आपल्याकडे सोने आणि चांदी या धातूंना मोठे महत्व आहे. आज सोने चांदीचे भाव सामान्य लोकांच्या खिशाला अजिबातच परवडणारे नाही. सोने चांदी खरेदी करणे आता स्वप्नवत झाले आहे. मात्र असे असले तरी पै अन पै जमा करून लोकं थोडे तरी सोने आणि चांदी घेतात. सणावाराला, लग्नप्रसंगी, इतर शुभ प्रसंगी सोन्या चांदीच्या दागिन्यांचे महत्व कमालीचे असते. त्यामुळेच सामान्य माणूस पैसा जमवून थोडे तरी सोने आणि चांदी घेत असतो. जर तुम्ही नीट निरीक्षण केले असेल तर आपण सोन्याचे किंवा चांदीचे दागिने घेतो तेव्हा ज्वेलर आपल्याला ते दागिने एका छानशा सुंदर डब्यात देतो. (Jewellery)
मात्र त्या डब्यात तो आधी एक गुलाबी रंगाचा कागद टाकतो आणि त्यावर आपले दागिने ठेऊन मग आपल्याला देतो. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. लहान शहरातील ज्वेलर्स असो किंवा मोठ्या शहरातील प्रसिद्ध ब्रँडेड ज्वेलर असो तुम्हाला या चमकदार गुलाबी कागदातच दागिने दिले जातात. या कागतात दागिने गुंडाळण्याची पद्धत खूपच जुनी आहे. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला की, ज्वेलरी कायम सोन्या चांदीच्या वस्तू या गुलाबी रंगाच्या कागदातच गुंडाळून का देतात? चला जाणून घेऊया याचेच उत्तर. (Marathi News)
गुलाबी रंगाच्या कागदात हे दागिने देण्यामागे फॅशनचा काहीही भाग नाहीये. किंवा गुलाबी रंग महिला वर्गाचा आवडता रंग आहे, म्हणून या रंगाच्या कागदात दागिने देतात असे देखील नाहीये. यामागे एक खास वैज्ञानिक आणि व्यावसायिक कारण आहे. दागिन्यांचा रंग ठळकपणे उठून दिसतो. गुलाबी रंग हे सोने, हिरे किंवा चांदीच्या झळाळीला अजून हायलाईट करतो. या रंगामुळे दागिन्यांतील बारकावे, चमक आणि डिझाइन अधिक उठून दिसतात. या कागदामुळे ग्राहकाला दागिने अधिक आकर्षक वाटतात. (Top Trending News)
सोनारांचा असा विश्वास आहे की गुलाबी कागदात दागिने पॅक करणे ही एक प्रकारची परंपरा आहे. दुकानदार प्राचीन काळापासून हे करत आहेत आणि कालांतराने हे सामान्य झाले आहे. जेव्हा एखादा ग्राहक दागिने खरेदी करण्यासाठी येतो आणि ते गुलाबी कागदात पॅक केले जाते तेव्हा तो ते सामान्य म्हणून स्वीकारतो. दागिने पॅक करण्याचा मुख्य उद्देश त्यांना ओरखडे आणि धुळीपासून वाचवणे आहे. जर दागिने कागद किंवा पॅकिंगशिवाय ठेवले तर त्यांच्या पृष्ठभागावर खुणा येऊ शकतात किंवा त्यांची चमक कमी होऊ शकते. गुलाबी कागद मऊ असतो आणि त्यात तो गुंडाळल्याने दागिन्यांच्या नाजूक पृष्ठभागाचे रक्षण होते. (Latest Marathi News)
रंगांचा आपल्या दृष्टिकोनावर थेट परिणाम होतो. गुलाबी रंग नेहमीच आकर्षण आणि चमकाशी संबंधित असतो. हेच कारण आहे की जेव्हा दागिने या कागदात पॅक केले जातात तेव्हा ते ग्राहकांना अधिक चमकदार आणि सुंदर दिसतात. गुलाबी कागदात हलकासा UV प्रोटेक्शन असतो.हा कागद सूर्यप्रकाशात किंवा लाईटमध्ये दागिन्यांची चमक कमी होऊ देत नाही. विशेषतः हिरा आणि मौल्यवान खडे यांना प्रकाशाचा जास्त परिणाम होतो. (Top Marathi News)
=========
Kitchen Tips : पूजेची तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
=========
अनेक ज्वेलर्ससाठी गुलाबी कागद ही एक ओळख झाली आहे. काही ज्वेलर्स त्यावर आपले लोगो किंवा नाव छापून ब्रँडिंगही करतात. दागिने फक्त विकण्याची वस्तू नाही, ती भावना असते त्यामुळे त्याची सादरीकरण खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच गुलाबी कागद फक्त सौंदर्याचा भाग नाही, तर दागिन्यांची सुरक्षितता, आकर्षण आणि ब्रँड वैल्यू टिकवण्याचं एक व्यावसायिक माध्यम आहे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics