आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण अशा परंपरा आणि रीती आहेत, ज्या पाळताना आपल्याला देखील अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक सण, प्रत्येक खास दिवस साजरे करण्यामागे एक शास्त्र आणि एक विचार लपलेला आहे. या सर्व गोष्टींचा आपण नीट विचार केल्यास आपल्याला या सर्व गोष्टी नीट लक्षात येतील. आता आपल्याकडे वाढदिवसाला, खास दिवशी औक्षण करण्याची खूपच जुनी परंपरा आहे. काही ठिकाणी औक्षण तर काही ठिकाणी याला आरती, ओवाळणे, तिलक करणे आदी अनेक नावांनी ओळखले जाते. (Marathi)
आपल्या महाराष्ट्रामध्ये औक्षण करण्याची पद्धत खूपच प्रसिद्ध आहे. कोणत्याही आनंदाच्या क्षणी औक्षण केले जाते. जसे की, वाढदिवसाला, भाऊबीजेला, रक्षाबंधनाला, केळवणाला, अश्विन पौर्णिमेला, पाडव्याला. दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला आणि भाऊबीजेला बहिण -भावाला ओवाळते, त्याचे औक्षण करते. हिंदू धर्मात औक्षण करणे शुभ मानले जाते. औक्षण हा छोटासा मात्र अतिशय अर्थपूर्ण आणि महत्वाचा धार्मिक विधी आहे. मात्र औक्षण करणे म्हणजे नक्की काय?, औक्षण करण्याचा अर्थ काय?, औक्षण का केले जाते? ही औक्षण परंपरा कशी सुरु झाली? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही..चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. (Diwali)
औक्षण हा संस्कृत शब्द आहे. आयुष्य वृद्धीसाठी औक्षण केले जाते. सकारात्मक शक्ती दीपकज्योतीच्या प्रकाशात अधिक क्रियाशील होतात आणि ज्यांचे औक्षण करत आहोत त्याचे संरक्षण करतात, अशी धारणा आहे. मानवासह प्राण्यांचे देखील औक्षण केले जाते. ‘औक्ष’ हा शब्द आयुष्य, आरोग्य आणि मांगल्य यांच्याशी संबंधित आहे, तर ‘ण’ या शब्दाचे ‘अक्षय्य रहाणे’, ‘वृद्धी होणे’ किंवा ‘टिकून रहाणे’, असे अर्थ आहेत. ‘औक्षण करणे’ हे व्यक्तीशी संबंधित आहे. ‘व्यक्तीला चांगले आरोग्य आणि आयुष्य प्राप्त होऊन ते वृद्धींगत व्हावे’, यासाठी केलेला धार्मिक विधी, म्हणजे ‘औक्षण’. औक्षणाचा सोपा अर्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिव्याने ओवाळणे. कोणत्याही शुभ, उत्तम क्षणांचे स्वागत करताना औक्षण केले जाते. विश्वातून भूमीवर उतरणाऱ्या अध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी दिपज्योतीच्या प्रकाशात अधिक क्रियाशील होतात म्हणून औक्षण केले जाते. (Todays Marathi Headline)
हिंदू धर्मामध्ये औक्षण हे शुभ मानले जाते. लग्न कार्याच्या वेळी अथवा इतर शुभ प्रसंगी देवाची मूर्ती किंवा ज्यांचे मंगलकार्य असेल त्यास त्यांच्या चेहर्याभोवती सुवासिनीने ओवाळण्यासाठी घेतलेले दिपादियुक्त ताम्हन तसेच सदर ताम्हन ओवाळण्याच्या क्रियेला औक्षण असे म्हणतात. औक्षण करताना दिव्याच्या साहाय्याने उत्सर्जित होणार्या किंवा प्राप्त झालेल्या लहरी आरती करणार्या व्यक्तीच्या शरीराभोवती फिरणारे संरक्षक कवच तयार करतात. (Diwali padwa)
कोणतेही शुभ कार्य करताना मनापासून, सात्विक भाव ठेवून औक्षण केल्याने देवांचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते. औक्षण करीत असताना हलणाऱ्या दिव्याच्या ज्योती समोरच्या व्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात. या हलणाऱ्या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात, त्यांचा नायनाट करतात. व्यक्तीचे रक्षण दिव्यातून बाहेर पडणारे किरण करत असतात. म्हणजेच अग्नीतत्वात या वाईट नकारात्मक शक्ती जाळून टाकण्याचे काम या औक्षणासाठी प्रज्वलित केलेले निरांजन करत असते म्हणतात. (Marathi News)
औक्षण कोणाचे करतात?
आपल्याकडे सण, समारंभ, वाढदिवस किंवा शुभ कार्यात औक्षण करण्याची प्रथा आहे. लहान बाळ, गुणी व्यक्ती, युद्धावर जाणारे सैनिक, देव, संत, महात्मे, पवित्र झाडे, महान कार्य करणाऱ्या स्त्रिया, पुरुष,नवजात बालके, भाऊ, नवदांपत्य इत्यादीचे औक्षण करावे. (Top Trending Headline)
औक्षण कधी करावे?
‘औक्षण’ हे विविध प्रसंगी केले जाते यात मुख्यत: गुढीपाडवा , श्रावण शुक्रवार , नरक चतुर्दशी दिवाळी पाडवा या दिवशी घरातील ‘कर्त्या स्त्री’ कडून अन्य ‘सर्वांना’, आश्विन पौर्णिमेस ‘माते’ कडून ‘ज्येष्ठ अपत्यास’ बलिप्रतिपदेस ‘पत्नी’ कडून ‘पतीस’, यमद्वितीयेच्या ( भाऊबीज ) दिवशी ‘भगिनी’ कडून ‘भावास’ औक्षण केले जाते. तसेच वर्धापनदिनी ( वाढदिवशी ) शांतिकर्मा दिवशी, प्रपौत्रमुखदर्शन सोहळा असतो. या दिवशी तसेच घरातील मंगलकार्य प्रसंगी केल्या जाणाऱ्या ‘पुण्याहवाचना’ मध्ये ‘औक्षण’ करतात. ‘औक्षण’ करण्याचा अधिकार ‘सर्व स्त्रियांना’ आहे. औक्षणाच्या वेळी प्रथम देवांस तूपाच्या वातीच्या एका निरांजनाने ओवाळल्यानंतर मुख्य व्यक्तींना ‘औक्षण’ करावे. (Top Marathi News)
औक्षण कुठे करावे?
आपल्याकडील मंगलकार्य मंडपात होते त्यामुळे तिथे औक्षण केले जाते. घराच्या आत औक्षण करावे. उंबरठा ओलांडून आत आल्यावर औक्षण केले जाते. औक्षण करत असताना दिशांचेही भान ठेवावे लागते. पूर्व पश्चिम बसवूनच औक्षण करावे असे सांगितले जाते. (Marathi Latest Headline)
औक्षण कसे करावे?
औक्षण करीत असताना देवासमोर पाट अथवा चौरंग मांडून, सभोवार रांगोळी घालून त्यावर व्यक्तीला बसविले जाते. औक्षणामध्ये एका तबकात तेलाचे निरांजन, हळद कुंकू, अखंड तांदुळाच्या अक्षता, एक अखंड सुपारी आणि एक सुवर्णालंकार (छोटी अंगठी ) या वस्तु घेतल्या जातात. औक्षणार्थीस प्रथम कुंकुमतिलक करावा. त्यानंतर मस्तकावर अक्षता ठेवाव्या (औक्षणार्थीच्या मस्तकावर टोपी किंवा रुमाल असावा). त्यानंतर सुपारी प्रथम मस्तकास लावून, ती ‘उजवी’ कडून ‘डावी’ कडे सावकाशपणे वर्तुळाकार एकदाच ओवाळावी(फिरवावी). नंतर ‘सुवर्णालंकार’ मस्तकास लावून तो ‘डावी’ कडून ‘उजवी’ कडे सावकाशपणे वर्तुळाकार एकदाच ओवाळावा नंतर तबकासह निरांजन सुध्दा सावकाशपणे वर्तुळाकार एकदाच ओवाळावे. (Top Stories)
औक्षणामध्ये लागणाऱ्या वस्तूंचा अर्थ
औक्षणाच्या ताटात असलेले हळद आणि कुंकु कोणत्याही कामाला शक्ती देणार्या शक्तीचे प्रतीक म्हणून ठेवले जाते. हळदी-कुंकुमधून निघणाऱ्या सूक्ष्म-सुगंधाकडे, ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या देवतांचे शुद्धतावादी त्वरीत आकर्षित होतात. तर साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी, प्रकाश याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंध:कार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी. तर अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणार्या शिवाचे (पुरुषतत्त्वाचे) प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. (Top Trending News)
=========
Padwa 2025 : पाडव्याला पतीचे औक्षण करण्यामागे देखील आहे मोठे कारण
Balipratipada : जाणून घ्या बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याचे महत्त्व
=========
सोन्याने ओवाळण्याचा अर्थ सोन्या सारखे निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य त्याला लाभावे हा होय. सुपारी सारखे टणक आणि अविनाशी आयुष्य लाभावे. म्हणून सुपारीने औक्षण करावे. अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी असा असल्याने तबकातील अक्षता कपाळी लावून डोक्यावर टाकतात. तर सर्वात शेवटी कापूस ओवाळून डोक्यावर ठेवायचा आणि म्हणायचे कापसासारखा म्हातारा हो असे म्हणायचे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics