शेजारील देश बांगलादेशात आरक्षणावरून गदारोळ सुरू आहे. हजारो आंदोलक विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, तेथील प्रशासनाने देशव्यापी संचारबंदी लागू केली आहे.गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये गोळीबार, जाळपोळ सुरू आहे. रेल्वे मेट्रो बंद आहे. शाळा, कॉलेज सुद्धा बंद आहेत. विद्यार्थी बांग्लादेश सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे संपूर्ण बांगलादेश ठप्प पडल आहे. (Bangladesh)
बांग्लादेशी सरकारने इंटरनेट सेवा बंद करून देशव्यापी संचारबंदी लागू केली आहे. बांगलादेश मध्ये नक्की घडतय काय? विद्यार्थी रस्त्यावर उतरुन आंदोलन कशासाठी करत आहेत? बांगलादेशच्या आजच्या परिस्थितीची मुळं जोडलेली आहेत १९७१ च्या बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामाशी जेव्हा बांगलादेश पाकिस्तानापासून स्वतंत्र झाला होता. ज्यामध्ये भारतीय लष्कराने बांगलादेशला स्वतंत्र होण्यासाठी मदत केली होती.
या स्वतंत्रसंग्रामात अवामी लीग हा एक मुख्य पक्ष होता. बांगलादेश स्वातंत्र्यानंतर याच पक्षाचे शेख मूजीबीर रेहमान बांगलादेशचे पंतप्रधान बनले. आणि १९७२ साली त्यांनी एक फ्रीडम फाइटर कोटा जाहीर केला. ज्या अंतर्गत बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामात असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी सरकारी शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ३०% आरक्षण दिलं गेल.इतकी वर्ष हे आरक्षण सुरु होतं.पण या आरक्षणा विरोधात २०१८ ला आंदोलन सुरू झालं, आंदोलक विद्यार्थ्यांनी संपूर्ण देश रोखून धरला. (Bangladesh)
सरकारवर दबाव वाढला आणि पंतप्रधान शेख हासिना यांनी संपूर्ण कोटा पद्धत रद्द केली. आणि नंतर 5 जून 2024 रोजी बांगलादेश उच्च न्यायालयाने 2018 चा कोटा रद्दकरण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला. आणि पूर्वीप्रमाणेच कोटा पद्धत लागू करण्यास सांगितलं शिवाय एकूण आरक्षण ५६ टक्के निश्चित करण्यात आलं. आता यात महत्त्वाचा मुद्दा हा की हे आरक्षण रद्द करणाऱ्या पंतप्रधान शेख हासिना, यांचाच हे आरक्षण पुन्हा लागू करण्यात हस्ताक्षेप आहे.असं म्हटलं जातय. आपल्या जवळच्या लोकांसाठी ते या आरक्षणाचा फायदा घेत होत्या असेही आरोप त्यांच्यावर झाले. (Bangladesh)
एकूण आरक्षण ५६ टक्के लागू करण्याच्या निर्णयाला अनेक विद्यार्थ्यांनी विरोध केला. अनेक आठवडे हे आंदोलन घोषणाबाजी आणि रॅलींपुरतच मर्यादित होतं. पण १५ जुलै रोजी हिंसाचार उसळला. त्याची सुरुवात ढाका युनिव्हर्सिटीपासून झाली. बांगलादेश विद्यार्थी लीगच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांवर हल्ला केला. बांगलादेश विद्यार्थी लीग ही सध्या सत्तेत असलेल्या अवामी लीगशी संबंधित संघटना आहे. ढाका विद्यापीठापाठोपाठ आणखी अनेक महाविद्यालय हिंसाचाराच्या विळख्यात सापडली. मग ही साखळी सुरू झाली.
===========
हे देखील वाचा : मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी, तालिबानी असल्याचे सांगत NIA ला पाठवलाय मेल
===========
१९ जुलै रोजी बांगलादेशच्या नरसिंगडी जिल्ह्यातील एका कारागृहातून विद्यार्थी आणि आंदोलकांनी शेकडो कैद्यांची सुटका केली हे कैदी आंदोलकच होते ज्यांना अंदोलना दरम्यान अटक करण्यात आली होती. आता पर्यंत या हिंसाचारात १६० जणांचा बळी गेला आहे आणि हजारो विद्यार्थी जखमी आहेत. पण विद्यार्थ्यांच्या या अंदोलनाला यश सुद्धा मिळालयं. विद्यार्थ्यांचं म्हणं होतं की आरक्षणाशिवाय, सरकारी नोकऱ्या या गुणवत्तेच्या आधारे देण्यात याव्या.आता ९३ टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षणाशिवाय गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांसाठी खुल्या राहतील, असं न्यायालयानं म्हटलं आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी ५ टक्के आणि इतर प्रवर्गांसाठी २ टक्के नोकऱ्या राखीव ठेवल्या जातील.विद्यार्थ्यांचं हे आंदोलन यशस्वी जरी झालं असलं तरी ते थांबलेलं नाहीये, या हिंसचारा विरोधात विद्यार्थी पंतप्रधान शेख हासिना यांच्या कडून राजीनामा मागत आहेत. (Bangladesh)