Home » Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?

Ganesh Chaturthi : गणपती बाप्पाला दुर्वा का वाहिल्या जातात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ganesh Chaturthi
Share

गणेशोत्सव अगदीच तोंडावर आला आहे. त्यामुळे बाप्पांच्या तयारीला कमालीचा वेग आला आहे. २७ ऑगस्टला गणेश चतुर्थीचा सण सुरु होत आहे. या दिवशी सर्वत्र वाजतगाजत बाप्पांचे आगमन होणार आहे. त्यामुळे सर्वांच्याच उत्साहाला मोठे उधाण आले आहे. बाप्पांच्या पूजेची देखील तयारी जोरदार सुरु आहे. जेव्हा जेव्हा बाप्पांच्या पूजेविषयी बोलतो, तेव्हा तेव्हा सर्वात आधी ‘दुर्वा’ येतात. गणपती बाप्पाला दुर्वा सर्वात जास्त प्रिय आहे. त्यांची पूजा करताना कधी कधी जर तुम्ही बाप्पाला दुर्वा वाहिल्या आणि मनापासून प्रार्थना केल्यास देखील आपली इच्छा पूर्ण होते. एवढी ताकद दुर्वांमधे आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का, बाप्पाला दुर्वाचा का वाहिल्या जातात आणि त्या देखील २१? आज आपण या लेखातून याबद्दल माहिती जाणून घेऊया. (Ganesh Chaturthi)

बाप्पांना दुर्वा वाहण्यामागे एक आख्ययिका आहे
एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होतं. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या. परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तूला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोल्यावरुन यमधर्म घाबरुन पळून गेला. (Marathi News)

अनलासुराने तांडव करण्यास सुरु केला. त्याला समोर जे दिसेल ते खात सुटला. अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले. परंतु अनलासुर तेथेही पोहचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले. गणपती बालक रूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले. तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे कठिण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्याजागी उभे राहिले. अनलासुर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलू लागला तेच अनलासुराच्या हातातील बाल गणपतीने प्रचंड रूप धारण केले. आभाळापर्यंत भिडलेले विराट रुप बघून अनलासुराला काही सुचेल तोपर्यंत गजाननाने एक क्षणात अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून घेतले. (Top Marathi News)

अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपतीचा त्रास बघून समस्त देव, ऋषी, मुनी उपचार सुरू केले. परंतु कशाचाही उपयोग होईना. शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८८ हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी २१ दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वाचे अत्यंत महत्त्व आहे. गजाननाने म्हटले की ज्या दुर्वांमुळे माझ्या अंगाचा दाह शमला, या दूर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्‍तींची सर्व पापे नाहीसे होतील. व्यक्तीला बुद्धी, सिद्धी प्राप्त होईल. (Todays Marathi Headline)

Ganesh Chaturthi

यासोबतच अजून एक कथा सांगितली जाते आणि ती म्हणजे, जेव्हा भगवान महादेवांनी गणपती बाप्पाचा शिर धडा वेगळं केलं त्यानंतर बाप्पाला हत्तीचं शिर बसवण्यात आलं. तेव्हा बाप्पाच्या शरीराचा दाह होऊ लागला. हा दाह क्षमण करण्यासाठी सर्व देव आणि राक्षसांनी मिळून गणपती बाप्पाच्या डोक्यावरती दुर्वा अर्पण केल्या. त्यानंतर बाप्पाच्या शरीराचा दाह क्षमन झाला. (Latest Marathi Headline)

बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा किंवा नैवेद्यातील मोदक २१ या संख्येतच का दाखवले जातात? यामागे देखील एक कारण आहे. प्रत्येक देवतेच्या काही संख्या आहेत जसे १२ रवि, ११ रुद्र म्हणजेच शंकर त्याप्रमाणे गणेशाची संख्या २१ आहे म्हणून २१ मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. त्याप्रमाणे याच संख्येमुळे २१ दुर्वांची जुडी किंवा २१ पत्री वाहिल्या जातात. गणपतीला दुर्वा अर्पण करताना ॐ गं गणपतये नमः दुर्वांकुरान् समर्पयामि। या मंत्रांचा जप करावा. (Top Trending News)

दुर्वांचे महत्व काय ?
दुर्वांचा उपयोग शरीराचा दाह, उष्णता कमी होण्यासाठी होतो, पण दुर्वांचा फक्त तेवढाच उपयोग नाही. दुर्वा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असून त्वचाविकारांपासून ते पचन संस्थेतील दोष कमी करण्यापर्यंत अनेक आजारांवर दुर्वा फायदेशीर आहेत. दुर्वांचा रस घेण्याचा सल्ला देखील तज्ज्ञ देतात. ज्या व्यक्तींना सतत उष्णतेचा त्रास होतो, अशा व्यक्तींसाठी दुर्वा लाभदायक आहेत. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी दुर्वांच्या रसाचा वापर करता येतो. (Latest Marathi News)

गणपती बाप्पाला दूर्वा आणि लाल जास्वंदाची फुले अर्पण केली जातात, गणपती बाप्पाला लाल रंगाची फुले खूप आवडतात आवडतात, त्यामुळे शक्यतो पूजेच्या वेळी गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल रंगाची फुले आणि अर्पण करावे. या ऋतूमध्ये खूप वेगवेगळ्या रंगाचे सुगंधी फुले येतात, तसेच गणपती बाप्पाला मोदक सुद्धा खूप आवडतात त्यामुळे प्रसादामध्ये मोदकाच्या वापर करावा. (Top Marathi News)

दुर्वा म्हणजे गवत. जे सहजपणे कुठेही उपलब्ध होते. दुर्वांच्या एका जुडीत २१ दुर्वा असतात. या जुडीसाठी प्रत्येक दुर्वा निवडताना त्यात त्रिदल असलेले पाते निवडले जाते. त्याची जुडी सुटू नये म्हणून दोऱ्याने बांधली जाते. अनेक ठिकाणी अशा २१ जुड्यांचा हार बनवून देवाला दुर्वांची कंठी घातली जाते. त्यानिमित्ताने दुर्वांची जुडी बनवताना अथर्वशीर्षाची २१ आवर्तने देखील केली जातात. वेळेअभावी ते शक्य नसेल, तर निदान एक जुडी तरी स्वहस्ते बनवून एक आवर्तन म्हणून गणरायाला दुर्वा अर्पण कराव्यात. तेही शक्य नसेल, तर निदान दुर्वाचे एक त्रिदल त्याचा अग्रभाग अर्थात टोकाची बाजू आपल्याकडे घेऊन निमुळती बाजू बाप्पाकडे ठेवून भक्तिभावे अर्पण करावी. (Social News)

==============

हे देखील वाचा : Lord Shiva : महादेवाचे वाहन असणाऱ्या नंदीबद्दल रंजक माहिती

Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ

==============

२१ दुर्वांचे आध्यात्मिक अर्थ
1. एकाग्रता – मन एकवट करण्याची सुरुवात
2 द्वैत निवृत्ती – मी-ते, सुख-दुःख यापलीकडे जाणे
3 त्रिगुण शमन – सत्त्व, रज, तम यांवर संयम
4 चतुर्वेद पूजन – ज्ञानप्राप्तीची दिशा
5 पंचतत्त्व साक्षात्कार – पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचे संतुलन
6 षड्चक्र जागृती – मूलाधार ते आज्ञा चक्रापर्यंतची ऊर्जा प्रवाह निर्मिती
7 सप्तधातू शुद्धी – शरीरातील सात धातूंची निर्मळता
8 अष्टदिशा रक्षण – संपूर्ण जीवनात रक्षणभाव
९ नवग्रह शांतता – ग्रहदोष निवारण
10 दशदिक्बंधन निर्मूलन – दहा दिशांमधील निगेटिव्ह ऊर्जा शमवणे
11 एकादश रुद्र तत्त्व प्रबोधन – रुद्रतेज जागवणे
12 द्वादश आदित्य तेज जागरण
13 त्रयोदशी – मृत्युतत्त्वावर विजय
14 चतुर्दशी – मनातील भयावर मात
15 पूर्णिमा – समृद्धी आणि शांतीची प्राप्ती
16 सोडस संस्कार जागृती – जीवनातील महत्त्वाचे संस्कार जागृत करणे
17 सप्तर्षि स्मरण – ऋषिमार्गाची स्मृती
18 अष्टसिद्धींची प्राप्ती
19 नवविधा भक्तीचा अभ्यास
20 विश्वरूप दर्शनाची पात्रता
21 पूर्ण आत्मसमर्पण – त्वमेव सर्वं भावसंपन्न पूर्ती

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.