म्हैसूरचा शासक असलेल्या टिपू सुलतानच्या एका वैयक्तिक तलवार लंडनमध्ये लिलाव करण्यात आला आहे. श्रीरंगपट्टमच्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला. त्यानंतर त्याच्या वैयक्तिक वापरातील तलवार त्याला युद्धात हरवणा-या ब्रिटीश अधिका-याला भेट म्हणून मिळाली. ही भेट त्या अधिका-याच्या कुटुंबियांनी आत्तापर्यंत सांभाळली होती. मात्र आता या तलवारीची एका लिलावात विक्री करण्यात आली. या तलवारीची आजही किंमत कोटी रुपयात आहे. अतिशय चांगल्या दर्जाच्या लोखंडापासून बनवलेल्या या तलवारीची धार अद्यापही शाबूत असून त्याच्यावर टिपू सुलतान यांच्या वडिलांचे नाव कोरलेले आहे. टिपू सुलतान यांच्या वैयक्तिक तलवारीचा ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात आली. या तलवारीची खरेदी करण्यासाठी अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती. त्यामुळे तलावारीची किंमत कोटींवर पोहचली. टिपू सुलतानची ही तलवार खास समजली जाते. कारण श्रीरंगपट्टणाच्या युद्धात तिचा वापर झाला होता. याच युद्धात टिपू सुलतान पराभूत झाला आणि ही तलवार ब्रिटीशांकडे आली. ही तलवार जवळपास 300 वर्षांपासून लंडनमध्ये आहे. आता नुकतीच लंडनमधील बोनहॅम्स ऑक्शन हाऊसमध्ये टिपू सुलतानच्या या तलवारीची विक्री 317,900 पौंड म्हणजेच 3.4 कोटी भारतीय रुपयांमध्ये झाली. ही तलवार 1799 मध्ये श्रीरंगपट्टमच्या लढाईत वापरली गेली आहे. (Tipu Sultan Sword)
या युद्धात टिपू सुलतानचा पराभव झाल्यानंतर ही तलवार ब्रिटिश सैन्यातील कॅप्टन जेम्स अँड्र्यू डिक यांना त्यांच्या सेवेसाठी भेट म्हणून देण्यात आली होती. ब्रिटीश सरकारनं कॅप्टन जेम्स अँड्र्यू डिक यांचा मोठा सन्मान केला होता. त्यांनी ही तलवार ब्रिटनला नेली. या कॅप्टन जेम्स अँड्र्यू डिकच्या कुटुंबियांनी हा वारसा 300 वर्षे जपला. या तलवारीला मोठे महत्त्व आहे. कारण श्रीरंगपट्टमचे युद्ध 17 एप्रिल 1799 रोजी सुरू झाले आणि 4 मे 1799 रोजी श्रीरंगपट्टमच्या पतनाने संपले. या युद्धात टिपू सुलतानच्या सैन्याचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, मराठा साम्राज्य आणि हैदराबादचा निजाम यांच्या संयुक्त सैन्याने पराभव केला. या युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला आणि इंग्रजांनी त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली. युद्धानंतर म्हैसूर राज्य सहायक करारानुसार वाडियार राजवंशाकडे परत करण्यात आले. त्यामुळे टिपू सुलतानच्या शासन काळात त्याच्याकडे असलेली आणि त्याच्या पतनानंतर ब्रिटीशांकडे आलेली ही तलवार त्या काळातील एक महत्त्वाचा दुवा मानण्यात आली. चमकदार ब्लेड असलेली ही तलवार टिपू सुलतानच्या वैयक्तिक शस्त्रागाराचा भाग होती. (Social News)
या तलवारीवर शेर-ए-म्हैसूरची ओळख बुबरी म्हणजेच वाघाचे पट्टे कोरलेली तलवार अशी आहे. या तलवारीच्या टोकावर विशिष्ट प्रकारचे कोरीव काम असून तलवारीच्या मुठीवर हिरे आणि माणिक आहेत. या तलवारीच्या पातीवर सोन्यामध्ये अरबी अक्षर ‘हा’ कोरलेले आहे. हे अक्षर टिपू सुलतानचे वडील हैदर अली यांच्या संदर्भात असल्याची माहिती आहे. यावरुन ही तलवार टिपू सुलतान यांचे वडिल हैदर अली यांनी टिपू सुलतानला भेट दिली असल्याचाही संदर्भ आहे. कॅप्टन जेम्स अँड्र्यू डिक श्रीरंगपट्टमच्या लढाईत लेफ्टनंट होते. ते एक आक्रमक लढवय्ये म्हणून ओळखले जात. त्यांची रेजिमेंट श्रीरंगपट्टणमच्या लढाईत आघाडीवर होती. त्यांच्या रेजिमेंटने शिडी वापरून किल्ल्याच्या भिंती तोडल्या आणि आत प्रवेश केला. त्यांनी गाजवलेल्या अद्भूत पराक्रमामुळे टिपू सुलतानचा पराभव झाल्याची आख्यायिका आहे. तसेच युद्धात टिपू सुलतान मारला गेल्यावर त्याचे अवशेषही कॅप्टन जेम्स अँड्र्यू डिक आणि त्यांच्या सैन्यानं शोधले होते. (Tipu Sultan Sword)
======
हे देखील वाचा : महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला डाएट ?
====
या पराक्रमामुळे कॅप्टन डिक यांना अनेक पुरस्कार देण्यात आले. यातील एक पुरस्कार म्हणजे टिपू सुलतानची ही खास तलवार. ही तलावर कॅप्टन जेम्स अँड्र्यू डिक यांच्या वारसांकडे अद्याप होती. मात्र आता या कुटुंबीयांनी तलवारीची विक्री करण्यासाठी तिला लिलावगृहाकडे दिले. त्यानंतर या तलवारीचा लिलाव होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही प्रसिद्ध तलवार खरेदी करण्यासाठी अनेक गर्भश्रीमंतांनी आणि युद्धातील साहित्य संग्रही करणा-या हौशींनी नोंदणी केली होती. त्यापैकीच एकानं ही तलावर 3.5 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. टिपू सुलतानच्या संग्रहालयात अशा अनेक अमुल्य तलवारही असल्याची माहिती आहे. या सर्व तलवारी टिपू सुलतानच्या पतनानंतर ब्रिटीशांनी इंग्लडला नेल्या आहेत. त्या काही ब्रिटीश अधिका-यांच्या कुटुंबाकडे आणि काही तेथील संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. (Social News)
सई बने