Home » अंतराळात ही प्रयोगशाळा कोणाची

अंतराळात ही प्रयोगशाळा कोणाची

by Team Gajawaja
0 comment
Space
Share

अमेरिकेमधील हार्वर्ड विश्वविद्यालयाचा उल्लेख जगातील मोजक्या प्रतिष्ठित अशा विश्वविद्यालयात करण्यात येतो.  या हार्वर्ड युनिव्हसिटीच्या एका प्राध्यापकाच्या दाव्यानं सध्या एकच खळबळ उडवून दिली आहे. हार्वर्डचे हे प्राध्यापक गेली अनेक वर्ष परग्रहींवर संशोधन करीत आहेत.  या प्राध्यापकांनी परग्रहींनी अंतराळात एक अतिशय आधुनिक अशी प्रयोगशाळाच तयार केल्याचा दावा केला आहे.  शिवाय या प्रयोगशाळेत विश्व निर्माण करण्याची क्षमता आहे.  परग्रही एवढे आधुनिक आहेत, की ते संपूर्णपणे नवे विश्व या प्रयोगशाळेच्या मदतीनं बनवू शकतात असा दावा या प्राध्यापक महाशयांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  (Space)

हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अवि लोएब यांनी हा दावा केला आहे.  सध्या परग्रहींबाबत अमेरिकेमध्ये अनेक बातम्या येत आहेत.  परग्रहींचे वास्तव्य आहे आणि अमेरिकेच्या सैन्याची त्यांना साथ आहे, अशा पद्धतीचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे. अमेरिकेच्या सैन्य अधिका-यांनी तर अमेरिकेच्या सुरक्षा विभागाकडे काही परग्रहींचे मृत शरीर असल्याचा दावाही केला आहे.  या सर्वांमध्ये हार्वर्ड मधील प्राध्यापक अवि यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे.  त्यांनी याआधी अमेरिकेत केलेल्या सर्व दाव्यांचे खंडन केले आहे.  त्यांच्या मते, परग्रही आपल्या पृथ्वीवर येतात, किंवा ते कोणाबरोबर संपर्क करतात, पृथ्वीवर त्यांचे लक्ष आहे आदी सर्व दावे खोटे आहेत.  कारण परग्रहींना पृथ्वीसारख्या ग्रहामध्येच कुठलंही स्वारस्य नाही.  हे परग्रही आपल्यापेक्षा अतिशय प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात.  त्यांना पृथ्वीपेक्षा एखादे वेगळे विश्वच निर्माण करायचे आहे.  हे परग्रही नवे विश्व निर्माण करण्यात गुंतले आहेत.  यासाठी परग्रहींची अंतराळात अत्यंत आधुनिक अशी प्रयोगशाळा आहे.  या प्रयोगशाळेत परग्रहींनी त्यांना हवे तसे एक नवे विश्वच निर्माण केले आहे.  हार्वर्ड विद्यापीठाच्या खगोलशास्त्र विभागाचे माजी अध्यक्ष अवि लोएब हे गेली अनेक वर्ष परग्रहींवर आणि त्यांच्या अस्तित्वावर संशोधन करीत आहेत.(Space)

गेल्या अनेक वर्षापासून करत असलेल्या आपल्या संशोधनातून ते सांगतात की, परग्रही आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहेत.  त्यांच्याकडे प्रयोगशाळेत नवे विश्व निर्माण करण्याची क्षमता आहे आणि तसे नवे विश्व त्यांनी निर्माणही केले आहे.  प्राध्यापक लोएब सध्या प्रशांत महासागरात अवकाशातून पडलेल्या वस्तूच्या सापडलेल्या तुकड्यांचा अभ्यास करत आहेत.  यासंदर्भात त्यांनी एक अहवाल लिहिला असून त्यात परग्रहींची  संस्कृती आपल्यापेक्षा लाखो वर्षे पुढे आहे.  क्वांटम मेकॅनिक्स आणि गुरुत्वाकर्षण कसे एकत्र करायचे हे त्यांला समजले असल्याचा दावा लोएब यांनी केला आहे.  त्यांच्या मते, क्वांटम मेकॅनिक्स आणि गुरुत्वाकर्षण एकत्र केल्याने जी परिस्थिती उद्भवते, ज्याद्वारे विश्व अस्तित्वात येते.  अर्थात प्रयोगशाळेत ब्रह्मांड तयार करण्याची बाब जरा अतिरेकी वाटते. परंतु शास्त्रज्ञांनी याआधीही एकल पेशी जीव बनवले आहेत, असेही प्राध्यापक लोएब यांनी स्पष्ट केले आहे.  (Space)

प्राध्यापक लोएब यांनी याआधीही असेच धक्कादायक दावे केले आहेत.  2017 मध्ये शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले ओमुआमुआनावाचे अंतराळातील एक परकीय जहाज असल्याचा दावाही प्राध्यापक लोएब यांनी केला होता. त्यांच्या संशोधनानुसार परग्रहींचे जे विमान आपल्या काही वैमानिकांना दिसले आहे, ते त्यांच्या अंतराळातील प्रयोगशाळेच्या परिसरात फिरणारे विमान आहे.  अशा विमानांचा आपल्या लढावू विमानांपेक्षांची चौपट असतो.  हे तंत्रज्ञान अतिशय वेगळे असून मानवाला तो वेग गाढण्यासाठी आणखी बरीच वर्ष संशोधन करावे लागणार आहे. (Space) 

=========

हे देखील वाचा : गुप्त काळातील पंचमुखी शिवलिंग…

=========

रेडिओ दुर्बिणीचा शोध 80 वर्षांपूर्वी लागला असून गेल्या 60 वर्षांपासून परग्रहींचा शोध ख-याअर्थांनं सुरु झाला.  मात्र  परग्रहींनी याआधीच पृथ्वीचा शोध लावला होता.  त्यांचे सर्व तंत्रज्ञान हे आपल्या खूप पुढे असल्याचा दावा आहे.  रेडिओ टेलिस्कोप सध्या सर्वात प्रगत तंत्रज्ञान आहे.   परंतु परग्रहींकडे आणखी प्रगत तंत्रज्ञान असू शकते.  त्यामुळे त्यांच्या बरोबरीने तंत्रज्ञान मिळायला आपल्याला अनेक वर्ष संशोधन करावे लागणार आहे.  प्राध्यापक लोएब  यांच्यासह आणखीही काही शास्त्रज्ञांनी परग्रहींबाबत अशाच आशयाचे विधान केले आहे.  त्यांच्यामतानुसार परग्रहींना आपल्याबरोबर संपर्क साधायचा नाही.  जर परग्रहींना आपल्याबरोबर संपर्क साधायचा असेल तर अंतराळात जगभरातील अनेक देश संशोधन करीत आहेत, त्यांच्यापैकी एकाला तरी त्यांची झलक दिसली असती.  ज्यांना परग्रहींचे अस्तित्व जाणवते, त्यांना फक्त काही सेकंद ते दिसले आहेत.  त्यावरुन परग्रही मानवापासून जाणूनबुजून दूर जात असल्याचा दावा शास्त्रज्ञांचा आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.