उद्या मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणून दत्त जयंतीला ओळखले जाते. त्रिगुणात्मक असलेल्या दत्त महाराजांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदाने साजरा होतो. आपण जर दत्त महाराजांचे रूप पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, तीन मस्तक असलेल्या दत्तांच्या मागे औदुंबर वृक्ष, गाय, चार श्वान दिसतात. शिवाय दत्त महाराजांच्या हातात कमंडलु, त्यांच्या गालात रुद्राक्ष माळा आहेत. सोबतच शंख, चक्र, झोळी, त्रिशूल, डमरू या गोष्टी देखील आहेत. मात्र या गोष्टी नक्की दत्तांच्या जीवनात का आवश्यक आहे? यामागचा नेमका अर्थ काय, चला तर मग जाणून घेऊयात. (Datta Jayanti)
गायीला भारतीय संस्कृतीत “कामधेनू” समजले जाते. गाय पालनपोषण, मातृत्व, शांती आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. दत्तगुरुंच्या प्रतिमेत दिसणारी गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे. दत्तगुरु हे करुणेचे मूर्तिमंत रूप आहेत. म्हणूनच त्यांच्या सोबत गाय आहे. जी सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करते. दत्तगुरुंच्या फोटोमध्ये त्यांच्या बरोबर असलेली गाय म्हणजे पृथ्वीचा अंश मानला जातो. ज्या प्रमाणे पृथ्वी सर्व जीवांचा भार वाहते तेच मातृत्व गायीमध्ये देखील असते आणि म्हणूनच दत्तगुरुंच्या फोटोत गाय देखील असते. (Marathi)
दत्तगुरुंच्या प्रतिमेत दिसणारे चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक मानले जाते. हे चार श्वान ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचे प्रतीक आहे. श्वान हे निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जागरूकतेचे प्रतीक आहे. श्वान हा आपल्या मालकाप्रती कायमच प्रामाणिक, निष्ठावान आणि विश्वासू असतो. ज्याने आपलं पालन पोषण केले त्या मालकाशी प्रामाणिक राहणे श्वानाचे गुण वैशिष्ट्यं आहे. श्वानाप्रमाणेच आपण देखील आपल्या गुुरुंवर विश्वास ठेवावा, हाच संदेश यातून दिला जातो.दत्तगुरु कायमच जीवनाचा सार निसर्गाच्या विविध रुपांमधून सांगतात. अधात्म आणि विज्ञानाची सांगड ही दत्तसंप्रदायात दिसून येते. (Todays Marathi HEadline)
दत्तात्रेयांच्या तीन मस्तकांना ब्रह्मा,विष्णू, महेश असे आपण म्हणतो.या तिन्ही देवांना महर्षी अत्रींनी विनंती केली की तुम्ही आमचे पुत्र म्हणून रहा. त्यावेळी विष्णूंनी त्यांना सांगितले की, हे जे सोम आणि शंकर आहेत त्यांना त्यांचे कार्य करण्यासाठी जाऊ द्या, मी या ठिकाणी राहतो. त्यावेळी माता अनसूयेला फार वाईट वाटले. तिला तीनही बाळे हवी होती. तेव्हा त्या मातेचा कळवळा आल्यामुळे ब्रह्मा आणि शंकराने सांगितले, “माते, तुम्ही काळजी करू नका, आम्ही या विष्णुरूपामध्ये अंशरूपाने राहू आणि आमची खूण म्हणून आमचे दोन हात त्यातील आयुधांसह त्या दत्ताला प्रदान करू. त्याप्रमाणे ब्रह्मा, विष्णू व महेश यांची तीन मस्तके आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना सहा हात आहेत. (Top Stories)

दत्त महाराजांच्या या सहा हातांपैकी सगळ्यात खालचे जे दोन हात आहेत, त्यापैकी एका हातात रुद्राक्षाची माळ आहे. दुसऱ्या हातामध्ये पाण्याने भरलेला कमंडलू आहे. या रुद्राक्षाच्या माळेत ५२मणी आहेत. ५२ च मणी का आहेत? तर यामागे देखील एक खास कारण आहे, ५२ वर्ण आहेत आणि संपूर्ण मंत्र जे आहेत ते या ५२ वर्णांमध्येच गुंफलेले आहेत. या मंत्रांपासूनच सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे ५२ वर्णांचे प्रतीक असलेली ही रुद्राक्षाची माळ त्या हातामध्ये आहे. (Top Marathi News)
दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे. हा जलपूर्ण कमंडलू प्रकृतीचे लक्षण आहे. ही सृष्टी मायाधीन कशी आहे याचे प्रतीक असलेला कमंडलू दुसऱ्या हातात आहे.हे दोन हात ब्रह्मदेवाचे आहेत. मधले जे दोन हात आहेत ,त्यात एका हातात डमरू व दुसऱ्यात त्रिशूळ आहे. ही शंकराची आयुधे होत. डमरूच्या नादातून सर्व नाद उत्पन्न झाले आहेत. ‘ओंकार’ ही त्यातूनच निर्माण झाला आहे. कामोदिनी नावाचा भगवान विष्णूंचा शंख उजव्या हातात व डाव्या हातात १२आऱ्या असलेले सुदर्शन चक्र आहे. हा दत्त विष्णुप्रधान आहे. त्याच्या सहा हातांचे हे वर्णन आहे. दत्तात्रेय ही देवता योग आणि भोग दोन्ही देते. (Marathi News)
दत्तात्रेयांचे जे उजवे अंग आहे ते गुरुरूप आहे आणि डावे अंग ईश्वराचे आहे. मायाधीश असलेला ईश्वर हे डावे अंग आहे. कामधेनू ही काही ठिकाणी दत्तात्रेयांच्या उजव्या बाजूला असते तर काही ठिकाणी डाव्या बाजूला असते. कामधेनू कुठल्या अंगाला आहे यावर तुम्हाला योग प्राप्त व्हावयाचा की भोग प्राप्त व्हावयाचा हे अवलंबून आहे. उजव्या हाताला गाय असेल तर उजवे अंग हे गुरु रूप आहे. ती तुम्हाला गुरुकृपा प्राप्त करून देईल. जर तिचे मुख डावीकडे असेल तर लौकीकातल्या तुमच्या इच्छा ,ज्या तुम्ही दत्तात्रेयांना मागाल त्या ती पूर्ण करेल. (Latest Marathi Headline)
दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते. दत्त महाराजकन्हया खांद्यावर असलेली झोळी हे मधुमक्षिकेचे अर्थात मधमाशीचे प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. (Top Trending News)
========
========
त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते. त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही. सप्तदेवतांपैकी केवळ दत्ताच्याच पादुका असतात आणि त्यांचीच पूजा देवळात अथवा घरी केली जाते. साधकाला पादुकांमधून प्रक्षेपित होणार्या निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो. पादुकांतील निर्गुण तत्त्वामुळे साधकाचे मन, चित्त, बुद्धी आणि अहं या सूक्ष्म-देहांची शुद्धी होते. त्यामुळे दत्तभक्त दत्ताच्या सगुण रूपासमवेतच निर्गुण रूपाशी, म्हणजेच दत्ततत्त्वाशी लवकर एकरूप होतो.’ (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
