इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की, लोकांचे लक्ष लागते ते देशाच्या बजेटकडे. यावर्षी बजेटमध्ये काय जाहीर होणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. एक भारतीय म्हणून दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी सगळेच टीव्हीसमोर बसून बजेट ऐकतात. देशाचे अर्थमंत्री दरवर्षी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करतात. संसदेत यंदा २०२६ सालाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू झाले आहे. हे अधिवेशन २८ जानेवारी ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत दोन टप्प्यात होणार आहे. या अधिवेशनाचा दुसरा टप्पा हा ९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत होणार आहे. (Budget)
देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारी अर्थात रविवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मागील काही वर्ष अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प सादर करतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या त्यांचा सलग ९ वा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यात २ अंतरिम आणि ६ पूर्ण अर्थसंकल्पांचा समावेश आहे. एकाच पंतप्रधानांच्या कार्यकाळात सलग इतके अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण या एकमेव अर्थमंत्री आहेत. मात्र कोणत्या अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे याची माहिती तुम्हाला आज आम्ही करून देणार आहोत. (Marathi News)
मोरारजी देसाई
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावावर सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम केले होते. याकाळात त्यांनी एकूण १० अर्थसंकल्प सादर केले. १९५९ ते १९६४ दरम्यान त्यांनी सहा अर्थसंकल्प आणि १९६७ ते १९६९ दरम्यान ४ अर्थसंकल्पीय भाषणे सादर केली. (Marathi)

पी. चिदंबरम
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला. त्यांचा पहिला अर्थसंकल्प १९ मार्च १९९६ रोजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या सरकारच्या काळात सादर करण्यात आला आणि त्यांचा दुसरा अर्थसंकल्पही त्याच संयुक्त आघाडीच्या सरकारच्या काळात सादर करण्यात आला. २००४ ते २००८ दरम्यान त्यांनी पाच अर्थसंकल्प सादर केले. त्यानंतर २००९ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात ते पुन्हा अर्थमंत्री झाले आणि २०१३ आणि २०१४ मध्ये देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्पही सादर केला. (Todays Marathi Headline)

प्रणव मुखर्जी
माजी राष्ट्रपती स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री असताना आठ वेळा अर्थसंकल्प सादर केला आणि अर्थसंकल्पीय भाषणे केली आहेत. त्यांनी पहिल्यांदा १९८२, १९८३ आणि १९८४ मध्ये तीन वेळा अर्थसंकल्प सादर केला आणि त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात फेब्रुवारी २००९ ते मार्च २०१२ दरम्यान सलग पाच वेळा अर्थसंकल्प सादर केले. (Top Marathi News)

यशवंत सिन्हा
देशाचे अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनी एकूण ८ वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. १९९१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी देशाचे पंतप्रधान चंद्रशेखर होते. त्यानंतर त्यांनी भाजप सरकारमध्ये एकूण ७ वेळा काम केले. या अर्थसंकल्पांमध्ये २००० चे मिलेनियम बजेट आणि २००२ चे रोलबॅक बजेट देखील समाविष्ट आहे. (Latest Marathi Headline)

निर्मला सीतारमण
सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०१९ नंतर भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी एकूण आठ अर्थसंकल्प सादर केले आहेत. ज्यामध्ये एक अंतरिम अर्थसंकल्प आहे. २०२६ चा अर्थसंकल्प हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असेल. (Top stories)

=========
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
=========
मनमोहन सिंह
देशाच्या अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक पाच वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नावावर आहे. त्यांनी पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम केले आणि १९९१ ते १९९५ दरम्यान सलग पाच वेळा अर्थसंकल्प सादर केले. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
