Home » New Year : का दरवर्षी १ जानेवारीलाच साजरे केले जाते नवीन वर्ष?

New Year : का दरवर्षी १ जानेवारीलाच साजरे केले जाते नवीन वर्ष?

by Jyotsna Kulkarni
0 comment
New Year
Share

अवघ्या काही तासातच २०२५ हे वर्ष संपून २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. संपूर्ण जग २०२६ या नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करत आहे. दर वर्षीप्रमाणे यंदाही आज म्हणजेच ३१ डिसेंबरच्या रात्री जल्लोष आणि आनंद साजरा केला जाईल आणि १ जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. ग्रेगॅरियन कॅलेंडर किंवा इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आज २०२५ या वर्षाची समाप्ती होत आहे. या वर्षाने दिलेल्या चांगल्या, कटू आठवणी सोबत घेऊन संपूर्ण जग आज रात्री १२ नंतर २०२६ या नवीन वर्षात प्रवेश करेल. (New Year)

दरवर्षी ही ३१ डिसेंबरला चालू वर्षाची समाप्ती होते आणि नवीन इंग्रजी वर्ष सुरु होते. हे खूप दशकांपासून चालत आले आहे. मात्र ३१ डिसेंबरला चालू वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात हे कसे सुरु झाले?, १ जानेवारीपासूनच का नवीन वर्ष सुरू होते? वर्षात नेहमी ३६५ दिवस आणि १२ महिनेच का असतात? वर्षाला १२ महिने देण्यात हिंदू दिनदर्शिकेचा हात आहे का? हिंदू, रोमन रिपब्लिकन आणि ग्रेगॅरियन कॅलेंडर केव्हा आले? असे प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडत असतील ना आज २०२५ वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. (Todays Marathi HEadline)

आता १ जानेवारीला साजरे होणारे नवीन वर्ष पूर्वी १ जानेवारीला साजरे होत नव्हते. १ जानेवारी ला नवे वर्ष साजरे करण्याची सुरुवात १५ ऑक्टोबर १५८२ पासून झाली. पूर्वी ते कधी २५ मार्चला तर कधी २५ डिसेंबरला साजरे केले जायचे. इ.स.पूर्व ४५ पूर्वी रोमन साम्राज्यात कॅलेंडर वापरले होते. रोमचा तत्कालीन राजा नुमा पॉम्पिलस याच्या वेळी, रोमन कॅलेंडरमध्ये १० महिने, वर्षात ३१० दिवस आणि आठवड्यात ८ दिवस होते. काही काळानंतर, नुमाने कॅलेंडरमध्ये बदल केले आणि जानेवारी हा कॅलेंडरचा पहिला महिना असल्याचे जाहीर केले. १५८२ मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर सुरू झाल्यानंतर १ जानेवारी रोजी नवीन वर्ष साजरे करण्याचा ट्रेंड सुरू झाला. (Top Marathi News)

New Year

१५८२ पूर्वी वसंत ऋतूमध्ये नवीन वर्ष मार्चपासून सुरू होत असे, परंतु नुमाच्या निर्णयानंतर जानेवारीपासून वर्ष सुरू झाले. वास्तविक, मार्च महिन्याचे नाव रोमन देव मार्सच्या नावावरून ठेवण्यात आले होते, जो युद्धाचा देव होता. जानेवारी हा रोमन देव जॅनसच्या नावावरून घेतला गेला आहे, ज्याला दोन तोंड होते, समोरचे तोंड सुरुवातीचे मानले गेले आणि मागील तोंड शेवट मानले गेले. नुमाने वर्षाच्या सुरुवातीसाठी सुरुवातीची देवता जानसची निवड केली आणि अशा प्रकारे जानेवारी हा वर्षाचा पहिला महिना बनला. रोमन शासक ज्युलियस सीझरने १ जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू केल्याचे सांगितले जाते. ज्युलियन कॅलेंडरमध्ये वर्षात १२ महिने होते. ज्युलियस सीझर, खगोलशास्त्रज्ञांना भेटल्यानंतर, पृथ्वी ३६५ दिवस आणि सहा तासांमध्ये सूर्याभोवती फिरते हे समजले. त्यावरूनच ज्युलियन कॅलेंडरमध्ये एका वर्षात ३१० ऐवजी ३६५ दिवस केले होते. (Latest Marathi Headline)

ग्रेगोरियन कॅलेंडर
सध्या प्रचलित असलेल्या कॅलेंडरला ग्रेगॅरियन कॅलेंडर म्हणतात. १५८२ मध्ये, पोप ग्रेगरी यांना ज्युलियन कॅलेंडरमध्ये लीप वर्षाची चूक आढळली. त्या काळातील प्रसिद्ध धर्मगुरू संत बेडे म्हणाले की, वर्षातील ३६५ दिवस ६ तासांऐवजी ३६५ दिवस ५ तास ४६ सेकंद असतात. अशा प्रकारे रोमन कॅलेंडरमध्ये बदल करून नवीन दिनदर्शिका तयार करण्यात आली आणि तेव्हापासून १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा सुरू झाली.  (Top Trending News)

=======

New Year : नवीन वर्षात ‘हे’ संकल्प करून २०२६ चे करा दणक्यात स्वागत

New Year : गोव्यात न्यू इअर पार्टी करायची मग ‘ही’ ठिकाणं आहेत बेस्ट

=======

लीप वर्ष
लीप वर्षाची संकल्पना दिवस मोजण्यात ६ तास शिल्लक राहिल्यास देण्यात आली. हेच कारण आहे की दर ४ वर्षात हे ६ तास मिळून २४ तास म्हणजेच एक दिवस बनतात. या कारणास्तव प्रत्येक चौथ्या वर्षी फेब्रुवारी २९ दिवसांचा करण्यात आला आणि हे वर्ष लीप वर्ष म्हणून ओळखले गेले. युरोपमधील बहुतांश देशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर त्वरित स्वीकारले. पण ग्रेट ब्रिटन आणि त्याच्या वसाहतींनी १७५२ पर्यंत या प्रणालीला विरोध केला. नंतर ब्रिटिश संसदेत सुधारित प्रणाली स्वीकारण्यात आली. आधी भारतात देखील विक्रम संवत हे हिंदू कॅलेंडरच पाळले जायचे, मात्र १९४७ भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी हे इंग्रजी कॅलेंडर स्वीकारले. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.