Home » केरळमधील मंदिरांमध्ये फुलांवर बंदी का आली ?

केरळमधील मंदिरांमध्ये फुलांवर बंदी का आली ?

by Team Gajawaja
0 comment
Kerala Flower
Share

केरळमध्ये सध्या एका प्रकारच्या फुलांना आणि त्या फुलझाडाच्या पानांनाही मंदिरात बंदी घालण्यात आली आहे.  या फुलांचा वापर तेथील मंदिरात सजावटीसाठी, देवाला नैवेद्या अर्पण करतांना होणा-या पुजेसाठी होत होता.  तसेच त्यांची पानेही नैवेद्यासह देण्यात येत होती.  मात्र या फुलांना खाल्यामुळे काही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. (Kerala Flower)

कोची विमानतळावर याच फुलांची पाने चघळल्यानं एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तेव्हा केरळमधील मंदिरांमध्ये या फुलांना आणि पानांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक भाषेत या फुलांना अरळीची फुले म्हणतात. गुलाबी रंगाची आणि मंद सुवासाची ही फुले देवाच्या पुजेसाठी वापरली जातात. त्यांची पाने लांब सुईसारखी टोकदार असतात. या दोन्हींमध्ये असलेल्या द्रवामुळे मृत्यू होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. अर्थातच केरळमध्ये या फुलांना बंदी घातल्यानंतर वाद सुरु झाला आहे.  त्यामुळे या अरळीच्या फुलांची शास्त्रीय तपासणी करण्यात येत आहे.  (Kerala Flower)

Nerium oleander या फुलांना केरळमध्ये अरळीची फुले (Kerala Flower) म्हणतात.  गुलाबी रंगाच्या या फुलांना महाराष्ट्रात कणेर म्हणतात.  गुलाबी रंगाची ही फुले गुच्छानं झाडावर येतात. बहुतांशी ठिकाणी बगिच्यामध्ये ही झाडे लावली जातात.  अनेक गार्डनमध्ये ही कणेर मोठ्या प्रमाणात आढळते.  याच फुलांना केरळमध्ये बंदी घालण्यात आली आहे.  तेथे अरळीची फुले म्हणून प्रसिद्ध असलेली ही फुले काही महिलांच्या मृत्युला कारणीभूत ठरली आहेत.  या फुलांचा केरळमधील मंदिरात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. 

अनेकवेळा प्रसादासोबत ही फुले भक्तांना दिली जातात. बहुतांशी महिला मग ही देवाची फुले केसांत माळतात.  काहीवेळे ही फुले आणि गरम नैवेद्यामध्येही ठेवली जातात.  या फुलांसोबत त्यांची पानेही प्रसादाच्या द्रोणामध्ये असतात.  असेच एक पान चघळल्याने कोची विमानतळावर एका महिलेचा मृत्यू झाला. २४ वर्षीय ही महिला नोकरीसाठी दुबईला जात होती.  तिचा अचानक मृत्यु झाल्यानं एकच खळबळ उडाली.  याशिवाय केरळच्या अलाप्पुझा आणि पठाणमथिट्टामध्येही अशाच घटना समोर आल्या आहेत. (Kerala Flower) 

अलाप्पुझा येथील एका महिलेचा अरळीची फुले आणि पाने खाल्ल्याने मृत्यू झाला.  पाथनमथिट्टा येथे ऑलिंडरची पाने खाल्ल्याने गाय आणि वासरू मरण पावल्याची माहिती समोर आली आहे.  यामुळे मंदिर समितीने या अरळीच्या फुलांना आणि पानांनाही मंदिरातच प्रवेश नको, असे आदेश दिले आहेत.  ही फुले दिसायला अत्यंत सुंदर असतात.  त्यामुळे मंदिर परिसरात ही अरळीची फुलझाडे मोठ्या प्रमाणात आढळतात.  आता मंदिर समितीचा निर्णय आल्यावर यासर्वच झाडांना काढण्याचा विचार करण्यात येत आहे. (Kerala Flower)

केरळमधील प्रमुख असलेल्या त्रावणकोर देवस्वामी बोर्ड (TDB) आणि मलबार देवस्वामी बोर्डानेही या अरळीची फुलांवर बंदी घातली आहे.   देवाच्या पुजेसाठी फक्त तुळस, चमेली, गुलाब अशीच फुले वापरावीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.  मलबार देवस्वोम बोर्डाच्या अखत्यारीत १४०० हून अधिक मंदिरे आहेत.  या सर्वच मंदिरात अरळीची फुले बंद करण्यात आली आहेत.  

या मंदिरानं केलेल्या तपासणीत या फुलांमध्ये विषारी अंश असल्याचे स्पष्ट झाले आहे.  मात्र त्रावणकोर आणि कोचीन देवस्वोम बोर्डातर्फे अद्यापही अशी बंदी नसल्याचे सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी अरळीची फुलांची पूर्णपणे वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी केली आहे.  या संदर्भात अहवाल आल्यावरच अरळीची फुलांना आणि पानांना आपण बंदी घालू असे या मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.  अरळीच्या फुलांचा विशिष्ट असा हंगाम नसतो.  सर्वच ऋतुंमध्ये ही फुले उपलब्ध असतात. त्यामुळे या फुलांचा वापर मंदिरात करण्यात येतो.  

============

हे देखील वाचा : चारधाम यात्रेमध्ये हवामानाचा अडसर

============

दरम्यान केरळमधील काही डॉक्टरांनीही अरळीची फुले विषारी असतात, असे स्पष्ट ले आहे. या फुलामधील अल्कलॉइड्स थेट हृदयावर परिणाम करते.  तर पानाच्या देठाच्या आत आढळणाऱ्या लेटेकमध्ये अल्कलॉइड्सची उपस्थिती खूप जास्त असते.  त्यामुळे त्याच्या अगदी छोट्या अंशाचाही शरीरावर लगेच परिणाम होतो, असे सांगण्यात आले आहे. अर्थात या सर्वांवर आता संशोधन सुरु आहे.  पण काळजी म्हणून सर्वानीच या फुलांपासून आणि पानांपासून दूर रहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.