Home » Pitrupaksha : श्राद्ध विधींची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली?

Pitrupaksha : श्राद्ध विधींची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Pitrupaksha
Share

नुकताच पितृपक्षाचा पंधरवडा सुरु झाला आहे. आता पुढेच पंधरा दिवस प्रत्येक व्यक्ती तिच्या घरातील पूर्वजांना आठवून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान करेल. हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा काळ समजले जाणारे हे पंधरा दिवस फक्त आपल्या पूर्वजांसाठी राखीव ठेवले जातात. त्यामुळेच याकाळात कोणतेही शुभ काम केले जात नाही. ७ सप्टेंबर पासून ते २१ सप्टेंबरपर्यंत हा पितृपक्षाचा काळ असणार आहे. मात्र हा पितृपक्ष किंवा हा पितृ पंधरवडा नक्की कसा सुरु झाला? कोणी याची सुरुवात केली? याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती असेल. घरात हा पंधरवडा पळाला जातो, या काळात श्राद्ध केले जातात म्हणून आपणही करतो. मात्र मागे एक इतिहास आहे. तोच आपण आज जाणून घेऊयात. (Pitrupaksha)

श्रीरामांनी राजा दशरथाच्या नावाने पिंडदान केले होते. तर, महाभारताचे संहारक युद्ध संपल्यानंतर पांडवांनी सर्व कौरवांचे आणि कर्णाच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी केल्याचे ऐकिवात आहे. अर्थात खूपच जुन्या काळापासून श्राद्धाची परंपरा चालू आहे. याबद्दल महाभारताच्या शिस्त पर्वात एक आख्यायिका आहे ज्यामध्ये श्राद्ध करण्याची परंपरा सांगितली आहे. या पर्वामध्ये भीष्म पितामहाने युधिष्ठिराला श्राध्दपक्षाबद्दल सांगितले आहेत. महाभारतानुसार सर्वप्रथम श्राद्धाचे उपदेश महर्षी नीमीने अत्रीमुनीना दिले होते. प्रथम निमीने श्राद्ध सुरू केले, त्यानंतर इतर महर्षी ने देखील श्राद्ध सुरू केले. यानंतर गुरुने दिलेल्या उपदेशानुसार, महर्षी निमि यांनी श्राद्ध विधी केला. महर्षी निमि यांनी केलेला श्राद्ध विधी पाहून अन्य ऋषी आणि मुनींनी आपापल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केले. नियमितपणे केल्या गेलेल्या या विधीचे अन्न आणि पाणी ग्रहण करून देवता आणि पूर्वज तृप्त झाले, असे सांगितले जाते. (Todays Marathi News)

Pitrupaksha

श्राद्धामधे अग्निदेवतेचे महत्व का असते?
ऋषी आणि मुनींकडून नियमितपणे केल्या जाणाऱ्या श्राद्ध विधीत अर्पण करण्यात येणारे अन्न आणि पाणी ग्रहण केल्यामुळे देवता त्रस्त झाल्या. यामुळे अनेक समस्यांना त्यांच्यासमोर उद्भवल्या. यातून त्यांना मार्ग सापडत नव्हता. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी देवता ब्रह्मदेवांकडे गेल्या. ब्रह्मलोकात जाऊन त्यांनी आपल्या चिंतेचे सविस्तर विवेचन केले. ब्रह्मदेवांनी देवतांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि या समस्येवर अग्निदेव तोडगा काढू शकतील. त्यामुळे तुम्ही अग्निदेवाचे आवाहन करा. (Latest Marathi News)

ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार सर्व देव आपली समस्या घेऊन अग्निदेवांकडे गेले. अग्निदेव या प्रश्नावर म्हणाले की, . अग्निदेव देवता आणि पितरांना म्हणाले की, आता श्राद्धामध्ये मीसुद्धा तुमच्यासोबत भोजन करेल. मी सोबत असल्यामुळे तुम्हाला अजीर्ण होणार नाही. हे ऐकून देवता प्रसन्न झाले. यामुळे श्राद्ध करताना सर्वात पहिले अग्नीला भाग दिला जातो. (Top Trending News)

=======

Pitrupaksha : पितृ पक्षात कावळ्यांना जेवू का घालतात?

=======

शास्त्रातील माहितीनुसार, श्राद्ध विधी करताना हवन केले जाते. यावेळी पूर्वजांच्या नावाने पिंडदान केले जाते. त्याला ब्रह्मराक्षसही नुकसान करू शकत नाही. कारण अग्निदेवांना पाहून ब्रह्मराक्षस तेथे थांबत नाहीत. अग्निमुळे सर्व गोष्टी या पवित्र होतात. पवित्र झालेले अन्न पाणी ग्रहण केल्यामुळे देवता आणि पूर्वज प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. महालय श्राद्धात क्षणदान, अर्घ्यदान, पूजा, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधावाचन आदी विधी केले जातात. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.