‘लग्न’ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येत जेव्हा ती व्यक्ती लग्न बंधनात अडकते. सगळ्यांच्याच आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि मोठा टप्पा म्हणून लग्नाकडे पाहिले जाते. समजायला लागल्यानंतर आपण आपले लग्न कसे असेल?, आपण काय घालणार?, लग्न कसे करणार? आदी अनेक लहान मोठ्या सर्वच गोष्टींबद्दल विचार करून ठेवतो.
आपल्या भारत देशात विवाह अर्थात लग्न ही खूपच मोठी बाब मानली जाते. त्यातही हिंदू धर्मामध्ये लग्नाला अनन्यसाधारण महत्व आहे. लग्न आणि लग्नातील प्रत्येक विधी यामागे काहींना काही शास्त्र नक्की असते. लग्नात प्रत्येक विधी करताना गुरुजी त्या विधीमागील शास्त्र आणि इतिहास समजावून सांगतात. याच विधीमधील एक सर्वात महत्वाचा, खास आणि प्रत्येक मुलीच्या जवळचा विधी म्हणजे वधूच्या भांगेत कुंकू भरणे. विवाहित असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा म्हणजे भांगेत लावले जाणारे कुंकू. भारतात सौभाग्यवतीचे लक्षण म्हणून कुंकूकडे पाहिले जाते.
वधूच्या भांगेत कुंकू, सिंदूर लावतात. त्या दिवसानंतर प्रत्येक स्त्री लग्नानंतर कायमच सिंदूर लावताना दिसून येते. भांगेमध्ये कुंकू भरण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. जोपर्यंत एखाद्या महिलेचा पती हयात आहे, तोपर्यंत ती महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरते. मात्र या विधी मागे नेमके काय धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे? का वधूच्या भांगेत वर कुंकू भरतो? याने काय होते? आदी सर्वच प्रश्नांची आज या लेखातून आम्ही उत्तरं देणार आहोत.
हिंदू धर्मात लग्नामध्ये आणि लग्नानंतर महिला त्यांच्या भांगेमधे कुंकू लावतात. ही कुंकू लावण्याची परंपरा फार जुनी आहे. काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार महाभारत आणि रामायणातही भांगेत कुंकू लावण्याचा उल्लेख केलेला आढळतो. काही पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती देखील सिंदूर लावत असे.
याच कुंकुवाशी संबंधित रामायणातील एक आख्यायिका देखील प्रचलित आहे. असे सांगितले जाते की, एके दिवस माता सीता श्रृंगार करत असताना त्या त्यांच्या भांगेत कुंकू भरत होत्या, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हनुमानाने त्यांना विचारले, माते, तू भांगेत सिंदूर का लावत आहेस? टायव्हर सीता माता म्हणाल्या, भांगेत कुंकू लावल्यामुळे माझे आणि भगवान श्रीरामांचे नाते अधिक दृढ होईल आणि श्रीरामांना दीर्घायुष्य लाभेल. हे ऐकून हनुमानाने विचार केला की, जर फक्त एक चिमूटभर कुंकू भांगेत लावल्याने श्रीरामांना दीर्घायुष्य मिळू शकेल तर संपूर्ण अंगावर कुंकू लावल्याने ते अमर होतील. हाच विचार करून हनुमानाने आपल्या संपूर्ण अंगावर कुंकू लावून घेतले. यावरून हे देखील लक्षात येते की, भांगेत कुंकू लावायची परंपरा रामायण काळात देखील होती.
यासोबतच आपल्या मान्यतांनुसार जी महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भरते तिच्या पतीचे वाईट शक्तीपासून माता पार्वती रक्षण करते. तसेच त्याला दीर्घ आयुष्य प्रदान करते.
भांगेत कुंकू भरण्याचे वैज्ञानिक कारण देखील आहे. महिला आपल्या भांगेमध्ये कुंकू भारतात. कुंकू हे लाल असते. शास्त्रामध्ये लाल रंगाला शुभ मानले जाते. हे तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की, भांगेमध्ये भरण्यात आलेले कुंकू महिलांमधील सकारात्मकता वाढवते. या कुंकुवामुळे नकारात्मक शक्तींचा नाश होतो. सोबतच यामुळे महिलांच्या आरोग्याविषयक अनेक समस्या दूर होतात.
======
हे देखील वाचा : बिकिनी वॅक्स करताना कोणती काळजी घ्यावी?
======
महिलांनी भांगेत कुंकू लावण्याचे अजून एक कारण म्हणजे, कुंकवामध्ये बुध धातू आढळतो, जो ब्रह्मरंध्र ग्रंथीसाठी अत्यंत प्रभावी धातू मानला जातो. यामुळे महिलांना मानसिक ताण कमी होतो. भांगेत कुंकू लावल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.
शिवाय कुंकू हे हळद आणि लिंबापासून बनते. कुंकवाला महिला आपल्या भांगेमध्ये भरतात. त्यामुळे महिलांमधील तणाव दूर होण्यास मदत होते.कुंकू महिलांना अॅक्टिव ठेवण्यास मदत करते. ब्रम्हरन्ध्र आणि अध्मि नावाच्या मर्मस्थानाच्या बरोबर वर स्त्रिया कुंकू लावतात, ज्याला सामान्य भाषेत सिमान्त किंवा भांग म्हणतात. कुंकू हे हळदीपासून बनविले जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात. याशिवाय भांगात कुंकू भरल्यामुळे एकाग्रता वाढते आणि लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.