Home » SantaClaus : ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज लाल रंगाचेच कपडे का घालतो?

SantaClaus : ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज लाल रंगाचेच कपडे का घालतो?

by Jyotsna Kulkarni
0 comment
SantaClaus
Share

ख्रिश्चन लोकांचा अतिशय महत्त्वाचा आणि वर्षातला सर्वात मोठा सण म्हणून ख्रिसमसला ओळखले जाते. संपूर्ण जगामध्ये हा सण अतिशय जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षी २५ डिसेंबरला दरवर्षी ख्रिसमस साजरा होतो. डिसेंबर महिना सुरू होताच सर्वत्र ख्रिसमसचे वारे वाहू लागतात. केक शॉप, रस्त्यांवर, मॉल्स, दुकानांमध्ये ख्रिसमसचे डेकोरेशन पाहायला मिळते. लाईट्स, स्टार्स, ख्रिसमस ट्री आणि लाल रंगाचा पोशाख घातलेल्या सांताक्लॉजचे चित्र किंवा पुतळे पहायला मिळतात. (Santaclaus)

लहानमुलांसाठी तर ख्रिसमस म्हणजे सांताक्लॉज. सांताक्लॉजची एक वेगळीच क्रेझ लहानमुलांमध्ये पाहायला मिळते. सांताक्लॉज म्हणजे हरणांच्या गाडीवरून फिरणारा वयस्कर पांढरीशुभ्र दाढी, पांढरे केस, डोळ्यांवर चष्मा, लाल रंगाचा ड्रेस घालून पाठीवर गिफ्ट्सने भरलेली मोठी बॅग घेऊन फिरणारा व्यक्ती. लहानमुलांमध्ये सांताक्लॉज खूपच लोकप्रिय आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने सांताक्लॉज मुलांना नानाविध प्रकारचे गिफ्ट्स, चॉकलेट, केक देतो, त्यांच्यासोबत खेळतो त्यामुळे मुलांना हा सांताक्लॉज खूपच आवडतो. (Marathi)

संत निकोलस यांना खरे सांताक्लॉज मानले जाते. त्यांना मुले आणि गरजू लोकांना मदत करणे आवडायचे. आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी संत निकोल नेहमीच अर्ध्या रात्री भेटवस्तू द्यायचे. एका गरीब माणसाकडे मुलींच्या लग्नासाठी पैसे नव्हते. ख्रिसमसच्या दिवशी मुलीने तिचे मोजे धुवून सुकवण्यासाठी टाकले होते, त्यांच्या मदतीसाठी संत निकोलस पोहोचले आणि मोज्यात सोन्याचे नाणे टाकून निघून गेले. तेव्हापासून भेट वस्तूसाठी मोजे टांगणे एक परंपरा बनली. (Todays Marathi Headline)

SantaClaus

पुर्वीच्या काळी संताक्लॉजचे कपडे कधी हिरव्या तर कधी निळ्या रंगाचे होते. युरोपीयन आणि अमेकिरन काही जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांमध्ये सांताक्लॉजची काही चित्रं नमूद केली आहेत. पुर्वीच्या काळी चर्चमध्ये असलेला सांताक्लॉज हा वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये असायचा असे या काही चित्रांमधून सिद्ध होते. काही अमेरिकन पुस्तकातील चित्रांनुसार सांताक्लॉजचे जाडसर लांबच्या लांब झगा, आणि वेगवेगळ्या रंगाचे जाडसर स्वेटर असा त्याचा लुक असायचा. आता हे पुस्तकातील चित्र म्हणजे कल्पनिक आहे की खरं याबाबत संभ्रम असला तरी असं म्हणतात की, सांताक्लॉजचे कपडे पुर्वी वेगवेगळ्या रंगाचे होते. (Top Marathi News)

दरम्यान १९३० च्या दशकाच्या सुरुवातीला कोका-कोला या प्रतिष्ठित अमेरिकन ब्रँडने ख्रिसमसची मोठी जाहिरात सुरू केली. हिवाळ्यात अमेरिका युरोपमध्ये बर्फ पडतो, पाऊस असतो अशा या थंड वातावरणात लोकं कोल्डड्रींक्स पिणे टाळायचे, पण हिवाळ्यातही लोकांनी कोका-कोला प्यावे अशी कंपनीची इच्छा होती. म्हणून त्यांनी ब्रँडकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी सांताची एक खास मैत्रीपूर्ण आणि थंडीत उबदारपणा जाणावा अशी इमेज तयार करण्याचे ठरवले. नंतर १९३२ मध्ये, कोका-कोलाने त्यांच्या जाहिरातींसाठी सांताक्लॉजची त्यांना अपेक्षित अशी प्रतिमा तयार करण्यासाठी हॅडन सनडब्लॉम नावाच्या कलाकाराला सांगितले. (Latest Marathi Headline)

सांताक्लॉज तयार करताना सनडब्लॉमने कार्टूनचा आधार न घेता हा सांता खरा वाटावा यासाठी मॉडेलसची निवड केली. हा सांता काल्पनिक नाही तर लोकांना आपला वाटावा आणि त्याच्याबद्दल प्रेम वाटावं अशी यामागची भावना होती. या कलाकारने सांताला आनंदी, हसरा, मानवी चेहरा आणि चमकदार लाल कोटसह बनवले. लाल रंग कोका-कोलाच्या ब्रँडच्या रंगाशी जुळत होता, म्हणून तोच मुख्य रंग ठेवण्यात आला. प्रतिमा तयार करताना सनडब्लॉमने खऱ्या लोकांना मॉडेल म्हणून वापरले जेणेकरून सांता जिवंत आणि आधुनिक दिसू शकेल, जुन्या मिथकासारखा किंवा प्राचीन संतासारखा नाही. कोकाकोलाची ही जाहिरात खूप लोकप्रिय झाली आणि या दिवशी लोकांमध्ये लाल रंगाचे कपडे घालण्याचा ट्रेंड सुरू झाला असल्याचे देखील सांगण्यात येते. (Top Stories)

=======

Santa Claus : ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलांमध्ये गिफ्ट्स वाटणारा सांताक्लॉज नेमका आहे तरी कोण?

=======

याशिवाय लाल रंगाचे कपडे घालण्याबाबत एक गोष्ट सांगितली जाते की, १८२३ मध्ये क्लेमेंट मार्क मूर नावाच्या कवीने ‘अ व्हिजिट फ्रॉम सेंट निकोलस’ नावाची कविता लिहिली आणि याच कवितेच्या आधारे त्यांनी लाल कपडे घालण्यास सुरुवात केली असल्याचे देकील सांगण्यात येते. पण, या दिवसासाठी लाल रंगाचा कोणताही स्पष्ट इतिहास नसला तरी, ख्रिसमसच्या या प्रसंगी, लाल रंग आपल्याला आनंद, प्रेम आणि सांताच्या आदर्शाची आठवण करून देतो.  युरोपच्या अनेक भागांमध्ये ख्रिसमसच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पॅराडाईज प्लेचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकांत बागेतील नंदनवनाचे झाड लाल सफरचंदांनी भरलेले दाखवले आहे. जो अॅडमचे प्रतिनिधित्व करतो. त्याच वेळी, होली बेरी नावाच्या वनस्पतीचा रंग देखील लाल आहे जो ख्रिश्चन समुदायाच्या लोकांना खूप आवडतो. म्हणूनच सांताक्लॉज लाल रंगाचे कपडे घालून येतो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.