आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. मग भलेही ते सण लहान असला काय किंवा मोठा असला काय. आपल्याकडे सण हा सण असतो. त्यात लहान मोठे असे काही नसते. आता लवकरच अक्षय्य तृतीयेचा सण येत आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीय साजरी केली जाते. या दिवसाला आपल्या पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. (Akshaya Trutiya)
अक्षय्य तृतीयेला स्वयंसिद्धी मुहूर्त असेही म्हटले जाते. साडे तीन मुहूर्ता पैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या या दिवशी अनेक शुभ कामं केली जातात. अनेक मोठमोठी खरेदी देखील केली जाते. मात्र अनेक मोठमोठ्या महागड्या वस्तू खरेदी करताना या दिवशी मीठ नक्की खरेदी करावे असे सांगितले जाते. किंवा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही खरेदी केली नाही तरी चालेल मात्र मीठ नक्की खरेदी करावे. मग असे का सांगितले जाते? या दिवशी मीठ खरेदी करण्यामागे नक्की कोणते शास्त्र आहे? चला जाणून घेऊया. (Akshaya Trutiya and Salt Purchasing)
अक्षय्य तृतीयेलाही मीठ खरेदी करण्याची फारच जुनी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेला मीठ खरेदी करून दान केल्याने आपल्यावरील सर्व संकटे दूर होतात आणि सर्व त्रासांपासून आराम मिळतो अशी श्रद्धा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मीठ दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी केले जाते. (Marathi )
मात्र अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या रोजच्या साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ खरेदी करणे अधिक शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेला सैंधव मीठ खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेले मीठ बाथरूममध्ये काचेच्या भांड्यात ठेवल्याने वास्तुदोष दूर होऊ शकतात. शिवाय हे मीठ तुम्ही स्वयंपाकात देखील वापरू शकता. (Top Marathi News)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते आणि मानसिक शांती मिळते. घरामध्ये मीठाच्या पाण्याने फारशी पुसल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी केल्यानंतर ते मीठ घराभोवती टाकावे, असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी मीठ खरेदी करण्याची ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करणे ही एक सांस्कृतिक परंपरा बनली आहे, जी लोक अजूनही लोकं मनापासून पाळतात. (Top Trending News)
=======
हे देखील वाचा : Singapore : कशा असतात सिंगापूरच्या शाळा !
=======
अक्षय्य तृतीयेला मीठ खरेदी करणे ही केवळ एक परंपरा नाही तर ती समृद्धी, सकारात्मकता आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठीची इच्छा दर्शवते. या दिवशी मीठ खरेदी करून, लोक त्यांच्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी प्रार्थना करतात. अक्षय्य तृतीयेला तुम्ही सोने – चांदी खरेदी करण्यासोबत थोडे मीठ खरेदी केले तर तुमच्या घरात नक्कीच त्याचा शुभ परिणाम दिसून येईल. (Akshaya Trutiya Marathi News)
मीठ, स्वयंपाकघरातील स्वस्त आणि महत्वाच्या घटकांपैकी एक आहे. जेवणातील मिठाची अनुपस्थिती लगेच आपल्या लक्षात येते आणि त्याची उपस्थिती अन्नाची चव वाढवते. अक्षय्य तृतीयेच्या या पवित्र दिवशी मीठ खरेदी करणे म्हणजे दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही मोठी खरेदी केली नाही तरी चालेल मात्र मीठ नक्कीच खरेदी करा.(Social Update)