पाकिस्तान हा एक इस्लामिक देश आहे. इस्लाम धर्मात दारुवर बंदी आहे. त्यामुळेच सच्चा मुस्लिम हा कधीच दारुचे सेवन करत नाही. परंतु हैराण करणारी गोष्ट अशी की, पाकिस्तानात गेल्या काही वर्षांपासून चीनी बिअर (Chinese Beer) ही खुप लोकप्रिय होऊ लागली आहे. परंतु हे खरं आहे की, इस्लाम धर्मासारख्या कट्टर धर्म असेल्या देशात बिअर लोकप्रिय होत आहे. अखेर पाकिस्तानात बिअर लोकप्रिय कशी झाली आणि ती सुद्धा चीनी बिअर? यामध्ये असे काय आहे त्याचा ब्रँन्ड हा पाकिस्तानातील काही ठिकाणी खुप प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाला आहे.
काही वर्षांपूर्वी पकिस्तानातील पश्चिम प्रांत बलूचिस्तानमध्ये एक चीनी कंपनीने बिअर प्लांट स्थापन केला. या प्लांन्टमधून केवळ बलूचिस्तानच नव्हे तर दक्षिणेला असलेल्या सिंध आणि व्यावसायिक राजधानी असलेल्या कराची पर्यंत बिअरचा पुरवठा केला जातो. या परिसरात बिअरची ही लोकप्रियता अधिक वाढल्याचे दिसून आले आहे.चीनी बिअर पसंद करणारी लोक असे म्हणतात की, याचे शानदार पॅकेजिंग, अगदी सहज होणारी उपब्धता आणि यामध्ये अल्कोहोलचे अधिक प्रमाण आहे. डीयूच्या रिपोर्टनुसार बलूचिस्तानमध्ये एक्साइज अॅन्ड टॅक्सेशनचे डायरेक्टर जनरल मुहम्मद जमान खान यांनी सांगितले की, हुई कोस्टल ब्रेवरी आणि डिस्टिलरी लिमिटेड नावाची चीना कंपनीला २०१८ मध्ये प्लांन्ट उभारण्याचा परवाना मिळाला होता.
हे देखील वाचा- जेव्हा सम्राटांवर झाला होता तीनवेळा जीवघेणा हल्ला, जापानमधील राजकीय हत्यांच्या इतिहास पहा
या कंपनीने गेल्या काही वर्षात दररोज ६५ हजार ते एक लाख लीटर उत्पादन सुरु केले होते. खान यांनी असे ही म्हटले की, सुरुवातीला कंपनीचे लक्ष्य चाइना-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअर योजनेत काम करणारे चीनी लोकच होते. परंतु नंतर स्थानिक दुकानदारांनी सुद्धा ही बिअर विक्री करु लागले आणि अवघ्या काही काळात ती लोकप्रिय झाली.या बिअरचे तीन प्रकार येतात. प्रत्येक कॅनमध्ये ५०० मिलीलीटरची क्षमता असते. यामध्ये हुंगची स्पेशल ब्रु, हुंगची अँबरलॅगर आणि हुई चेंग वेरिएशनचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात हे सर्व वेरियंट स्थानिक लोकांना फार आवडू लागले आहेत. तर ही चीनी बिअर स्थानिक मध्यमवर्गील आणि अप्पर वर्गामध्ये अधिक लोकप्रिय आहे.(Chinese Beer)
चीनी बिअरमधील काही लोकांना अल्कोहलचे प्रमाण आवडते. एका स्थानिक तरुणाने असे म्हटले की, दोन कॅन प्यायल्यानंतर दारु प्यायल्या सारखे वाटते. अल्कोहोलचे अधिक प्रमाण हे खासकरुन अशा लोकांसाठी आकर्षक आहे जे पहिल्यांदाच बिअर ट्राय करत आहेत. तसेच ज्या लोकांना वास्तवात नशा काय असते हे पहायचे असते ते लोक ती पितात. तसेच काहींना याची पॅकिंग तर आवडते पण ती विदेशी दारु असल्याने ही त्यांना आवडत आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात राहणाऱ्या बहुतांश लोकांचे असे मानणे आहे की, चीनी बिअर अगदी सहज उपलब्ध होत आहे.