क्रिकेट म्हणजे आपल्या भारतीय लोकांसाठी जणू श्वासच आहे. क्रिकेटने सर्वच भारतीयांना कमालीचे वेड लावले आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात क्रिकेटने कमालीची लोकप्रियता कमावलेली आहे. अतिशय ग्लॅमर असलेला गेम म्हणून क्रिकेटची ओळख आहे. भारतात तर लहानग्यांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वच या खेळाचे फॅन आहेत. मात्र असे असले तरी क्रिकेटमधल्या काही गोष्टींची माहिती त्यांना नसते. दिसायला अगदी लहान वाटणाऱ्या गोष्टींना देखील क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता स्टॅम्पचेच घ्या. क्रिकेटमध्ये स्टॅम्पला मोठे महत्त्व आहे. मात्र या खेळात फलंदाजाच्या मागे तीनच स्टॅम्प्स का असतात? याचे कोणाला माहिती आहे का? (Cricket)
क्रिकेटमध्ये तीन स्टंप ऑफ द विकेट पाहतो. ऑफ स्टंप, मिडल स्टंप आणि लेग स्टंप. पण जेव्हा क्रिकेट सुरू झाले तेव्हा विकेटमध्ये फक्त दोनच स्टंप असायचे. पूर्वी क्रिकेट खेळताना खेळामध्ये दोन स्टंप वापरले जात होते आणि त्या दोन स्टंपवर एकच बेल ठेवली जात असे. आपण बऱ्याचदा पाहिले आहे की स्टंपवर असलेल्या बेल पडल्या की अंपायर फलंदाजांना बाद घोषित करतो. पण अनेकदा असेही झाले आहे की चेंडू स्टंपला लागूनही बेल पडत नाहीत अशा वेळी फलंदाज नाबाद असतो हा क्रिकेटचा नियम आहे. (Marathi)
तीनही स्टंप एकमेकांपासून थोड्या अंतरावर उभे असतात. त्यांचा व्यास सुमारे १.३८ इंच आणि उंची २८ इंच असते. स्टंप सामान्यतः लाकडापासून तयार केले जातात, पण आजकाल तंत्रज्ञानामुळे लाईट स्टंप्स वापरले जातात, जेव्हा बॉल लागतो तेव्हा प्रकाश झळकतो. स्टंप्स हे केवळ विकेटचा भाग नाहीत, तर संपूर्ण खेळाच्या निकालावर परिणाम करणारा घटक आहेत. बॉलरने जर बॉल फेकताना थेट स्टप्सला लक्ष्य केले आणि बेल्स उडवल्या, तर ती बोल्ड विकेट ठरते. विकेटकीपर बॉल पकडून फलंदाजाच्या मागून बेल्स काढतो तेव्हा स्टंपिंग होते. त्यामुळे स्टंप्स हे बॉलिंग आणि विकेटकीपिंग दोन्हींसाठी निर्णायक ठरतात. (Todays Marathi News)

जुन्या काळात, गोलंदाजासाठी फलंदाजाला बाद करणे खुपचं आव्हानात्मक होते. कारण दोन स्टंपना बॉल मारणे सोपे नव्हते. १९७३ मध्ये झालेल्या केंट विरुद्ध सर यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना झाला होता या झालेल्या क्लब सामन्यामध्ये स्टॅम्पची रूपरेषा बदलण्यात आली होती. या सामन्यामध्ये जो स्मॉल हा फलंदाजी करत होता तर लांपी स्टीवन हा गोलंदाजी करत होता. यावेळी ही दोघे खेळत असताना सलग ३ चेंडू हे स्टॅम्पच्या मधून गेले. यानंतर क्रिकेटमध्ये मधला स्टॅम्प असणे गरजेचे आहे त्याचबरोबर एक मोठी बेल न ठेवता त्याचे रूपांतर २ बेलमध्ये रूपांतर करावे असा नियम करण्यात आला होता. (Latest Marathi Headline)
त्यानंतर स्टॅम्पच्या उंचीमध्ये देखील सुधारणा करण्यात आली. असे म्हटले जाते की १७७५ मध्ये लम्पी स्टीव्हनसनने क्रिकेटमध्ये पहिल्यांदा तीन स्टंप वापरले. १७७५ मध्ये लंडनमधील आर्टिलरी ग्राउंडवर हॅम्पशायर आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान हा महत्त्वाचा टप्पा आला. त्यानंतर तीन स्टंपची पद्धत सुरू झाली. नवीन नियमानुसार स्टॅम्प हे २८ इंच असणे गरजेचे आहेत त्याचबरोबर स्टंपमधील अंतर हे बॉलच्या मापाईतके करण्यात आले. सध्या आता आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर लीग स्तरावर जे सामने खेळले आणि जातात आणि त्याच्यामध्ये जे लायटिंग स्टॅम्प वापरले जातात त्याची लाखो रुपयांमध्ये किंमत आहे. (Top Stories)
========
Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांनी वध करण्याआधी अफझल खानाने केली होती आपल्या ६३ पत्नींची हत्या
========
फक्त स्टंपच नाही तर विकेटवर लावलेल्या बेल्सचाही एक रंजक इतिहास आहे. सुरुवातीला बेल्स वापरल्या जात नव्हत्या. खेळ अधिक स्पष्ट करण्यासाठी नंतर हे लागू करण्यात आले. ज्यामुळे गोलंदाज आणि पंचांना स्टंप खरोखर पडला आहे की नाही हे ठरवता आले. क्रिकेटचा इतिहास खूप रंजक आहे. काळानुसार अनेक बदल झाले आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे स्टंपची संख्या. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही क्रिकेट सामन्यात विकेट पडताना पाहता तेव्हा लक्षात ठेवा की एक काळ असा होता जेव्हा विकेटला फक्त दोनच स्टंप असायचे. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
