या सृष्टीचे संहारक म्हणून भगवान शंकरांना ओळखले जाते. प्रत्येक आठवड्याचा पहिला वार अर्थात सोमवार हा शिवाच्या आराधनेचा वार समजला जातो. या दिवशी शंकराची उपासना केली जाते. यासोबतच श्रावण महिना देखील भगवान शंकरांना समर्पित असा महिना आहे. या सर्व दिवशी शंकरांची पूजा अर्चना केली जाते. असे असले तरी दरवर्षी मग महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीचे महत्त्व औरच आहे. शंकरांच्या पूजेचा वर्षातला अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणून महाशिवरात्रीला ओळखले जाते. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो. यादिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसोहळा संपन्न झाल्याची मान्यता असल्याने हा दिवस विशेष मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त महादेवाची विधिवत पूजा करतात. (Mahashivratra)
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ अत्यंत प्रसन्न अवस्थेत असतात आणि असे ही म्हणतात, या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये भोलेनाथ निवास करतात. भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. या रात्री जागरण, भजन आणि कीर्तन याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला भाविक चार प्रहरांची विशेष पूजा आणि रुद्राभिषेकही करतात. यामुळे नकारात्मकात, अनिष्ट दूर होतात. (Marathi)
दरवर्षी माघ महिन्यामधील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते.तसं पाहिलं तर दर महिन्याला शिवरात्री येते, त्याला मासिक शिवरात्री आणि चतुर्दशी व्रत म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे वर्षभरात एकूण १२ शिवरात्री येतात. पण या सर्वांमध्ये माघ महिन्यातील शिवरात्री महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. अनेक शिवरात्रींच्या वर एक शिवरात्री असते, ती म्हणजे ‘महाशिवरात्री’. यावर्षी महाशिवरात्री १५ तारखेला साजरी करण्यात येणार आहे. महाशिवरात्र साजरी करण्यामागे अनेक कारणं आणि कथा सांगितल्या जातात त्या कोणत्या जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

शिवाचा प्रगट दिन
शिव पुराणानुसार, महाशिवरात्रीलाच महादेव पहिल्यांदा प्रकट झाले होते. खरे तर ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यावर मतभेद झाले होते. तेव्हा सर्वशक्तिमान शिव अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट आणि म्हणाले की, ज्याला त्यांची सुरुवात किंवा शेवट सापडेल तोच सर्वश्रेष्ठ आहे. दोघेही अयशस्वी झाले आणि देवाचे अस्तित्व त्यांना समजले. (Top Stories)
शिव-पार्वती विवाह
महाशिवरात्रीच्याच रात्री भगवान शिव पार्वतीचा विवाह झाल्याचे मानले जाते. देवी पार्वतीने भगवान शिवला प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. भोलेनाथ पार्वतीला म्हणाले की, त्यांनी एखाद्या राजपुत्राशी लग्न करावे कारण संन्याशासोबत राहणे सोपे नाही. पार्वतीच्या जिद्दीपुढे शिव शेवटी तयार झाले आणि दोघांनी लग्न केले. (Latest Marathi Healdine)
=========
Mahashivratri : जाणून घ्या महाशिवरात्रीची तारीख आणि शुभ मुहूर्त
Ekadshi : श्रीरामांनी देखील केलेल्या विजया एकादशीचे माहात्म्य
=========
विष प्राशन दिन
हलाहल विष आणखी एका मान्यतेनुसार, समुद्र मंथनातून सर्वात पहिले हालहाल विष निघाले. त्याची ज्योत प्रखर होती. त्यामुळे देव आणि दानव जळू लागले आणि सर्वत्र हाहाकार उडाला. तेव्हा सर्वांनी शंकराची प्रार्थना केली आणि महादेवाने ते विष प्याले. विषाच्या प्रभावामुळे शिवाचा कंठ निळा पडला. ही उष्णता कमी करण्यासाठी देवतांनी महादेवाला बेलाची पाने अर्पण केली. तो दिवस शिवरात्रीचा होता असे मानले जाते. (Top Stories)
महादेव एकात्म झाले तो दिन
एकात्म आणि कैलास योग परंपरेत महादेवाला देवता नाही तर आदिगुरू मानले जाते. म्हणजेच पहिले गुरु, ज्यांच्यापासून ज्ञान उत्पन्न झाले. अनेक सहस्र वर्षांच्या ध्यानानंतर, एके दिवशी भगवान शिव कैलास पर्वतावर पूर्णपणे स्थिर झाले. मग त्यांच्या सर्व हालचाली बंद झाल्या आणि ते पूर्णपणे शांत झाले. तो दिवस महाशिवरात्रीचा होता असे मानले जाते. (Social News)
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)
