आपल्याला निरोगी शरीरासाठी केवळ वेळेवर जेवण आणि व्यायमाचीच गरज असते असे नाही. तर निरोगी शरीरासाठी व्यक्तीला सकस आहारासोबतच आपल्या जीवनसत्वे देखील खूप महत्त्वाची असतात. या जीवनसत्वांमुळे शरीर योग्य काम तर करतेच सोबतच ते निरोगी देखील राहते. विविध पदार्थांमधून जीवनसत्त्वांची गरज भागवली जाते. यासोबतच कधी कधी औषधांनी देखील जीवनसत्त्वांचे शरीरातील प्रमाण वाढवले जाते. मात्र याच जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शरीरासाठी अनेक प्रकारची जीवनसत्व गरजेची असतात.
जीवनसत्वांबद्दल लोकांमध्ये तशी बऱ्यापैकी जागरूकता आहे. पण व्हिटॅमिन बी 9 ज्याला फोलेट किंवा फॉलिक ऍसिड असे म्हटले जाते, याबद्दल लोकांना जास्त माहिती नाहीये. हे जीवनसत्व आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूपच आवश्यक असते. मुख्य म्हणजे गरोदर महिलांसाठी तर बी9 जीवनसत्व सर्वात जास्त गरजेचे असते. मग या जीवनसत्वाचे नक्की महत्व काय? याचे काय फायदे शरीराला होतात चला जाणून घेऊया. (Health News)
फॉलिक अॅसिड म्हणजेच जीवनसत्त्व ‘ब’ होय. फॉलिक अॅसिड अर्थात जीवनसत्त्व ‘ब’ हे मुख्यत: खारट चवीची फळे, आणि पालेभाज्यांमध्ये आढळते. सामान्यत: शरीराला फॉलिक अॅसिडची पूर्तता बऱ्याच पदार्थांमधून होते पण काही विशेष स्थिती मध्ये शरीराला मिळणारी याची मात्रा कमी होत गेली तर हळूहळू विविध आजार होण्याच्या शक्यता वाढतात. लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत होते जर तुमच्या आहारात फोलेटचा पुरेसा समावेश नसेल तर तुम्हाला फोलेटची कमतरता म्हणजेच फॉलिक ऍसिडची कमतरता जाणवू शकते. (Marathi News)
काही आंबट फळांचा ज्यूस आणि हिरव्या भाज्यांसारखे काही पदार्थ फॉलेटेड चांगले स्रोत मानले जातात. फोलेट पुरेशा प्रमाणात न खाल्ल्याने त्याची कमतरता जाणवू शकते. अनुवांशिक बदल देखील काही वेळा याचे कारण असू शकतात. ॲनिमिया आजार कॉलेजच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. रक्तातील आरबीसीची कमतरता ज्यामुळे योग्य प्रमाणात ऑक्सिजन उतींपर्यंत पोहोचत नाही आणि याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. (Todays Marathi Headline)
फोलेट हे बी ग्रुपचे जीवनसत्व आहे, जे निरोगी वाढ आणि विकासासाठी आवश्यक आहे. हिरव्या भाज्या, फळे इत्यादी अन्नामध्ये नैसर्गिकरित्या आढळल्यास त्याला फोलेट म्हणतात. फॉलिक ऍसिड हे फोलेटचे कृत्रिम रूप आहे. फॉलिक अॅसिड हा गर्भधारणेच्या निरोगी आहाराचा एक आवश्यक घटक आहे. हे एक अत्यावश्यक जीवनसत्व आहे, जे अधिक पालकांना माहिती आहे. कारण ते प्रिमॅच्युअर बेबी बर्थ आणि बर्थ डिफेक्टशी जोडलेले आहे. (Top Marathi News)
मेंदूचे किंवा पाठीच्या कण्यातील हे दोष फोलेटच्या अपुऱ्या सेवनाशी संबंधित प्रमुख समस्या आहेत. गर्भवती महिलांनी गर्भधारणेच्या सुरुवातीला फोलेट घेणे आवश्यक आहे. जेणेकरून ते निरोगी बाळाला जन्म देऊ शकतील. तसेच पुरुषांची फर्टिलिटी वाढवण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी, केसगळती कमी करण्यासाठी फॉलिक ॲसिड खूप उपयुक्त आहे. फॉलिक ॲसिडची कमतरता असल्यामुळे काही शारिरीक त्रास होऊ शकतात. शरीरात लाल पेशींच्या निर्मितीसाठी फॉलिक ॲसिड खूप आवश्यक असते. (Latest Marathi News)
गर्भधारणेदरम्यान महिलांनी दररोज ४०० ते ८०० मायक्रोग्रॅम फॉलिक अॅसिडचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यूरल ट्यूब डिफेक्ट (NTD) सारख्या गंभीर जन्मजात समस्यांचा धोका कमी होतो. लाल रक्तपेशी वाढतात, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. तसेच अॅनिमियाचा धोकाही कमी होतो. मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या विकासात मदत होते. (Top Trending News)
फॉलिक ॲसिडच्या कमतरतेची लक्षणे
– खूप थकवा जाणवणे
– उर्जेची पातळी कमी होणे
– हात -पाय सुन्न पडणे
– जीभ खूप लाल होणे व त्यामध्ये वेदना होणे
– तोंडात फोड येणे
– स्नायू अशक्त होणे
– एखादी गोष्ट पाहण्यास त्रास होणे
– डिप्रेशन आणि भ्रम यासारख्या मानसिक समस्या जाणवू शकतात.
========
Donald Trump : या भारतीयापुढे ट्रम्प नितीची हार !
========
फॉलिक ॲसिडचे फायदे
– फॉलिक ऍसिड हे केसांचे आरोग्य राखण्यास मदत करते. त्याचा नियमित समावेश आहारात केल्यास केस गळती नियंत्रणात राहते.
– गरोदरपणात बाळाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या योग्य विकासासाठी फॉलिक ऍसिड अत्यावश्यक असते.
– पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत सुधारणा करण्यासाठी फॉलिक ऍसिडचा उपयोग होतो.
– जीवनातील मानसिक ताण आणि थकवा कमी करण्यासाठी फॉलिक ऍसिड फायदेशीर ठरते.
– फॉलिक ऍसिडच्या योग्य प्रमाणात सेवनामुळे काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, असे संशोधनातून समोर आले आहे.
फॉलिक ॲसिडचे मुख्य स्त्रोत
पालक, ब्रोकली, कडधान्ये, शेंगदाणे, सुर्यफुलाच्या बिया, सी फूड, अंडी, मटार आणि सीट्रस फुले हे आहेत. यांमध्ये सर्वाधिक प्रमाणात फॉलिक अॅसिड आढळते आणि हे सगळे पदार्थ सहज उपलब्ध सुद्धा होतात. (Social News)
(टीप – कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics