आयपीएल (IPL)
आयपीएल (IPL) प्रेमींची संख्या भारतात कमी नाही. एकूणच भारतीयांना राजकारण, मनोरंजन आणि क्रीडा हे विषय जिवाभावाचे वाटत असतात. त्यातल्या त्यात क्रिकेट हा खेळ नसून तो उत्सव म्हणून पाहणारे अनेक क्रिकेटप्रेमी भारतात दिसून येतात. वर्ल्ड कप आणि आयपीएल गाजविणाऱ्या खेळाडूंना कुठे ठेऊ आणि कुठे नको असं या क्रिकेटप्रेमींना वाटत असतं.
सध्या आयपीएल गाजविणाऱ्या खेळाडूंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच असून निवृत्त झालेल्या खेळाडूंवरही लोक आजही तितकेच प्रेम करतात. याच आयपीएलमध्ये असा एक खेळाडू होऊन गेला, ज्याने २०११ च्या किंग्ज इलेव्हन पंजाब टीम मध्ये धुवाधार बॅटिंग करत अनेकांना अचंबित केले होते. तो खेळाडू म्हणजे पॉल वॉल्थटी (Paul Valthaty).
पॉल वॉल्थटीने चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल (IPL) सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या विरुद्ध असलेल्या सामन्यात ६३ चेंडूत १२० धावा केल्या. या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जने पंजाबच्या टीम समोर १८९ धावांचे आव्हान समोर ठेवले.

यावेळी हे आव्हान पंजाब पेलू शकेल का, असा प्रश्न उपस्थित राहिला होता मात्र पॉल वॉल्थटीने आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत अॅडम गिलख्रिस्ट सोबत १९ चौकार आणि २ षटकार मारत ६३ चेंडूत १२० धावा केल्या. पॉल वॉल्थटीच्या विक्रमी कामगिरीबद्दल त्याला काही दिवसातच लोकप्रियता मिळत गेली.
आपल्या विलक्षण कामगिरीने चर्चेत आलेला हा खेळाडू सध्या कुठेच दिसत नाही. २०११ च्या आयपीएल सामन्यानंतर पॉलच्या हाताला गंभीर दुखापत झाली व त्यामुळे वर्ल्डकपसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न स्वप्नचं राहिलं.
कालांतराने हा खेळाडू क्रिकेटपासून लांब आणि क्रिकेटप्रेमींच्या आठवणींतून धूसर होत गेला. दुर्दैवाने पॉलच्या नियतीचे फासे काही वेगळेच पडले म्हणून की काय, इतकी विक्रमी कामगिरी करूनही पॉलला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतरही पॉलने आपले प्रयत्न सुरू ठेवत २०१८ च्या आयपीएल सामन्यात तो पुन्हा दिसला, परंतु म्हणावे तसे यश त्याला मिळाले नाही. पॉलने अवघ्या २८ व्या वर्षी क्रिकेटमधून बाहेर पडून सुद्धा पॉलने आपला खेळ थांबविला नाही.
सध्या तो वॉल्थटी आता एअर इंडियाकडून खेळत असून त्याच्या क्रिकेटमधिल सातत्य त्याने कायम ठेवले आहे. आज ७ डिसेंबर रोजी पॉलचा जन्मदिवस असून या हरहुन्नरी खेळाडुला टीम क-फॅक्टस तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
-निवास उद्धव गायकवाड
हे नक्की वाचा: भारतीय महिला क्रिकेटने बाळसे धरले ??
इतर लेख: आता पुरे झाले संघात ‘राहणे’
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.
web search: Paul Valthaty Marathi Mahiti, Paul Valthaty in Marathi, Paul Valthaty Marathi, आयपीएल IPL Marathi