Home » Sports : खेळाडू मैदानावर च्युइंगम का खातात?

Sports : खेळाडू मैदानावर च्युइंगम का खातात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sports
Share

भारतात सर्वात जास्त प्रेम कोणत्या खेळावर केले जाते तर तो खेळ म्हणजे, क्रिकेट. क्रिकेट हा भारतीयांसाठी केवळ खेळ नाही तर श्वास आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतात क्रिकेट या खेळासाठी जी क्रेझ पाहायला मिळते, ती दुसऱ्या कोणत्याही देशात पाहायला मिळणार नाही. क्रिकेटचा एक ही सामना न चुकवणरे असंख्य लोकं आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. क्रिकेटचा सामना म्हटले की, टीव्ही समोर चिकटून बसणारे लोकं देखील बरेच आहेत. पण याच क्रिकेटमध्ये अशा अनेक लहान सहन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्या आपण दुर्लक्षित करतो, पण त्याच गोष्टींमागे मोठा अर्थ लपलेला असतो. (Sports)

जसे सांगायचे झाले तर आपण जेव्हा क्रिकेटचा सामना टीव्हीवर बघतो तेव्हा अनेकदा आपण पाहिले असेल की, खेळाडू मग तो गोलंदाज असो किंवा फलंदाज काहीतरी खात असतात. किंबहुना खेळाडू मैदानावर सतत च्युइंगम खात असतात. केवळ क्रिकेटर्सच नाही तर कोणत्याही खेळातील खेळाडू खेळताना च्युइंगम खात असतात. आपण खासकरून क्रिकेटर्सला अधिक नोटीस करतो. पण कोणत्याही खेळातील खेळाडू च्युइंगम खातात. पण खेळाडू मैदानावर असताना च्युइंगम का खातात? हा विचार आपण कधीच करत नाही. यामागे देखील एक खास कारण आहे कोणते ते पाहूया. (Todays Marathi Headline)

च्युइंगम एक माउथ फ्रेशनर नसून त्यामुले आरोग्याशी निगडीत फायदेही आहेत. रिसर्चनुसार, च्युइंग गममुळे आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. च्युइंग गम फॅशन म्हणून चघळली जात नाही, असं शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. च्युइंग चघळत बसल्याने मन एकाग्र होतं. तसेच मेंदुला चांगल्या प्रकारे चालना मिळते. ऐन टेन्शनच्या सामन्यात पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यास मदत मिळते. च्युइंग गम खाता तेव्हा त्याची चव आपण घेत असतो. त्यामुळे चवीची ओळख करणारी रिसेप्टर आणि जबड्याचे मसल्स मेंदूला सिग्नल पाठवतात. त्यानंतर मेंदू यावर काम करण्यास सुरुवात करतो. (Top Marathi News)

Sports

च्युइंगम चघळताना तोंडातील चव रिसेप्टर्स आणि जबड्याचा दाब मेंदूला सतत सिग्नल पाठवतो. मेंदू या सिग्नलवर सतत प्रक्रिया करतो. यामुळे मेंदू सतर्क राहतो आणि तपशीलांवर अधिक लक्ष केंद्रित करतो. वाढत्या क्रियाकलापामुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो, ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो. यामुळे हृदयाचे ठोके जलद होतात. जलद हृदय गती स्नायूंमध्ये रक्त प्रवाह देखील वाढवते. च्युइंग गम केवळ मेंदूला लक्ष केंद्रित करत नाही तर रक्त प्रवाह वाढल्याने खेळाडूंना त्यांचा खेळ चांगला करण्यास मदत होते. (Latest Marathi HEadline)

खेळताना च्युइंग गम चघळल्याने मैदानात पूर्णपणे अलर्ट राहाता येते. तसेच तोंडाचा व्यायामही होतो. त्याचबरोबर दातात अडकलेलं अन्नक बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे दातही स्वच्छ राहतात. तोंडाच्या इतर आजारापासूनही सुटका होते. च्युइंग गम वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे भूक शमते आणि कॅलरीज कमी करण्यास मदत होते. च्युइंग गम खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होते. च्युइंग गम दिवसभरात ११ कॅलरी प्रति तास कमी करण्याची क्षमता ठेवते. त्याचबरोबर तोंडात मोठ्या प्रमाणात लाळ तयार होत असल्याने पचनशक्तीही चांगली राहते. (Top Trending News)

========

Skin Care : त्वचेला येईल 10 मिनिटांत ग्लो, टोमॅटोच्या रसाचा असा करा वापर

========

दरम्यान च्युइंगम खाल्ल्यामुळे फॅट बर्न होते. काही लोकांच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणात फॅट असते. त्यामुळे हनुवटी डबल दिसू लागते. तुम्ही जर सतत च्युइंगम चघळत असाल तर, तुमच्या तोंडाची हालचाल सतत होते. त्यामुळे जबड्याला व्यायाम मिळतो. परिणामी चेहऱ्यावरील कॅलरीजचे प्रमाण कमी होते. शिवाय जर तुमच्या दातांवर पिवळसरपणा अधिक प्रमाणात असेल तो कमी करण्यासाठी च्युइंगम महत्त्वाची भूमिका बजावतो. सतत च्युइंगम चघळल्याने तोंडावाटे येणाऱ्या दुर्घंधीपासून सूटका होते. तुम्ही जर दररोज च्युइंगम चघळत असाल तर, तुमची पचनव्यवस्थाही सुधारते. मात्र लक्षात ठेवा च्युइंगम केवळ १० ते २० मिनिटांपर्यंतच खाणे योग्य असते. यापेक्षा जास्त वेळ ते तोंडात ठेवल्यास त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.