जेव्हा हस्तिदंताबद्दल बोलले जाते तेव्हा प्रथम त्याची किंमत किती असेल याबद्दलच विचार केला जातो. हस्तीदंत (Elephant Tooth) हे खुप महाग असतात ही गोष्ट खरी आहे. पण हस्तिदंतात असे नेमके काय असते ज्यामुळे त्याची किंमत कोटींच्या घरात असते. तसेच ऐवढ्या बलाढ्य असलेल्या प्राण्याचे हस्तिदंता काढताना त्याला किती वेदना होत असतील याचा विचारच करु शकत नाहीत. अलीकडल्या काळात हस्तीदंताची तस्करी करण्याच्या घटना ही घडू लागल्या आहेत. हस्तिदंतासाठी हत्तीवर हल्ले ही केल्याच्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत. असो पण आपण जाणून घेऊयात हस्तिदंताची किंमत ही सोन्यापेक्षा ही अधिक का असते?
हस्तिदंताबद्दल बहुतांश लोक असे मानतात की, ते शुभ असते. तर काहीजण नवजात बाळाच्या गळ्यात ही हस्तिदंता घालतात. परंतु जेव्हा हस्तिदंताच्या किंमती बद्दल विचार केला असता तर ती किती असेल याचा अंदाज ही आपण लावू शकत. तरीही लोक का खरेदी करतात हस्तिदंता? खरंतर याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास एक किलो हस्तिदंताची अंदाजे कमीत 10 लाखांच्या घरात असते. म्हणजे हत्तीचा दात 10 किलोचा असेल तर त्याची किंमत 1 कोटी रुपये असू शकते. मात्र विविध मान्यतांच्या आधारानुसार त्याची किंमत ठरवली जाते. हस्तिदंतासाठी हत्तींची काही वेळा हत्या की केल्या जात असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मात्र कायद्याने हा गुन्हा आहे.
हे देखील वाचा- अष्टविनायकांशिवाय तुम्ही ‘या’ गणपतींच्या ठिकाणांना कधी भेट दिलीय का?
परंतु हस्तिदंताची (Elephant Tooth) कोणतीही आंतरिक किंमत नसते. म्हणजेच यामध्ये असे काही तत्व नसतात जे त्याला खास बनवतात. पण संस्कृतीच्या दृष्टीने त्याला अधिक मान दिला जातो. त्याचसोबत स्टेटस सिंबल म्हणून ही हस्तीदंताला जोडले जाते. थोडक्यात ते लक्झरीचे प्रतीक असल्याचे मानले जाते. हस्तिदंताच्या विक्रीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास त्याची कोणतीही ठराविक किंमत नसते. काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्य 17 किलोचे हस्तिदंता जप्त करण्यात आले होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल 70 लाख रुपये होती. काहीजण वास्तूदोष दूर करण्यासाठी सुद्धा हस्तिदंताचा वापर करतात.
दरम्यान. हस्तिदंताचे कठीण आणि मृदू असे दोन प्रकार असतात. त्यानुसार हत्तींपासून प्राप्त होणारे कठीण हस्तिदंत हे आफ्रिकेतील पश्चिम भागातून तर मृदूहस्तिदंत हे पूर्व भागातून मिळतात. हस्तिदंतावर कोरिवकाम करुन ते घरात शो पिस म्हणून काही जण ठेवतात. या व्यतिरिक्त शोभिवंत वस्तू व दागिने बनवण्यासाठी सुद्धा त्याचा काही वेळा वापर केला जातो.