घराघरात गौरीचे आवाहन लवकरच होणार आहे. सोन पावलांनी येणाऱ्या गौरी संपन्नता, आरोग्य, सुबत्ता घेवून येत असतात. गौरीला गणपतीच्या आईचे पार्वती मातेचे रूप मानतात. तिला घरात माहेरवाशिणीचे स्थान दिले जाते. तिचे कोडकौतुक केले जाते. तीन दिवस या गौराईची चांगली ठेप ठेवत तिला विविध प्रकारचे पक्वान्न खाऊ घातले जातात. तिचा मानसन्मान केला जातो. मात्र गौरी पूजन जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात केले जाते. पण यासोबतच कोकणात गौरी आवाहनाच्या दिवशी अजून एक रीत पाळली जाते आणि ती म्हणजे, ‘ओवसा’. ओवसा हा गौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा आहे. कोकणात खास करून ही परंपरा पाळली जाते. विशेषतः नववधुसाठी पहिला ओवसा फार महत्त्वाचा असतो. मग नक्की ओवसा काय आहे?, याचे काय महत्व असते? याबद्दल अधिक जाणून घेवूया या लेखामधून. (Marathi News)
ओवसा म्हणजे ओवासणे किंवा ओवाळणे. गौरीचा ओवसा करण्याची पद्धत खूपच जुन्या काळापासून सुरू आहे. गौरीला ओवासणे हे एक सुवासिनीनी करावयाचे मंगल आणि सौभाग्याचे काम असते. ओवसा एक सौभाग्य व्रत आहे. नवीन लग्न झालेल्या सुवासिनी गौरीला ओवसायला येतात. एका सुपात ५ प्रकारच्या भाज्या, ५ प्रकारच्या वेलींची पाने, ५ प्रकारची फळे, करंडा फणी, खान नारळाची ओटी आणि वाणाच्या पानावर सुटे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून, अशी ५ सुपे गौरीच्या पुढ्यात ओवसा भरण्यासाठी ठेवतात. (Todays Marathi Headline)
ओवसा कसा भरायचा?
पहिला ओवसा नववधुसाठी महत्त्वाचा असून माहेरी आणि सासरी ती गौराईसमोर सूप ओवासते. आता ओवशाच्या सुपात काय ठेवायचे हे सुद्धा कुळाचार आणि प्रातांनुसार बदलते. ओवसा भरण्यासाठी जी सूप वापरायची आहेत ती बांबूपासून तयार केलेली असावीत. पाच सूपांचा ओवसा भरला जातो. या सुपांना दोऱ्याच्या सहाय्याने गुंडाळून हळदीकुंकू लावले जाते. त्यानंतर पाच प्रकारच्या वेलींची पाने (हळद, काकडी, कारंदे, पडवळ, कारले) घेऊन त्यात रानभाज्या किंवा पाच फळे/ सुकामेवा/ धान्य या पैकी काहीही एक प्रकार ठेवला जातो. त्यानंतर सुपात विड्याचे पान, तांदूळ नारळ ठेवून गौरी समोर ठेवतात. (Ganesh Chaturthi)
ओवसा करुन झाले कि सर्व जोडपी आपल्या पेक्षा मोठ्या माणसांच्या पाया पडून ओवश्यातले पान वाण म्हणून देतात आणि सर्व मोठी मंडळी त्याबदल्यात पैसे, साडी किंवा सोन्या-दागिन्याचा वाण देतात. गौरीला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगतात. ओवसायला आलेल्या त्या सुवासिनींची खणानारळाने ओटी भरली जाते आणि त्यांचा मान-सन्मान केला जातो. काही ठिकाणी सुवासिनींच्या सूपात काही पैसे ठेवण्याची प्रथा आहे. (Top Trending News)
========
Gauri Pujan : गौरी अर्थात महालक्ष्मी सणाची संपूर्ण माहिती
========
लग्नानंतर नववधूने पूर्व नक्षत्रांत पहिला ओवसा करण्याची पद्धत आहे. गौरीला एकदा ओवसा भरल्यानंतर दरवर्षी गौरीसमोर ओवसा करायची पद्धत आहे. नववधूने पहिला ओवसा भरला नसेल तर पूर्वा नक्षत्र येईपर्यंत ओवसा भरण्याची वाट पाहिली जाते. त्यामुशं नववधूसाठी ओवसा महत्त्वाचा असतो. गौरीला देवी आदिशक्तीचे रूप मानले जाते. त्यामुळे गौराईची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि घरातील सुनेला मिळावे यासाठी ही परंपरा मनोभावे केली जाते. गौराईची पुजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले सुप हे घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते. भरलेले सुप देणं हे ऐश्वर्याचं आणि मांगल्याचं प्रतिक मानले गेले आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics