Home » Vehicles Number Plates : गाडीच्या वेगवेगळ्या रंगाच्या ‘नंबर प्लेट’ला आहे मोठा अर्थ

Vehicles Number Plates : गाडीच्या वेगवेगळ्या रंगाच्या ‘नंबर प्लेट’ला आहे मोठा अर्थ

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vehicles Number Plates
Share

आपल्या प्रत्येकाच्या घरातच एक तरी गाडी असतेच. मग ती चारचाकी असो, किंवा दुचाकी. आजकाल गाडी शौक नाही तर गरजेचेच वस्तू झाली आहे. काही घरांमध्ये तर एकापेक्षा जास्त गाड्या देखील असतात. गाडी घेतल्यावर किंवा घरात गाडी असल्यावर गाडीशी संबंधित सर्वात महत्वाची बाब असते, गाडीचा नंबर. आपण कधीच गाडी नंबर शिवाय रस्त्यावर चालवू शकत नाही. असे करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. गाडी घेतल्यानंतर काही दिवसांनी आपल्याला आरटीओ कडून गाडीचा अधिकृत नंबर मिळतो. हा नंबर मिळल्यानंतर आपल्याला गाडी आहे, तोपर्यंत तो नंबर गाडीवर लावावाच लागतो. गाडीवर जर नंबर नसेल तर कायदेशीर कारवाई देखील केली जाण्याची शक्यता असते. (RTO)

आपण जर लक्ष दिले असेल तर रस्त्यांवर ज्या गाड्या फिरतात त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट लावलेल्या असतात. काही गाड्यांवर पांढऱ्या, काही गाड्यांवर पिवळ्या, काही गाड्यांवर हिरव्या आदी विविध रंगांमध्ये या नंबर प्लेट येतात. मग या विविध रंगांमध्ये येणाऱ्या नंबर प्लेटचा अर्थ नक्की काय असतो? कोणत्या गाडयांना कोणत्या रंगाच्या नंबर प्लेट दिल्या जातात? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही….? मग चला जाणून घेऊया गाडयांना मिळणाऱ्या विविध रंगांच्या नंबर प्लेटबद्दल. (Vehicles Number Plates)

पांढरी रंगाची नंबर प्लेट:
पांढर्‍या रंगाची नंबर प्लेट सर्व सामान्य लोकांच्या गाडयांना आपल्याला पाहायला मिळते. या रंगाची नंबर प्लेट खासगी वाहनांसाठी वापरली जाते. या गाड्यांवर लावल्या जाणाऱ्या प्लेटवर पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेटवर काळ्या रंगाच्या अक्षरांमध्ये नंबर लिहिलेले असतात. या रंगाची नंबर प्लेट असलेली वाहने व्यावसायिक कारणांसाठी वापरता येत नाहीत.(Top Stories)

Vehicles Number Plates

======

हे देखील वाचा : Passport : भारतात चार रंगात मिळतो पासपोर्ट, जाणून प्रत्येक रंगाच्या पासपोर्टचे वैशिष्ट्य

======

पिवळी रंगाची नंबर प्लेट:
भारतात व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर पिवळ्या रंगाची नंबर प्लेट लावली जाते. एव्हडं वाहनांसोबतच टॅक्सी, कॅब आणि बसला पिवळ्या रंगाच्या नंबर प्लेट लावलेल्या असतात. जर मालकाकडे त्याच्या वाहनासाठी आवश्यक व्यावसायिक परवानगी असेल तरच पिवळी नंबर प्लेट दिली जाते. या प्लेटवर काळ्या रंगाने नंबर लिहिलेले असतात.(Marathi News)

Vehicles Number Plates

हिरव्या रंगाची नंबर प्लेट:
भारतात पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेल्या वाहनांना हिरव्या रंगाची नंबर प्लेट लावली जाते. इलेक्ट्रिक कार आणि बाईक, ई-रिक्षा आणि ई-बसला या हिरव्या नंबर प्लेट लावलेल्या असतात. या हिरव्या रंगाच्या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगाने अक्षरे लिहिलेली असतात. (Trending News marathi)

Vehicles Number Plates

निळ्या रंगाची नंबर प्लेट:
परदेशातून आलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना वाहतूक करण्यासाठी दिलेल्या गाडीवर निळ्या रंगाची नंबर प्लेट लावलेली असते. या नंबर प्लेटवर वेगवेगळे कोड देखील दिलेले असतात. UN अर्थात हा कोड युनायटेड नेशन्सचा आहे, CC हा कोड कॉन्सुलर कॉर्प्ससाठी आहे आणि DC हा डिप्लोमॅटिक कॉर्प्ससाठी असलेला कोड आहे. त्या गाड्यांमध्ये ज्या देशातील अधिकारी आहेत त्या देशाचा कोड गाडीच्या नंबर प्लेटवर लावला जातो.(Latest News)

Vehicles Number Plates

लाल रंगाची नंबर प्लेट:
भारतात RTO कडून पर्मनंट रजिस्ट्रेशनच्या प्रतीक्षेत असलेल्या वाहनांना लाल नंबर प्लेट दिली जाते. टेम्पररी नोंदणीची वैधता साधारण एक महिन्याची असते. मात्र या तात्पुरत्या नोंदणीबाबत प्रत्येक राज्याचे स्वतःचे वेगवेगळे नियम आहेत. काही राज्यांमध्ये लाल नंबर प्लेट असलेल्या वाहनांना रस्त्यावर आणण्यास परवानगी नसते. जी वाहनं अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतात किंवा विशेष अधिकार असलेल्या व्यक्तींना ज्या वाहनांमध्ये असतात त्यांना लाल रंगाची नंबर प्लेट दिली जाते. (Marathi Top News)

Vehicles Number Plates

काळी नंबर प्लेट:
काळ्या नंबर प्लेट्सवर पिवळ्या अक्षरात नंबर असतो. काळ्या नंबर प्लेट असलेली वाहने भाड्याने गाड्या देण्याच्या व्यवसायाशी संबंधित असतात. गाडी भाड्याने घेतली तर त्यावर काळी नंबर प्लेट असते. ही नंबर प्लेट असलेली वाहने साधारणपणे मोठी लक्झरी हॉटेल्समध्ये वापरली जातात. ही नंबर प्लेट असलेली वाहनं चालविण्यासाठी चालकाकडे परवानगी नसली तरी चालते.(Indian Number Plate)

Vehicles Number Plates

वरच्या दिशेने बाण असलेली नंबर प्लेट
आपण जर कधी लक्ष दिले असेल तर काही वाहनांवर वरच्या दिशेने बाण आणि खाली त्या वाहनाचा नंबर लिहिलेला असतो. अशी वाहने संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण मंत्रालयाची असतात. संरक्षण मंत्रालयाच्या वाहनासाठी वरच्या दिशेने बाण असलेली नंबर प्लेट वापरली जाते.(News Marathi)

Vehicles Number Plates

======

हे देखील वाचा : Tungnath Temple : जाणून घ्या जगातील सर्वात उंच तुंगनाथ महादेव मंदिराबद्दल

======

भारतीय चिन्ह असलेली लाल नंबर प्लेट
काही वाहनांच्या नंबर प्लेटवर फक्त भारताचे राष्ट्रीय चिन्ह असते. भारताचे राष्ट्रपती आणि प्रत्येक राज्याच्या राज्यपालांच्या वाहनांना ही लाल रंगाची नंबर प्लेट वापली जाते. अशा वाहनांवर लाल रंगाच्या प्लेटवर भारतीय चिन्ह कोरलेले असते.

Vehicles Number Plates


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.