Home » पेट्रोलियमला काळं सोनं असे का म्हटले जाते?

पेट्रोलियमला काळं सोनं असे का म्हटले जाते?

by Team Gajawaja
0 comment
Black gold
Share

जगातील कोणत्याही देशात पेट्रोलिमचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. पेट्रोलियम हे जमिनीच्या आतमध्ये एका लिक्विड रुपात असते. त्यालाच आपण क्रूड ऑइल असे म्हणतो. पण ज्या देशात क्रूड ऑइल आढळते त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा हा एक महत्वाचा भाग मानला जातो. जेव्हा क्रूड ऑइल जमिनीतून बाहेर काढले जाते तेव्हा त्याचा रंग हा काळा असतो. यापासून विविध प्रकारचे इंधन तयार केली जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, पेट्रोलियमला काळं सोनं (Black gold)) का म्हटले जाते? जाणून घेऊयात याबद्दलच अधिक.

नैसर्गिकरित्या क्रूड ऑइल हे काळ्या रंगाचेच असते. त्यावर काही प्रक्रियाकरुन ते शुद्ध केले जाते. त्यामुळे क्रूड ऑइलचा रंग पिवळा होतो आणि ते सोन्याच्या रंगासारखे दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारात याला खुप मागणी आणि किंमत ही असते. क्रूड ऑइलच्या सहाय्याने पेट्रोल, डिढेल आणि अन्य इंधन तयार केली जातात. काही देशांकडून क्रूड ऑइलची आयात केली जातात. मात्र यासाठी त्या देशांना मोठी रक्कम द्यावी लागत असल्यानेच त्याला काळं सोनं असे म्हटले जाते.

हे देखील वाचा- G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी दिल्या खास भेटी… वाचा कोणाला काय दिले? 

Black gold
Black gold

तर सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराक, कुवैत आणि कॅनडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेलाची निर्मिती केली जाते. येथील अर्थव्यव्था वाढणे किंवा कमी होण्याच्या बाबत तेलाची महत्वपूर्ण भुमिका असते. जगभरातून तेलाची मागणी केली जात असल्याने या देशांचा जगातील अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय संबंधत कायम टिकवून ठेवण्यात महत्वाची भुमिका असते. सध्याच्या काळातत पेट्रोलियम पदार्थांचा वापर हा उर्जा निर्माण करण्याच्या पर्यायाच्या आधारावर केला जात आहे. जसे की, पेट्रोल आणि डिझेल. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलवर होते.पण जेव्हा पेट्रोल आणि डिझेल महाग होते तेव्हा गोष्टीही महाग होतात. दरम्यानन क्रूड ऑइल हे २०२१ मध्ये सर्वाधिक निर्यात करण्यात आलेली दुसरी महागडी गोष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या २-३ वर्षात याचा थेट परिणाम आपण पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर पाहिला आहे.(Black gold)

दरम्यान, पेट्रोलियम हे लाखो वर्षांपासन जे कार्बनिक पदार्थ किंवा जैव पदार्थाचे विघटन झाल्यानंतर तयार होते. तर ज्या प्रमाणे सोन्याच्या किंमतीत दररोज बदल होतो. त्याचनुसार पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत ही दिवसागणिक बदलत असतात. परंतु पेट्रोलियम व्यतिरिक्त खाद्यपदार्थात मोडणाऱ्या अफीमला सुद्धा काळं सोनं म्हटले जाते. अफीमचे नाव आपण ऐकून आहोत आणि तो एक अंमली पदार्थ आहे. याचा उपयोग भारतात केला जात नाही कारण यावर देशात बंदी घालण्यात आली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.