्याआड चालणाऱ्या लाइफ स्टाइलमधील एक नवा प्रकार आहे. याला खुल्या पद्धतीने स्विकार केले जात नाहीच पण तो पूर्णपणे नाकारले ही जात नाही. गेल्या काही दिवसांमध्ये केरळात वाइफ स्वॅपिंगच्या (Wife Swapping) एका रॅकेटचा भांडाफोड झाला होता. ज्यामध्ये ७ लोकांना अटक केली गेली. पोलिसांनी रिपोर्टमध्ये असे सांगितले की, ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांनी एक ग्रुप तयार करुन वाइफ स्वॅपिंगचा धंदा करायचे. मात्र अखेर त्यांचे सत्य समोर आलेच.

अशा प्रकारे बंगळुरुत ही वाइफ स्वॅपिंग प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली गेली. तसेच बीकानेर मध्ये वाइफ स्वॅपिंग पार्टीत जाण्यासाठी नकार दिल्याने एका व्यक्तीने आपल्या बायकोला बेदम मारहाण केली होती. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले तेव्हा समोर आले. या व्यतिरिक्त युपीतील मुजफ्फरनगर येथे सुद्धा असाच प्रकार समोर आला. त्यानंतर याबद्दल खुप चर्चा सुरु झाली आहे.

महानगर ते लहान शहरापर्यंत
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सध्या मोठ्या शहरांमध्ये हाय सोसायटी ते लहान शहरांमध्ये पत्नींची अदला-बदली केली जात असल्याचे फार ट्रेन्ड मध्ये आहे. रिलेशनशिप संबंधित काउंसिलिंग करणाऱ्या तज्ञ डॉ. इशिता मुखर्जी यांच्या मते वाइफ स्वॅपिंग आपल्या शहरातील कामकाजी लाइफ स्टाइल मधील एक कटू सत्य आहे. याला नकार दिला जाऊ शकत नाही.

तज्ञांच्या मते, अशी बहुतांश प्रकरणे समोर आली आहेत. सर्वसामान्यपणे दोन प्रकारचे केस असतात. एकामध्ये दोन्ही पार्टनरची सहमती असते. तर दुसऱ्यामध्ये एक पार्टनर यासाठी तयार नसतो. त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना ते करायला भाग पाडले जाते. बीकानेर मधील प्रकरण सुद्धा याच कॅटेगरीतील होता. येथे पत्नी तयार नव्हती म्हणून नवऱ्याने तिला मारहाण केली.

मेट्रो शहरांमध्ये २७ टक्के कपल्सचा समावेश
जवळजवळ एका दशकापूर्वी भारतीय नौसेनेच्या एका ज्युनिअर ऑफिसरच्या पत्नीने आपल्या पतीसह त्याच्या युनिट मधील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप लावले होते. तिने वाइफ स्वॅपिंगमध्ये सहभाग असल्याचे सांगितल्याने खळबळ उडवून दिली होती. एका सर्वेनुसार, भारतातील मेट्रो शहरांमध्ये जवळजवळ २७ टक्के कपल्स या गोष्टीत सहभागी आहेत.

सध्याचा काळ फार वेगाने बदलतोय. हायस्पीड इंटरनेने समाजाची दिशाच बदलली आहे. लोकांना सर्वकाही कमी वेळात मिळवायते आहे. हाय सोसायटी असो किंवा मीडल क्लास सर्वांना आपल्या आयुष्यात एक्स फॅक्टरचा शोध घ्यायचा आहे. रिलेशनशिप तज्ञांच्या मते काही लोक याला एक्स फॅक्टरचा शोधात असल्याचे म्हणतात. विवाहित कपल्स सुद्धा यामध्ये सर्वाधिक दिसतात. (Wife Swapping)

कशी झाली याची सुरुवात
असे सांगितले जाते की, दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. अमेरिकन फाइटर पायलट काही मोर्चांवरुन युद्ध करत होते. त्यांच्या बायका दररोज आपल्या फाइटर नवऱ्याला गुडलक किस देऊन जाऊ द्यायची. कारण तिला विश्वास नसायचा की रात्रीच्या वेळी ती त्याला किस करेल किंवा नाही.

अशाच स्थितीत फायटर पायलटांनी एका रात्री चेन पार्टीचे आयोजन केले. पार्टीत सर्व पायलटांनी आपल्या कारच्या चाव्या एका बॉक्समध्ये ठेवल्या, ज्या पायलटच्या हाती दुसऱ्या पायलटच्या कारची चावी हातात आली त्याने ती रात्र त्याच्या बायकोसोबत घालवली. त्यामुळेच असे म्हटले जाते येथून वाइफ स्वॅपिंगला सुरुवात झाली.

हे देखील वाचा- WhatsApp चॅट करण्याप्रकरणी महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक, सर्वेतून खुलासा

वाइफ स्वॅपिंग म्हणजे काय?
यामध्ये नवरा, बायको हे एकमेकांच्या सहमतीने पार्टनर बदलतात. त्याच्यामाध्यमातून ते आपल्या सेक्शुअल डिझायर पूर्ण करतात. एक दिन अथवा त्यापेक्षा अधिक दिवस ही गोष्ट केली जाऊ शकते. काही लोकांचे असे म्हणणे आहे की, यामुळे आयुष्यात एक नवी उर्जा येते. यामध्ये एक गोष्ट अशी की पार्टनर सोबत आपण चुकीचे करत आहोत याचे दु:ख नसते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.