Home » Big Boss एवढं हीट का आहे ?

Big Boss एवढं हीट का आहे ?

by Team Gajawaja
0 comment
Big Boss Reality Show
Share

‘बिग बॉस’ ची सुरुवात २००६ मध्ये भारतात झाली, डच रीयालिटी शो बिग ब्रदर पासून प्रभावित होऊन बिग बॉस बनवला गेला आहे. खूप लोकं या शोला नावं ठेवत असली तरी या शोची Popularity इतकी जास्त आहे की हा शो सुरवातीला हिंदी मध्ये सुरू झाला आणि बघता बघता कन्नड, बंगाली, तमिळ, तेलगू, मराठी आणि मल्याळम या भाषांमध्ये सुद्धा निर्माण केला गेला. आणि तिथेही त्यांने लोकप्रियतेचा उच्चांक गाठलाच. बिग बॉस हा शो जितका लोकप्रिय आहे, तितकाच तो वादग्रस्त सुद्धा आहे. (Big Boss Reality Show)

माकडाचा माणूस झाल्यानंतर तो खूप कमी वर्षे शांतपणे जगला आहे आणि दुसऱ्याला जगू दिल आहे. शिकार करताना शेतीचा शोध लागल्या नंतर शिकारी बऱ्याप्रमाणात कमी झाली असेल, मग नंतर जमीनी साठी युद्ध त्यांने सुरू केलं. धर्मासाठी, सत्तेसाठी आणि मग मालमत्तेसाठी ते आज ही सुरूच आहे. आताही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे युद्ध आणि भांडणं सुरू आहेच. आपण जरी खूप शांत आणि साध जीवन जगत असू, पण रस्त्यावर कुठे भांडण होताना आपल्याला दिसलं की आपण थोडं थांबून बघतोच. आपल्यात उत्सुकता असते नक्की घडलं काय असेल? चूक कोणाची असेल? आणि त्यात जर भांडण हाणामारीपर्यंत पोहचलं तर आपली उत्सुकता आणखीच वाढते. आपल्या ह्याच मानसिकतेच्या आधारावर तयार करण्यात आल आहे बिग बॉस. (Big Boss Reality Show)

बिग बॉस बनवणाऱ्यांनी काय केलं “भिंतीना कान असतात” ही म्हण बदलून “भिंतीना कॅमेरे असतात” असं म्हणत बिग बॉसच्या घरातले भांडणं घराघरात  National Television वर दाखवायला सुरुवात केली. आणि या घरात जाणारे सदस्य सुद्धा अशा प्रकारे निवडून घेतले जातात की ज्यांची आधीपासूनच थोड्याप्रमाणात फॅन फॉलोइंग असेल किंवा ते वादाच्या भोवऱ्यात Headlines मध्ये दिसत तरी असतील. काही काही लोकं असं ही म्हणतात की ज्यांच करियर Down चालू असतं असेच लोक या शो मध्ये घेतले जातात. आता सदस्य निवडण्याची कारण काहीही असो, पण जर चार भिंतींच्या आत 15 ,16 जणांना 100 दिवसासाठी ठेवलं तर धांगडधिंगा, लफडी, भांडण होणारच. आणि लोकांनाही ते बघायला आवडत. या अशा Unique फॉरमॅटमुळे बिग बॉस दिवसेंदिवस आणखी लोकप्रिय होत चालल आहे. (Big Boss Reality Show)

=================

हे देखील वाचा : ज्या सूरज चव्हाणला हसता, तोच आज लाखो कमावतोय !

================

बिग बॉसच्या घरात असणारे सेलेब्रिटी कोणतही पात्र सादर करत नसतात. ते जसे आहेत तसेच लोकांना दिसत असतात. त्यामुळे घरात मैत्री, प्रेम, भांडण, रडापड हे सगळं अगदी खरंखुरं वाटतं. म्हणूनच एखाद्या मेलोड्रामेटिक सिरियल पेक्षा बिग बॉस लोकांना जास्त भावत असावं. त्याशिवाय घरातल्या सदस्यांची एकमेकांंसोबत असलेली स्पर्धा, मग त्यात नॉमिनेशन आणि एलिमिनेशनची प्रक्रिया ज्याच्या वोटिंग मध्ये प्रेक्षक सुद्धा सहभागी असतात. त्यामुळे तेही एकाप्रकारे बिग बॉसच्या खेळात सहभागी असतात. त्यामुळे हा शो प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ज्याप्रमाणे रंगमंचावरचा नाटक आपल्या डोळ्यांपुढे उलगडत जातं, तसंच ‘बिग बॉस’चा प्रत्येक एपिसोड हा Unpredictable असतो. त्यामुले प्रेक्षकांंमध्ये आणखी उत्सुकता वाढते.

बिग बॉस’च्या घरात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीत माणसाच्या Mentality चं दर्शन होतं. हा शो प्रेक्षकांच्या मनावर एक विशिष्ट प्रकारचा प्रभाव टाकतो. तो प्रभाव म्हणजे वॉयूरिझम, म्हणजेच दुसऱ्यांच्या खासगी जीवनात डोकावण्याची उत्सुकता. आणि ती चुकीची आहे. म्हणून बरेच लोक या शोला नापसंत करतात. शिवाय त्यांना या शोचा रागही येतो. बिग बॉसच्या घरातील भाडणं मनोरंजनासाठी पाहणं ठीक आहे, पण त्या मुळे आपल्या घरात भांडण व्हायला नको. (Big Boss Reality Show)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.