यावर्षी NEET UG परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. NEET UG २०२४ ही परीक्षा यापूर्वी २३ जून रोजी होणार होती. मात्र, पेपर लीक आणि परीक्षेत गोंधळामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रामध्ये घेतली जाणार आहे. (Mediacal Education In Abroad)
NEET म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट ही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी या केंद्रीय संस्थेमार्फत या परीक्षा घेतल्या जातात. ही परीक्षा पास केल्यानंतरच तुम्हाला वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येतो.
आपल्याकडे मुलं मोठी होऊ लागली की त्यांना सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, ‘तुला मोठे होऊन काय व्हायचे आहे?’ या प्रश्नावर अर्ध्याहून अधिक मुलांची उत्तर असतात ‘डॉक्टर’. मात्र डॉक्टर होणे हे अजिबातच सोपे नाही. त्यासाठी नीट ची परीक्षा पास करावी लागते आणि मगच तुम्हाला प्रवेश मिळतो. ही परीक्षा पास होणे खूपच कठीण आहे. संपूर्ण देशातील सर्वात मोठी परीक्षा म्हणून ‘नीट’ परीक्षेला ओळखले जाते.
यावर्षी नीट परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झाला तो अनपेक्षित होता. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु झाल्यानंतर तिथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणले होते. मात्र आपल्या देशात शिक्षण घ्यायचे सोडून हे विद्यार्थी इतर देशात जाऊन का मेडिकलचे शिक्षण घेतात? या लेखातून जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर.
एका आकडेवारीनुसार 2022 मध्ये भारतातून एकूण 7 लाख 50 हजार 365 विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेले होते. 2021 च्या तुलनेत 69 टक्क्यांनी यात वाढ झालेली होती. या असंख्येत दिवसंदिवस वाढच होताना दिसत आहे. भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. यात मुख्यत्वे मेडिकलची जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. भारतामध्ये अशा काय कमतरता आहे ज्यांमुळे विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे लागते चला जाणून घेऊया.
भारतामध्ये वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्यासाठी नीट ची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत तुम्हाला नुसते पास होऊन चालत नाही, तर त्याला विशिष्ट गुण असणे आवश्यक असते. जर तुम्हाला नीट परीक्षेत कमी गुण असतील तर खाजगी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागतो. सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मेरिट लिस्टमध्ये येणे आवश्यक आहे. मात्र जर मेरिट लिस्टपेक्षा कमी मार्क्स आले तर त्या मुलांना खूपच जास्त पैसे भरून प्रवेश मिळवावा लागतो.
======
हे देखील वाचा : मॉन्सूनमध्ये साडीत आकर्षक दिसण्यासाठी टिप्स
======
खासगी महाविद्यालयांमध्ये मेरिट लिस्टमध्ये न आलेल्या मुलांना फक्त प्रवेश मिळवण्यासाठी तब्बल एक कोटींपेक्षा जास्त रक्कम भरावी लागते. त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षाचे वेगळे पैसे भरावे लागतात. आपण पाहिले तर मेडिकल क्षेत्रात ४८ टक्के जागा या खासगी महाविद्यालयासाठी असून, उरलेल्या जागा सरकारी महाविद्यालयांत आहेत. सरकारी महाविद्यालयांत जवळपास अडीच लाखांत वैद्यकीय परीक्षेची पदवी पूर्ण होते.
आपल्या देशात मेडिकलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यापीठं विविध शिष्यवृत्ती देखील देतात. त्यामुळे मुलांवरील आर्थिक बोजा देखील कमी होतो. यासोबतच जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये शिक्षण घेता येते. परदेशात वैद्यकीय क्षेत्राला जास्त कोणी प्राधान्य देत नसल्यामुळे तिकडे खूप सहज मुलांना प्रवेश उपलब्ध होतो. सोबतच परदेशात स्पर्धा कमी असल्यामुळे प्रवेश परीक्षांचा कट ऑफ सोपा असतो.