Home » Instagram Feed : इंस्टाग्रामवर अश्लील आणि हिंसक कंटेंटच का दिसतोय?

Instagram Feed : इंस्टाग्रामवर अश्लील आणि हिंसक कंटेंटच का दिसतोय?

by Team Gajawaja
0 comment
Instagram Feed
Share

गेल्या दोन- तीन दिवसांत तुमच्या इंस्टा फीडवर मोठ्या प्रमाणात अश्लील, हिंसक, Sensitive कंटेंट आला असेल. त्यावर इंस्टाग्राम गंडलं आहे, इंस्टाग्रामचं डार्क वेब झालं आहे. असे Meme सुद्धा येऊ लागले आहेत. पण अचानक इंस्टाग्रामवर या अश्लील, हिंसक कंटेंटचा पुर का आला आहे? लोकं ते जास्त प्रमाणात बघतात म्हणून इंस्टाग्राम स्वत:हून त्यांना हे फीड करतय का? हे सगळं जाणून घेऊ. (Social Media)

तर साधारण इंस्टाग्राम त्याच्या यूजरचं अल्गोरिदम हे त्याच्या आवडींनुसार तयार करतं, म्हणजे कोणत्या प्रकारच्या रील तो यूजर जास्त वेळ पाहतोय, त्याचा इंस्टाग्रामवर कंटेंट पाहण्याचा इतिहास आणि प्लॅटफॉर्मच्या डायरेक्शननुसार हे अल्गोरिदम तयार होत असतं. खरंतर, हा अश्लील, हिंसक कंटेंट इंस्टाग्रामकडूनच Restrict केलेला जातोआणि अशा लोकांनाच तो दाखवला जातो, जे जास्त वेळ तो कंटेंट पाहतात. पण जे लोक हा कंटेंट पाहत नाहीत, त्यांच्या फीडवर सुद्धा हा कंटेंट येतो आहे, खासकरून Explore पेजवर . जरी काही यूझर्सने Sensitive Content Control सेटिंग्ज लावल्या असल्या तरी देखील त्यांना या पोस्ट येत आहेत. (Instagram Feed)

आता असा कंटेंट रोखण्यासाठी इंस्टाग्राम AI आणि कंटेंट मॉडरेशन सिस्टमचा वापर करतं. मग तरी सुद्धा या रील्स अचानक का दिसू लागल्या? तर यावर मेटाने अद्याप काही Official स्टंटमेंट दिलेलं नाही. पण या समस्येची काही कारण असू शकतात. सर्वात शक्य कारण म्हणजे इंस्टाग्रामच्या Automated मॉडरेशन सिस्टिममध्ये आलेला हा glitch असू शकतो. AI कोणत्याही पोस्ट्समध्ये Sensitive कंटेंट स्कॅन करून ती पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यापासून थांबवतो. ते करण्यात सिस्टम अयशस्वी झाल्यामुळे सुद्धा हा कंटेंट सर्वत्र पाहायला मिळाला असावा. दुसरं म्हणजे इंस्टाग्राम सतत आपल्या अल्गोरिदममध्ये बदल करत असतं, ज्यामुळे यूजर आणखी टाइम इंस्टाग्रामवर स्पेंड करेल. यामुळेही अश्लील हिंसक कंटेंट अचानक वाढला असेल. (Social Media)

तर काहींना असं सुद्धा वाटतंय की, इंस्टाग्रामला हॅक करण्यात आलं आहे किंवा सिस्टमवर बाह्य हल्ला झाला आहे, ज्यामुळे sensitive फिल्टर्स वगळून हा कंटेंट दिसू लागला आहे. कधी कधी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स त्यांच्या प्लॅटफॉर्म्स त्यांच्या Content Recommendation Systems सुधारण्यासाठी टेस्ट चालवतात. जर इंस्टाग्राम नवीन अल्गोरिदम किंवा मॉडरेशन सेटिंग टेस्ट करत असेल, तर कदाचित त्याने जुने फिल्टर्स चुकून ओव्हरराईड केले असतील, ज्यामुळे अश्लील आणि हिंसक कंटेंट मोठ्या प्रमाणात पसरला. (Instagram Feed)

=============

हे देखील वाचा :Taliban : तालिबानने बामियानमधील बुद्धमूर्ती नष्ट का केल्या? 

=============

जर इंस्टाग्रामचाच हा glitch असेल तर ते हे सुधारण्याच्या आधी तुम्ही सुद्धा हा अशाप्रकारचा कंटेंट तुमच्या फीडवर येण्यापासून थांबवू शकता. त्यासाठी इंस्टाग्रामच्या सेटिंग्समध्ये कंटेंट Content Preferences वर जाऊन Sensitive Content मध्ये Less वर क्लिक केलं, तर हा कंटेंट तुमच्या फीडवर कमी होऊ शकतो. तसा कंटेंट आलाच, तर तुम्ही तो रीपोर्ट सुद्धा करू शकता. (Instagram Feed)

माणसाला Sexual आणि वॉयलेंस कंटेंट दाखवून जास्तीत जास्तवेळ एंगेज केलं जाऊ शकतं. पण यामुळे आपल्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो. असा कंटेंट पाहिल्यामुळे काही लोक जास्त संवेदनशील होतात आणि त्यांना भावनिक त्रास जास्त होतो. तर काहींना या हिंसक गोष्टी पाहण्याची सवय होते आणि त्यांच्या साठी हिंसा नॉर्मलाईज होते. म्हणजे इतरांच्या वेदना आणि दुःखांबद्दल त्यांची संवेदनशीलता कमी होते. अशा कंटेंटमुळे माणसाचा स्वभाव आणखी आक्रमक होतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.