Home » Dussehra : सोन्याची लंका कधी रावणाची नव्हतीच….

Dussehra : सोन्याची लंका कधी रावणाची नव्हतीच….

by Jyotsna Kulkarni
0 comment
Dussehra
Share

अवघ्या काही दिवसातच आपण विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण साजरा करणार आहोत. साडे तीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून दसऱ्याला ओळखले जाते. या दिवशी आपट्याची पाने वाटली जातात. दसऱ्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. दसरा सणाला अनेक अर्थाने महत्व देण्यात आले आहे. यातलेच एक कारण म्हणजे आपल्या पुराणानुसार दसऱ्याच्या दिवशीच भगवान रामाने रावणाचा वाढ केला. त्यामुळेच या दिवसाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. असत्यावर आणि वाईटावर विजय मिळवलेला दिवस म्हणून दसऱ्याला ओळखले जाते. यासाठी याला विजयादशमी देखील म्हटले जाते. याच दसऱ्याच्या निमित्ताने तुम्हाला आम्ही रावणाबद्दल एक रंजक माहिती सांगणार आहोत. (Dussehra)

खूप कमी लोकांना माहिती असेल की रावण आणि कुबेर हे भाऊ होते. रावणाची लंका अतिशय प्रसिद्ध होती. आजही मालिकांमध्ये रामायण बघताना आपल्याला या लंकेची भूरळ पडते. तर खरी लंका किती सुंदर आणि भव्य असेल याचा अंदाज लावणे देखील व्यर्थ आहे. संपूर्ण सोन्याची असलेली लंका कशी असेल याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. अशी ही लंका संपूर्ण जगामध्ये रावणामुळेच प्रसिद्ध झाली. (Navratri)

आजही अनेक जेव्हा जेव्हा पर्यटक श्रीलंका फिरण्यासाठी जातात तेव्हा लंका कुठे होती हे आवजून बघतात. इतिहासाचा शोध घेणारे अभ्यासक देखील लंकेबद्दल माहिती गोळा करण्याचा कायम प्रयत्न करतात. अशी ही लंका रावणाने बांधली असा अनेकांचा समज आहे. मात्र हा त्या लोकांचा समज नसून गैरसमज आहे. कारण रावणाची सोन्याची लंका रावणाने नाही तर दुसऱ्या एका देवतेने बांधली होती. (Marathi)

रावण हा एक पराक्रमी राक्षस राजा होता, जो एक विद्वान देखील होता आणि त्याने तपश्चर्या करून अनेक शक्ती प्राप्त केल्या होत्या. मात्र, त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा आणि शक्तींचा वापर वाईट कृत्यांमध्ये केला. रावणाची प्रसिद्ध सुवर्ण लंका ही त्याच्या सावत्र भावाने धनाची देवता समजल्या जाणाऱ्या कुबेरांनी बांधली होती. रावणाने लंकेवर हल्ला केला तेव्हा कुबेर लंकेत राहायचे. मात्र रावणाच्या हल्ल्यामुळे ते जीव वाचवून पळून गेले. पळाल्यानंतर कुबेर पुन्हा कधीच लंकेत परत येऊ शकले नाही. (Marathi News)

पौराणिक ग्रंथांबरोबरच रामचरित मानस, वाल्मिकी रामायण आणि इतर ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आहे. यासोबतच अनंत नीलकंठन यांच्या ‘असुर’ या पुस्तकात देखील रावणाने ऐश्वर्याची नगरी म्हणवल्या जाणाऱ्या सुवर्ण लंकेवर आक्रमण करून ती कशी जिंकली याचे तपशीलवार वर्णन आहे. त्यानंतर त्याने येथे दीर्घकाळ राज्य देखील केले. कुबेरांनी लंकेवर राज्य तर केले सोबतच तिचा विस्तार देखील केला आणि तिला सोन्याच्या नगरीत रूपांतरित केले. रावणाचे वडील प्रसिद्ध ऋषी विश्रवा होते. त्यांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नीच्या पोटी कुबेराचा जन्म झाला तर रावण, कुंभकर्ण, विभीषण  आणि शूर्पणखा यांचा जन्म दुसरी पत्नी कैकशीच्या पोटी झाला. विश्रवा ऋषींची दुसरी पत्नी कैकशी राक्षस कुळातील होती. (Todays Marathi Headline)

 

Dussehra

अनंत नीलकंथन यांच्या पुस्तक “असुर”नुसार, कुबेर ऐश्वर्य आणि संपत्तीचे स्वामी होते आणि श्रीलंकेचे राजा होता. त्याचवेळी, रावण आणि त्याचे इतर भाऊ आणि बहिणी गरिबीत जगत होते. त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत होते. कुबेराची वागणूकही रावण आणि त्याच्या भावा-बहिणींशी चांगली नव्हती. तसेच त्यांनी कधीही त्यांना मदत केली नाही. कुबेराच्या अपमानास्पद वागणुकीने रावण दुखावला जायचा. (Latest Marathi Headline)

यानंतर रावणाने तपश्चर्या केली. अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त केल्या. त्याने स्वतःला खूप मजबूत बनवले. पुढे परिस्थिती अशी बनली की रावणाने हल्ला करून कुबेराकडून सोन्याची नगरी हिसकावून घेतली. कुबेरला तेथून पळावे लागले. हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये कुबेर यांना केवळ धन आणि संपत्तीचा देव मानला जात नाही, तर तो यक्षांचा राजा देखील आहे. (Marathi Trending Headline)

पुराण सांगतात की कुबेराच्या आधीही माली, सुमाली आणि माल्यवान नावाच्या तीन राक्षसांनी लंकापुरीला त्रिकुटा सुबेल म्हणजेच सुमेरू पर्वतावर वसवले होते. मालीचा वध केल्यानंतर देव आणि यक्षांनी कुबेराला लंकापती बनवले. रावणाची आई कैकशी ही या तीन राक्षसांपैकी एक सुमालीची मुलगी होती. नाना सुमालीच्या चिथावणीवरून रावणाने आपला सावत्र भाऊ कुबेर याच्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. (Top Stories)

रावणाने तपश्चर्या केली आणि जंगलात राहून त्याने त्याचे मजबूत सैन्य तयार केले. जेव्हा रावणाने कुबेराच्या वैभवशाली नगरावर सैन्यासह हल्ला केला, तेव्हा हा हल्ला इतका तीव्र होता की कुबेर आणि त्याचे सैन्य टिकू शकले नाही, त्याला तेथून आपल्या कुटुंबासह पळून जावे लागले. (Top Marathi Headline)

कुबेर तिथून पळून गेला. तेथून तो अलका पर्वतावर जाऊन राहू लागला. यानंतर रावणाने त्याची सर्व संपत्ती आणि लंका ताब्यात घेतली. मात्र, कुबेरांनी स्वत: वडील विश्रवा यांच्या सांगण्यावरून रावणाला लंका दिली होती, असेही म्हटले जाते. या वेळी रावणाने कुबेरचे पुष्पक विमानही हस्तगत केले, ज्याचा त्याने पुरेपूर उपयोग केला. रावण सीतेचे अपहरण करण्यासाठी याच विमानात जंगलात गेला होता. नंतर श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला तेव्हा ते या विमानाने अयोध्येला परतले. (Latest Marathi News)

=======

Navratri : दुर्गा सप्तशतीचे पाठ कधी आणि कसे करावे?

=======

कुबेर तिथून पळून गेला. तेथून तो अलका पर्वतावर जाऊन राहू लागला. यानंतर रावणाने त्याची सर्व संपत्ती आणि लंका ताब्यात घेतली. मात्र, कुबेरांनी स्वत: वडील विश्रवा यांच्या सांगण्यावरून रावणाला लंका दिली होती, असेही म्हटले जाते. या वेळी रावणाने कुबेरचे पुष्पक विमानही हस्तगत केले, ज्याचा त्याने पुरेपूर उपयोग केला. रावण सीतेचे अपहरण करण्यासाठी याच विमानात जंगलात गेला होता. नंतर श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला तेव्हा ते या विमानाने अयोध्येला परतले. (Top Trending News)

अनंत नीलकंथन यांचे पुस्तक असुर आणि रामानंद सागर यांच्या टीव्ही सीरियल रामायणनुसार, रावणाचे वडील विश्रवा यांनी त्याला श्राप दिला की, एक दिवस ही लंका आपल्या हातून निघून जाईल. त्याला केवळ पराभवच नाही तर मृत्यूलाही सामोरे जावे लागणार होते. नंतर झालेही तसेच. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.