Home » 1941 And 2025 : बापरे…1941 या वर्षाची तुलना का होत आहे !

1941 And 2025 : बापरे…1941 या वर्षाची तुलना का होत आहे !

by Team Gajawaja
0 comment
1941 And 2025
Share

7 डिसेंबर 1941 या दिवशी सकाळी जपानी नौदलाच्या 177 विमानांनी हवाईतील ओआहू बेटावरील पर्ल हार्बर येथील अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला केला. याचवेळी बंदरात नांगरलेल्या अमेरिकन युद्धनौकांवर टॉर्पेडो डागण्यात आले. हा हल्ला एवढा मोठा होता की, त्यात 2700 सैनिक ठार झाले. 21 अमेरिकन युद्धनौका बुडाल्या. अमेरिकेच्या वर्चस्वाला याच दिवशी धक्का लागला. आणि अमेरिकेचा दुस-या महायुद्धात प्रवेश झाला. यानंतरच झालेला विनाश हा सर्वांनाच माहिती आहे. (1941 And 2025)

आता 84 वर्षानंतर या घटनेची आठवण येण्यामागेही एक धक्कादायक कारण आहे. कारण यापूर्वी 1941 हे सर्वात विनाशकारी आणि अपशकुनी वर्ष म्हणून ओळखलं गेलं. या वर्षात युद्ध, नैसर्गिक आपत्ती यांनी मोठ्या प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली. धक्कादायक म्हणजे, 1941 या वर्षात ज्या घटना झाल्या, त्या 2025 मध्ये होत आहेत. शिवाय आत्ताही जगावर तिस-या महायुद्धाचे ढग गडद झाले आहेत. इस्रायल-इराणमध्ये चालू असलेल्या युद्धामुळे तर अणुयुद्धाच्या छायेत अवघं जग आलं आहे. त्यामुळेच 1941 हे वर्ष चर्चेत आलं आहे. त्या वर्षासारखीच आपत्ती या चालू वर्षात येणार का अशी चिंता व्यक्त कऱण्यात येत आहे. (Latest News)

2025 वर्ष सुरु होण्याआधी या वर्षात येणा-या नैसर्गिक आपत्ती आणि युद्धजन्य परिस्थितीबाबत भविष्य येण्यास सुरुवात झाली होती. 2025 हे वर्ष सुरु झाल्यावर त्याची प्रतिची यायला लागली. मात्र बरोबर 84 वर्षापूर्वी या वर्षातील घटनांसारख्याच घटना होऊन गेल्या आहेत. ते वर्ष होतं 1941. हे वर्षही सर्वाधिक युद्धाचं वर्ष म्हणून ओळखलं गेलं. 22 जून 1941 रोजी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला. 14 ऑगस्ट 1941 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट आणि ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी अटलांटिक चार्टरवर स्वाक्षरी केली. यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. याच वर्षात जपानने आग्नेय आशियात आपला प्रभाव वाढवला. याचे परिणामही युद्धात बदललेल गेले. याशिवाय नैसर्गिक आपत्तीनंही 1941 हे वर्ष भीतीदायक ठरलं. 26 जून 1941 रोजी अंदमान बेटांवर 7.7 ते 8.1 तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे प्रचंड विनाश झाला. 15 आणि 16 फेब्रुवारी 1941 रोजी स्पेनमधील सँटान्डर शहरात एका भयानक आगीने शहराचा मोठा भाग नष्ट केला. (1941 And 2025)

r

आता अशाच घटना 2025 मध्ये होऊ लागल्यानं या सर्वाची परिणामही मोठ्या विश्वयुद्धात होणार का अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण 2025 आणि 1941 या दोन्ही वर्षांचे कॅलेंडर अगदी सारखेच आहे. अगदी तारखा, दिवस, सगळं सारखं आहे. 1 जानेवारी 2025 पासून हा सारखेपणा सुरु होतो. 1941 या वर्षातील पहिला दिवसही बुधवारी होता, आणि 2025 चा पहिला दिवसही बुधवारी होता. हा योगायोग ग्रेगोरियन कॅलेंडर प्रणालीमुळे काही वर्षानंतर घडतो. मात्र या दोन वर्षातील घटनाही सारख्या होऊ लागल्यामुळे याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे, 1941 या वर्षात जपाननं पर्ल हार्बरवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर अमेरिकेनं दुस-या महायुद्धात प्रवेश केला आणि त्यानंतर जपानमध्ये मोठा विनाश झाला. जगानं अणुबॉम्ब म्हणजे काय, आणि त्याचा विनाश किती दाहक असतो, हे सुद्धा याच वर्षातील घटनांमुळे अनुभवलेलं आहे. (Latest News)

===========

हे देखील वाचा : Odisha : भगवान जगन्नाथाचे रहस्यमयी स्वयंपाकघर !

Jagannath Rathyatra : कधी आहे जग्गनाथ रथयात्रा? जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती

===========

आताही जवळपास तशीच परिस्थिती आहे. एकीकडे रशिया युक्रेनमधील युद्धाला अंत दिसत नाही. दुसरीकडे इस्रायल आणि इराणच्या युद्धात अणुउर्जा केंद्रांना लक्ष करण्यात येत आहे. इराणच्या नतांज या अणुउर्जा स्थळावर इस्रायलनं हल्ला केल्यामुळे तेथून रेडिएशन पसरत असल्याची धक्कादायक माहिती आहे. यामुळे मानवजातीला मोठा धोका होण्याची शक्यता आहे. याशिवाय 1941 मध्ये जसा अंदमानमध्ये विनाशकारी भूकंप झाला होता, तसाच 7.7 तीव्रतेचा भूकंप 28 मार्च रोजी म्यानमारमध्ये आला आहे. शिवाय याच वर्षात कॅलिफोर्नियाच्या जंगलांमध्ये मोठी आग लागून त्यात वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे. याच सर्व साधर्म्यामुळे 2025 आणि 1941 या वर्षांची तुलना करण्यात येत आहे. (1941 And 2025)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.