दारू म्हटलं की भलेभले लोक ही व्यसनाच्या आहारी जातात. दारू म्हणजे अशा लोकांसाठी जन्नत, स्वर्गसुख आहे. दारू पिणं हे लोकांसाठी एक कल्चरच झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या दारू पिणं ही संस्कृतीच झाली आहे ,दारू शिवाय कोणताच सक्सेस सेलिब्रेट झाला असं वाटत नाही. पण हीच दारू एखाद्या देवाला नैवेद्य म्हणून चढवली गेल्यावर तुमची तळपायाची आग मस्तकातच जाईल. पण भारतात एक असं मंदिर आहे, जिथे चक्क देवाला दारू भोग म्हणून चढवली जाते. ते म्हणजे उज्जैनचं कालभैरव मंदिर ! इथे अनेक भाविक हातात दारूच्या बाटल्या घेऊन रांगेत दर्शनासाठी उभे असतात. पण या देवताला दारू का चढवली जाते. तर मध्य प्रदेशातील प्रसिद्ध काळभैरव मंदिर हे उज्जैन शहरात शिप्रा नदीच्या काठावर आहे, ज्याला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते भैरवगड म्हणूनही ओळखल जात. (kalbhairava)

भगवान शिवाची अनेक रूप जगप्रसिद्ध आहेत त्यातील १२ ज्योतिर्लिंगांविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. यापैकीच एक ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वर ! आणि त्या महाकालेश्वराचं आणि उज्जैनच रक्षण करणारा कालभैरव ! हा कालभैरवाची पूजा देखील तांत्रिक पद्धतीने केली जाते. कालभैरव हा शिवाचा रुद्रावतार मानला जातो. कालभैरवाचे देखील ८ प्रकार आहेत ज्याला अष्टभैरव म्हणून ओळखले जाते. असिथंगा, चंदा ,कपाल, उन्मत्ता, भीषण ,रुरू, समहारा भैरवर त्यातही कालभैरवाचे महत्वाचे रूप आहे ज्याला स्वर्ण आकर्षण भैरव ओळखलं जात. प्रत्येक धर्मात कोणत्या ना कोणत्या देवत्वाला मानलं जात, तसच हिंदू धर्मात बाबा भैरवाला खूप महत्व आहे. हे तंत्र-मंत्राचे स्वामी म्हणूनही ओळखले जातात. त्याला वामपंथी तांत्रिक मंदिर असेही म्हणतात. (Social News)
स्कंद पुराणात उज्जैन मधल हे कालभैरवाच मंदिर हे भद्रसेन नावाच्या राजाने बांधलं असा उल्लेख आहे. काळभैरव मंदिर शेकडो वर्षांपासून सखोल आध्यात्मिक पद्धतींशी संबंधित आहे. कपालिक आणि अघोरी पंथांचे प्रमुख केंद्र असलेल्या उज्जैनने या परंपरांचा एक भाग म्हणून काल भैरवाला मद्य अर्पण करण्याचा विधी जपला आहे. कालभैरव मंदिरातील दैवी विधींमध्ये, मद्य अर्पण करण्याच्या परंपरेचा आध्यात्मिक अर्थ आहे. हे एखाद्याचा अहंकार, अज्ञान आणि वाईट सवयींना परमात्म्याला समर्पण करण्याचे प्रतीक आहे. अल्कोहोल किंवा सुरा हे शस्त्र शक्तिशाली उर्जेच प्रतिनिधित्व करत, जे देऊ केल्यावर, नकारात्मक गुणांचा त्याग करण्याची आणि आध्यात्मिक वाढ स्वीकारण्याची भक्ताची इच्छा दर्शवत. ही कृती पदार्थाबद्दल नाही तर आंतरिक दुर्गुण सोडण आणि परिवर्तन शोधण याबद्दल आहे. (kalbhairava)
या मंदिराबाबत एक महत्वपूर्ण गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे मराठ्यांच्या काळात मुघलांनी भारतावर हल्ले करण्यास सुरवात केली. मुघल आक्रमकांनी पश्चिमेपासून उत्तर भारतापर्यंत खूप रक्तपात घडवला परंतु मराठ्यांनी पराभूत होऊनही हार न मानता लढा चालू ठेवला आणि त्यांच्या हातून अनेक राज्ये हिसकावून घेतली त्यावेळी अनेक मंदिर उध्वस्त झाली,पण कालभैरव मंदिराला ते शोधू शकले नाही. या ऐतिहासिक घडामोडीत असही म्हंटल जात कि पानिपतच्या तिसऱ्या युद्धापूर्वी महादजी शिंदे भैरव मंदिरात गेले व त्यांनी आपली पगडी भैरवबाबांना दिली आणि विजयानंतर मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याची शपथ घेतली. (Social News)

आजही उज्जैनमधील कालभैरव मंदिरात देवाला प्रसाद म्हणून भाविक दारूच अर्पण करतात. लोक दारू देतात, पण ही दारू स्वतः पिऊ शकत नाही. या ठिकाणी पूजेच्या सामानाबरोबर दारूचीही विक्री केली जाते व मंदिरात दररोज सुमारे 2000 दारूच्या बाटल्या अर्पण केल्या जातात. उज्जैन मध्ये दारूबंदी जरी असली तरी सरकारने केवळ या मंदिराच्या परिसरात दारू विक्री साठी मान्यता दिली आहे. पहायला गेलं तर अनेक तांत्रिक देवतांना दारू आणि मांस नैवेद्य म्हणून चढवला जातो. बंगालमध्ये दुर्गा पूजाच्या दिवशी काली मातेला दारू आणि मासे हा भोग दिला जातो. तसेच तांत्रिक मार्गात बळी प्रथादेखील आहे. (kalbhairava)
================
हे देखील वाचा : Ekadshi : जाणून घ्या चातुर्मास संपल्यानंतर येणाऱ्या उत्पत्ति एकादशीचे महत्त्व, पूजाविधी आणि कथा
================
या मंदिरात एक चमत्कारिक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे कालभैरवाला भाविक मोठ्या भक्तिभावाने दारू पाजतात .या कालभैरवाच्या मंदिरात दारू हाच देवाचा प्रसाद आहे, भाविक हि दारू पुजार्याला देतात, पुजारी ती दारू एका पसरट ताटात घेऊन ते ताट त्या देवाच्या मुखाशी नेतात आणि अचानक ही दारू नाहीशी होते. हा चमत्कार अनेक वर्षांपासून चालत आला आहे. अनेक जण या प्रकाराला पुजाऱ्याची हातचलाखी देखील म्हणतात. पण तरीही हा प्रकार “याची देही याची डोळा पाहून” सुद्धा अनेकांचा यावर विश्वास बसत नाही. पण तरीही ती दारू कोण पितो, कुठे जाते ही दारू ? याच उत्तर आजतागायत सापडलेल नाही. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
