Home » Halloween : हॅलोवीन म्हणजे काय? हॅलोवीन दिनाचा इतिहास काय?

Halloween : हॅलोवीन म्हणजे काय? हॅलोवीन दिनाचा इतिहास काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Halloween
Share

भारतामध्ये अनेक पाश्चत्य गोष्टींचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण केले जात आहे. पाश्चत्य देशांमध्ये साजरे केले जाणारे विविध डेज भारतात देखील त्याची माहिती नसताना देखील मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. मधल्या काही काळापासून असाच एक डे भारतात कमालीचाच गाजत आहे आणि तो म्हणजे ‘हॅलोविन डे’. बाहेरचे देश हा दिवस साजरा करतात म्हणून आपल्याकडे देखील ‘हॅलोविन डे’. साजरा केला जातो. सोशल मीडियाचे प्रस्थ वाढल्यापासून तर या डे बद्दल अधिकच चर्चा आणि सेलिब्रेशन वाढले आहे. भारतामध्ये देखील ठिकठिकाणी ‘हॅलोविन’ पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या पार्ट्यांमध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच भुतांच्या वेशात तयार होऊन जातात आणि धमाल करतात. मात्र हॅलोविन म्हणजे काय?, हा दिवस साजरा करण्यामागचे कारण कोणते?, हॅलोविन डे चा इतिहास काय आहे? जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. (Halloween)

भारतीय संस्कृतीमध्ये जसा पितृपक्ष पाळून आपल्या पूर्वजांचे आपल्या पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. त्याच प्रमाणे ख्रिस्ती बांधव हॅलोवीन साजरा करतात. दरवर्षी ३१ ऑक्टोबर या दिवशी हॅलोवीन साजरे केले जाते. सोशल मीडिया, हॉलिवूड चित्रपट, वेबसीरीज यांमुळे हॅलोवीनबाबत भारतीयांच्या मनातही उत्सुकता वाढली असल्याचे दिसून येते. हा उत्सव चर्चमधील सर्व संतांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हॅलोविन सण साजरा करणे सुमारे २००० वर्षांपूर्वी सुरू झाले. त्या वेळी उत्तर युरोपमध्ये हॅलोविन हा ‘ऑल सेंट्स डे’ म्हणून साजरा केला जात असे. असे मानले जाते की या दिवशी मृत लोकांचे आत्मे पृथ्वीवर येऊन सामान्य लोकांना त्रास देत असत, त्यांना हाकलून लावत असत, त्यांना घाबरवायचे, म्हणून तिथले लोकं भितीदायक कपडे घालायचे आणि दिवा लावून वाईट शक्तींना दूर करण्याचा प्रयत्न करायचे. (Marathi News)

आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये १९ व्या शतकात या प्रथेचा उगम झाला. या दिवशी पूर्वजांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि शेतीच्या कामात मदत करतो, अशी आस्था आहे. ख्रिस्ती बांधव भुतांचा पोशाख करुन, प्राण्यांचे मुखवटे वापरुन नाचत आनंदोत्सव करतात. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जरी हा सण साजरा केला जात असला, तरी चित्रविचित्र कपडे घालून घाबरवणारा मेकअप यावेळी केला जातो. (Todays Trending Headline)

Halloween

या सणाची उत्पत्ती “समहेन” नावाच्या प्राचीन सेल्टिक उत्सवापासून होते, जो कापणीचा शेवट आणि हिवाळ्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. भूत आणि आत्मे जगाला त्रास देतात असे मानले जाते. म्हणून लोक त्यांच्या पूर्वजांचा सन्मान करण्यासाठी आणि वाईट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी या दिवशी विचित्र वेशभूषेत तयार होऊन हॅलोवीन दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. ख्रिश्चन धर्म आल्यावर १ नोव्हेंबरला “All Saints’ Day” आणि २ नोव्हेंबरला “All Souls’ Day” साजरे होऊ लागले. ३१ ऑक्टोबरची रात्र म्हणजे “All Hallows’ Eve” हळूहळू त्याचं नाव Halloween पडले. (Top Stories)

हॅलोवीनच्या दिवशी लोकं लाल भोपळा पोकळ करतात आणि त्यावर भुताचे भितीदायक चेहरे बनवतात आणि त्यामध्ये एक जळणारी मेणबत्ती ठेवतात. जेणेकरून ते अंधारात भुतासारखे दिसतील. अनेक देशांमध्ये असे हॅलोविन घराबाहेर अंधारात झाडांवर टांगले जाते. हॅलोवीन संपल्यानंतर तो भोपळा जमिनीत पुरला जातो. हॅलोविनच्या दिवशी भोपळ्यापासून बनवलेल्या मिठाई आणि गोड पदार्थ खाणे शुभ मानले जाते. (Latest Marathi News)

हॅलोविनबद्दल पाश्चात्य देशांमध्ये एक कथा खूपच प्रचलित आहे. त्यानुसार मिजर जॅक आणि डेव्हिल आयरिश हे दोन मित्र होते. स्टिंगी जॅक हा मद्यपी होता. एकदा त्याने आयरिशला त्याच्या घरी बोलावले, परंतु त्याने आयरिशला दारू पिण्यास नकार दिला. त्याने तिला भोपळा द्यायला सुरुवात केली, पण नंतर त्याने भोपळ्यासाठीही नकार दिला. जॅकवर चिडलेल्या आयरिशने भोपळ्यावर एक भितीदायक देखावा बनवला आणि त्यात एक मेणबत्ती लावली आणि ती बाहेर झाडावर टांगली. हे पाहून जॅक घाबरला. तेव्हापासून, इतरांना धडा म्हणून, या दिवशी जॅक-ओ’-कंदील लावण्याची प्रथा सुरू झाली. असेही मानले जाते की, हा कंदील पूर्वजांच्या आत्म्यांना मार्ग दाखवण्याचे आणि वाईट आत्म्यांपासून संरक्षण करण्याचे प्रतीक आहे. (Top Trending Headline)

=======

Himalayan Secrets : रहस्यमयी तलावात हजारो वर्षांपूर्वीचे सांगाडे…

Chernobyl : चेर्नोबिलच्या परिसरात कुत्र्यांचा रंग झाला निळा !

=======

युरोपात ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळा आणि उन्हाळा यादरम्यानचा हा काळ असल्याने निसर्गातही सारी वृक्ष, पाने पिवळी, नारंगी रंगाची झालेली असतात. तर काळा रंग भय, मृत्यू यांचे प्रतीक मानला गेला आहे. त्यामुळे पूर्वजांच्या स्मरणासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या या उत्सवात नारंगी आणि काळ्या रंगाचा वापर केला जातो, असे सांगितले जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.