Home » Vijay Rupani : अहमदाबाद विमान अपघातात निधन झालेले विजय रूपाणी कोण होते?

Vijay Rupani : अहमदाबाद विमान अपघातात निधन झालेले विजय रूपाणी कोण होते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Vijay Rupani
Share

गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज भीषण विमान अपघात घडला. या अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटचा टेक ऑफ दरम्यान अपघात झाला. या विमानात प्रवास करत असलेल्या २४२ प्रवासी आणि २ पायलट, १० क्रू मेंबर्सचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमान जिथे कोसळले तो रहिवासी परिसर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना सध्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले जात आहे. (Vijay Rupani)

अहमदाबाद वरून लंडनला जाणारे विमान हे मेघानीनगर भागात कोसळले. अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. यामध्ये १५ डॉक्टर देखील जखमी झाले आहेत. सध्या इथे बचावकार्य वेगाने सुरु झाले आहे. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. दुर्दैवाने रूपाणी यांचे या अपघातामध्ये निधन झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी एका मोठ्या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, विजय रूपाणी यांच्या पत्नी अंजली रूपाणी या सध्या लंडनमध्ये असून, त्यांना परत आणण्यासाठीच विजय रूपाणी लंडनकडे रवाना झाले होते. (Marathi News)

Vijay Rupani

कोण होते विजय रूपाणी?
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा जन्म २ ऑगस्ट १९५६ रोजी म्यानमारच्या यंगोन (येनगोन) शहरात झाला होता. त्यांच्या आईचं नाव मायाबेन तर वडिलांचे नाव रमणिकलाल रूपाणी आहे. सात भावंडांमध्ये विजय हे सगळ्यात लहान होते. १९६० साली म्यानमारमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे रूपाणी यांचे कुटुंब भारतात परत आले आणि गुजरातमधील राजकोटमध्ये स्थायिक झाले. (Todays Marathi Headline)

विजय रूपाणी यांनी सौराष्ट्र विद्यापीठातून बीए आणि एलएलबीची पदवी संपादन केली होती. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या सदस्य असलेल्या अंजली यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा असून, तो इंजिनिअर आहे आणि एक मुलगी असून, तिचे लग्न झाले आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलाचा एका अपघातात मृत्यू झाला. (Top Marathi HEadline)

विजय रूपाणी यांची राजकीय कारकीर्द
विजय रूपाणी हे गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री होते. त्यांनी २०१६ ते २०२१ या कालावधीत गुजरातचे मुख्यमंत्री हे पद भूषवले. ते भाजपकडून राजकोट वेस्ट मतदारसंघातून आमदार होते. त्याआधी ते राज्यसभेचे खासदारही होते. शालेय वयातच विजय रूपाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) सदस्य झाले. १९७१ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडले गेले. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनच ते पक्षाशी सक्रिय राहिले. १९७६ च्या आणीबाणीच्या काळात त्यांना ११ महिने तुरुंगवास झाला. (Marathi Latest news)

Vijay Rupani

१९९६-९७ मध्ये ते राजकोटचे महापौर होते. त्यानंतर १९९८ मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात युनिटचे सचिव म्हणून नेमण्यात आले. २००६ मध्ये गुजरात पर्यटन महामंडळाचे ते अध्यक्ष देखील झाले. त्याच काळात ते राज्यसभेचे सदस्यदेखील होते. विजय रूपाणी हे २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरात म्युनिसिपल फायनान्स बोर्डचे अध्यक्ष झाले. २०१४ मध्ये त्यांनी राजकोट वेस्ट मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील. आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात विजय रूपाणी वाहतूक मंत्री झाले. २०१६ मध्ये ते भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष बनले आणि त्याच वर्षी ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांनी स्वीकारली. २०१७ मध्ये भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आणि विजय रूपाणी यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्यात आले. (Top Marathi News)

===========

हे देखील वाचा :  Plane Crash : ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सच सांगतो अपघाताचे कारण

                       Ahmedabad : अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना लंडनला जाणारे विमान कोसळले

===========

अशातच अपघातग्रस्त एअर इंडिया एअरलाइन्सच्या विमानात कोणीही वाचले नसल्याचे माहिती समोर आली आहे. त्यानंतर AP या वृत्तसंस्थेकडूनही यासंदर्भात मोठी माहिती देण्यात आली आहे. अहमदाबाद येथे क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानातील कोणीही वाचलेले नाही, असा दावा एपी या वृत्तसंस्थेकडून करण्यात आला आहे. अपघातग्रस्त विमानात पायलट आणि क्रू मेंबर्ससह २४२ लोक होते. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज प्रवासी होते, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.