दिवाळी म्हणजे थंडीची चाहूल देणारा सण आहे. हिवाळा हा सगळ्यांचाच आवडता ऋतू आहे. आता हिवाळा म्हणजे कडाक्याची थंडी. आपल्याला आपल्या शरीराच्या फिटनेसची सुरुवात करायची असेल तर हिवाळा ऋतू एकदम योग्य आहे. मात्र या हिवाळ्यामध्ये थंडी वाजते म्हणून अनेक लोकं उशिरापर्यंत पांघरून घेऊन झोपतात. मम्त्र महिलांना कितीही थंडी वाजत असली तरी त्यांना कामासाठीच सर्वात आधी उठावेच लागते. पण सामान्यपणे आपण जर नीट निरीक्षण केले असेल तर आपल्या लक्षात येईल की, महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त थंडी वाजते. तसे पाहिले तर प्रत्येक व्यक्तीला कमी जास्त प्रमाणात थंडी वाजत असते. मात्र महिलांना कायम जास्तच थंडी वाजते. मात्र याचे नक्की कारण काय? (Winter)
स्त्रियांना आणि पुरुषांना कमी – जास्त प्रमाणात थंडी वाजते, यामुळे राहत्या खोलीचे तापमान किती ठेवावे असा प्रश्न प्रत्येक घरामध्ये असतो. अनेकदा तर हाच मुद्दा वादाचे देखील कारण ठरतो. पण जर आपण पाहिले तर तज्ज्ञांच्या मते स्त्रिया २५ डिग्री राहायला आवडते. तर पुरुषांना २२ अंश सेल्सिअस तापमानात राहायला आवडते. World Health Organization च्या नुसार, वृद्ध मुले लहान मुले घरात राहतात त्यामुळे राहत्या खोलीचे तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस ठेवावे. किंवा खोलीत सर्व तरुण पिढी राहत असेल तर खोलीचे तापमान १८ अंश सेल्सिअस ठेवावे. (Marathi News)
प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन सारखे हार्मोन्स रक्ताभिसरण आणि तापमान नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रोजेस्टेरॉन हे रक्तवाहिन्या आकुंचन करू शकते, ज्यामुळे हातपायांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो. हात आणि पायांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे थंडी वाजू शकते. चयापचय प्रक्रियेमुळे अर्थात मेटाबॉलिज्ममुळे अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर होते आणि या प्रक्रियेत उष्णता निर्माण होते.(Todays Marathi Headline)
महिलांचा चयापचय दर पुरुषांपेक्षा कमी असतो. याचा अर्थ त्यांचे शरीर कमी कॅलरीज बर्न करते आणि विश्रांतीच्या वेळी कमी उष्णता निर्माण करते. स्त्रियांच्या मेटॅबॉलिझम रेटवर थंडी वाजणे अवलंबून असते. शरीरातील मेटॅबॉलिजममुळे शरीरात उर्जेचे उत्पादन होते. डॉक्टरांच्या मते, पुरुषांपेक्षा महिलांचा मेटॅबॉलिक रेट कमी असतो म्हणजेच मेटॅबॉलिझम क्रियेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे महिलांना जास्त थंडी वाजते. (Top Marathi Headline)
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. ही चरबी उष्णता कमी होण्यापासून रोखण्यासाठी एक इन्सुलेटर म्हणून काम करते, परंतु स्नायूंसारखी उष्णता निर्माण करत नाही. शरीराचे स्नायू हे उष्णता निर्मितीचे मुख्य स्त्रोत आहेत. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा शरीराचे वस्तुमान कमी असते. याउलट पुरुषांच्या शरीरावर जास्त स्नायु असल्यामुळे त्यांना थंडी जास्त जाणवत नाही तर महिलांच्या शरीरावर कमी स्नायू असल्यामुळे थंडी जास्त जाणवते. (Latest Marathi News)
महिलांना जास्त थंडी लागण्याचे तिसरे कारण म्हणजे हार्मोनल इफेक्टस आहे. महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोन जास्त असतो. प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे उष्णता कमी निर्माण होते आणि थंडी जास्त लागते. महिलांच्या शरीराच्या आकारमानाच्या तुलनेत पुरुषांचा सरफेस जास्त असतो. याचा अर्थ त्या त्यांच्या सभोवतालची उष्णता जलद गमावतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान राखणे कठीण होते. (Top Trending News)
========
Dhanteras : जाणून घ्या धनत्रयोदशी या सणाचे महत्व
Diwali : धनत्रयोदशीला संध्याकाळी ‘हे’ उपाय करून लक्ष्मीला करा प्रसन्न
========
हिवाळ्यात थंडी वाजणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुम्हाला हिवाळ्यात थंडी जाणवत नसेल तर याचा अर्थ शरीरात काही समस्या आहेत. या उलट तुम्हाला जास्त थंडी जाणवत असेल, तर तेही आरोग्यासाठी घातक आहे. जर तुम्हाला सतत थंडी जाणवत असेल तर सावध राहण्याची गरज आहे, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics