अमेझॉन प्राईमवर नुकतीच प्रदर्शित झालेली ‘दहाड’ ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची विशिष्ट पद्धतीने हत्या करणाऱ्या एका सिरीयल किलरची गोष्ट यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, सोहम शहा आणि गुलशन देवय्या या चौघांच्या यामध्ये प्रमुख भूमिका आहेत. सिरीजच्या प्रदर्शानंतर ही सिरीज एकेकाळी सायनाईड मोहन (Cyanide Mohan) या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कुख्यात सिरीयल किलरच्या आयुष्यापासून प्रेरित असल्याचे सांगण्यात येते.
सायनाईड मोहन (Cyanide Mohan) हा एक सिरीयल किलर होता. मोहन कुमार हे त्याचं नाव. २००३ ते २००९ या कालावधीत त्याने जवळपास २० मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा खुण केला होता. २५ ते ३० वयवर्ष असणाऱ्या मुलींना तो आपल्या जाळ्यात ओढत असे. मुलींशी मैत्री करून त्यांच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण करत असे. मुली एकदा काय त्याच्यावर विश्वास ठेवायला लागल्या की त्यांना लग्नाचे आमिष देवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असे. त्यांना गर्भनिरोधक गोळीसोबत सायनाईड खायला घालून त्यांच्या करून त्यांच्या अंगावरील दागिने आणि पैसे घेवून पळून जात असे.

२००३ साली एका महिला प्रसाधनगृहाबाहेर महिलांची लांबच लांब रांग लागली होती. प्रसाधनगृहाचा दरवाजा खटखटून आवाज देवून झालं होतं. आतून कुणीही प्रतिसाद देत नव्हतं. शेवटी बराच वेळ प्रयत्न करूनदेखील काहीच प्रतिसाद आला नसल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडला. आता तिशीच्या घरात असलेल्या एका बाईचे प्रेत त्यांना आढळले. एखाद्या लग्नाला जायचं असल्यासारखं ती बाई नटली होती परंतु तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता. तपासात हे स्पष्ट झाली की गर्भनिरोधक गोळीवर सायनाइड लावून तिला ती गोळी खाऊ घालून तिच्या हत्या करण्यात आली आहे.(Cyanide Mohan)
त्यानंतर काही महिन्यांनी असच अजून एक प्रेत पोलिसांना सापडलं. २००३ ते २००९ यादरम्यान अशा वीस बायकांना सायनाईड मोहनने (Cyanide Mohan) आपल्या जाळ्यात ओढलं. बायकांना गर्भार बनवून त्यांना घरातून पैसे आणि दागिने घेवून पळून यायला हा सांगत असे. त्याच्या प्रेमात बुडालेल्या त्या बायका तो सांगेल तसं करत असत. त्या एकदा का दागीने आणि पैसे घेवून आली की हा त्यांना गर्भनिरोधक गोळीवर सायनाइड लावून खावू घालत असे आणि दागिने, पैसे घेवून पळून जात असे.
२००९ साली कर्नाटक पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळल्या. एक फास्ट ट्रक कोर्ट चालवून त्याच्यावर २० महिलांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला. २०१३ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली. सायनाईड मोहन (Cyanide Mohan) सध्या बेळगावीच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगतो आहे.
========
हे देखील वाचा : ‘या’ भारतीय सिनेमाचा कोरियात होणार रिमेक
========
सायनाईड मोहन (Cyanide Mohan) हा पेशाने शिक्षक होता. त्यामुळे भोळ्या मुलींना आपल्या जाळ्यात ओढणे त्याला फारसे अवघड जात नसे. मुली त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून लगेच त्याच ऐकायला तयार होत असत. त्यातला त्यात हा अशा मुलींना आपलं लक्ष बनवत असे ज्यांची लागणे हुंडा वगैरेच्या कारणांमुळे अडकून राहिलेलं असे. त्या मुली सहजपणे याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असत आणि आपल्या जीवाला मुकत असत.
