भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार होते. पितामह जमदग्नि आणि माता रेणुका यांचे चौथे पुत्र होते. परशुराम यांना तीन मोठे भाऊ सुद्धा होते. परशुरामांनी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरुच आपल्या आईचा वध केला होता. याच कारणास्तव भगवान परशुराम यांना मातृ हत्येचे पाप सुद्धा लागले. भगवान शंकराची तपस्या केल्यानंतर ते आपल्या आईची हत्येच्या पापातून मुक्त झाले. मात्र परशुरामांनी असे करण्यामागील काय कारण होते की, त्यांना आपल्या आईचा वध करावा लागला.(Parshuram killed mother)
कथा अशी आहे की, एक दिवस गंधर्वराज चित्ररथ हा अप्सरांसोबत नदीच्या तटावर विहार करत होते. त्याचवेळी परशुराम यांची आई रेणुका हवन करण्यासाठी जल घेण्यासाठी नदीच्या तटावर आल्या. गंधर्वराज आणि अप्सरांमधील क्रिडा पाहण्यात ऐवढ्या धुंद झाल्या की, हवन करण्यासाठी आपण जल आणण्यासाठी आलो आहोत याचा विसर त्यांना पडला आणि त्या जल घेऊन पोहचल्या नाहीत. हवन करण्याची वेळ निघून जात असल्याने ऋषि जमदग्नि हे माता रेणुकावर खुप क्रोधित झाले. त्यांचा क्रोध ऐवढा होता की, त्यांनी आपल्या मोठ्या पुत्राला आपल्याच आईचा वध करण्याचे आदेश दिले. मात्र मोहाचा कारणास्तव त्यांनी असे केले नाही. अशाच प्रकारे जमदग्नि यांनी आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पुत्राला सुद्धा आईचा वध करण्याचे आदेश दिले. मात्र त्या दोघांनी ती गोष्ट करण्यापासून माघार घेतला. यावर जमदग्नि यांनी त्यांना त्यांची विचार करण्याची क्षमता नष्ट होईल असा श्राप दिला. परंतु परशुराम यांनी आपल्या वडिलांचे म्हणणे ऐकले आणि आपल्याच मातेचा वध केला.(Parshuram killed mother)
हे देखील वाचा- कठीण काळात खंबीर उभे राहण्यासाठी चाणाक्यांची ‘ही’ सुत्रे ठेवा लक्षात

परशुराम यांना न्यायचा देवता मानले जायचे. कारण ते आपल्या माता-पित्यांचे आज्ञाधारी पुत्र होते. तरीही त्यांनी आपल्या आईचे शीर कापले. आपला पुत्र परशुराम यांने आज्ञेचे पालन केल्याने जमदग्नि हे अत्यंत खुश आणि प्रसन्न झाले. त्यावेळी जमदग्नि यांनी परशुरामांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा परशुरामांनी आपल्या वडिलांकडे ३ वर मागितले. परशुरामांनी पहिले वरदान असे मागितले की, आई पुन: जिवीत होऊ दे. दुसरा वर त्यांनी तिला मरणाची स्मृती न राहू दे असे म्हटले आणि तिसरा वर असा मागितला की, भावंडांची क्षमता पुन्हा येऊ दे. यावर जमदग्नि यांनी परशुरामांचे तिन्ही वचन पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला.