अहमदाबादमधल्या विमान अपघाताने सर्वांनाच सुन्न केले आहे. जवळपास २५० लोकांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विमान अपघात होता. टेकऑफ नंतर केवळ काही सेकंदात हे विमान एका होस्टेलवर कोसळले. सव्वा लाख लिटर पेट्रोल असलेल्या या विमानाने पडताचक्षणी पेट घेतला आणि संपूर्ण विमान प्रवाशांसह जळून खाक झाले. विमान प्रवास हा खूपच धोकादायक प्रवास आहे. या अपघातानंतर आपण विमान प्रवासाशी संबंधित विविध बातम्या, विविध नियम वाचत किंवा ऐकत आहोत. (Marathi NEws)
वरून खाली पडणे म्हणजे थेट मृत्यूचं. त्यामुळे विमान प्रवास करताना आपण नेहमीच आपल्याला सांगितल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केलेच पाहिजे. विमानात बसल्यानंतर आपल्याला अनेक सूचना दिल्या जातात यातलीच एक सूचना म्हणजे आपल्या मोबाईल फोन Flight Mode वर टाकावा. मात्र आपल्यातले बरेच लोकं ही सूचना एकूण देखील तिचे पालन करत नाही. तिच्याकडे कानाडोळा करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का, की, विमानात बसल्यानंतर आपल्याला मोबाईलला Flight Mode वर का टाकायला सांगितले जाते? नाही…चला मग जाणून घेऊया याचेच उत्तर. (Todays Top Headline)
फ्लाइट मोडचा पर्याय आपल्या सर्वांच्या मोबाईलमध्ये असतो. फ्लाईट मोड चालू होताच फोनचे नेटवर्क बंद होऊन जाते. विमान प्रवासादरम्यान मोबाईल फोन फ्लाइट मोडमध्ये न ठेवल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर विमानात फ्लाइट मोड चालू नसेल तर मोबाईल फोनच्या सिग्नलचा परिणाम थेट विमानाच्या कम्युनिकेशन सिस्टमवर होऊ शकतो. विमानाच्या कम्युनिकेशन सिस्टमवर परिणाम झाला तर पायलटला संवाद साधण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. विमानात असताना फोनचा वापर केल्यामुळे विमानाच्या नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टममध्ये व्यत्यय येऊ शकतो. म्हणूनच विमानात सर्वात आधी फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. (Marathi Latest News)
विमान प्रवासादरम्यान फोन फ्लाइट मोडमध्ये नसल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. विमानात फ्लाईट मोड चालू न केल्यास मोबाइल फोनच्या सिग्नलमुळे विमानाच्या संपर्क यंत्रणेवर परिणाम होतो आणि पायलटला कंट्रोल रूमशी संपर्क साधण्यात अडचणी येऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून सिग्नल निघतात. त्याचा फ्लाइट कम्युनिकेशन सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो. सेल्युलर कनेक्शन असलेली डिव्हाइसेस रेडिओ लहरींसोबत विद्युतचुंबकीय लहरी निर्माण करतात. त्यामुळे विमानाला सिग्नल मिळण्यात अडचणी येतात. त्यासाठी विमानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बंद करण्यास आणि फोन फ्लाइट मोडमध्ये ठेवण्यास सांगितले जाते. (Social News)
===========
हे देखील वाचा : Plane Crash : ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सच सांगतो अपघाताचे कारण
Plane Crash: विमान कोसळण्यापूर्वी पायलटचा Mayday कॉल, मात्र Mayday म्हणजे काय?
===========
अनेक देशांच्या एव्हिएशन एजन्सी, भारतातील डीजीसीएसारख्या यंत्रणा फ्लाइटमध्ये फोन व इतर डिव्हाइस फ्लाइट मोडवर ठेवण्याचे आदेश देते.त्यामुळे विमानाचा मार्ग चुकू शकतो किंवा अपघात होऊ शकतो. १९९० च्या दशकात एअरलाइन्स कंपन्यांच्या लक्षात आले की, मोबाइल फोनमधून निघणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी फ्लाइटच्या कम्युनिकेशन सिस्टीमवर परिणाम करू शकते. त्यानंतर असे नियम तयार करण्यात आले. विमानात फ्लाइट मोड ऑन करण्याचा नियम सर्वांत आधी १९९६ साली अमेरिकेत बनवण्यात आला होता. (Marathi Top Stories)