Home » हा जस्टिन बीबर आहे तरी कोण ?

हा जस्टिन बीबर आहे तरी कोण ?

by Team Gajawaja
0 comment
Justin Bieber
Share

अगदी लहान वयात आंतरराष्ट्रीय पॉप स्टार असे बिरुद मिळवलेला जस्टिन बीबर आठवतो का ? हा जस्टिन बीबर गेल्या दोन वर्षापासून त्याच्या चाहत्यांपासून दूर होता. जस्टिन बीबरला एका दुर्मिळ आजारानं ग्रासलं. त्यात त्याच्या चेह-याची एक बाजु लुळी पडली आणि जस्टिन त्याच्या गाण्यापासून पर्यायानं त्याच्या चाहत्यांपासून दूर झाला होता. (Justin Bieber)

मात्र आता या आजारावर मात करत जस्टिन पुन्हा एकदा स्टेज गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. जस्टिन बीबरचे इव्हेंट होत असून त्याच्या आधी त्यानं सोशल मिडियावर त्याचा एक फोटो शेअर केला आहे.  यातील जस्टिनचा लूक बघून त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. जस्टिनच्या चेह-यावर दाढी मिशा वाढलेल्या असून तो बराच थकलेला दिसत आहे. त्याचा हा तणावग्रस्त चेहरा आणि  जस्टिनला रडताना पाहून त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.   

आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबर गेल्या दोन वर्षापासून त्याच्या गाण्यापासून दुरावला आहे. तरुण वयात पॉप स्टार झालेल्या या युवा गायकाला एका दुर्मिळ आजारानं त्याच्या चाहत्यांपासून दूर केलं. वास्तविक जस्टिन बीबर प्रसिद्ध झाला तो त्याचे गाणे आणि त्याच्यामुळे झालेले वाद यामुळे. पण याच जस्टिनला आजार झाल्यावर त्याचे लाखो चाहते बेजार झाले होते. या आजारावर मात करुन जस्टिन पुन्हा गाण्याकडे परतला आहे. (Justin Bieber)

मात्र त्याचा नेहमीचा लुक प्रचंड बदलला आहे. त्याचा हाच चेहरा बघून चाहते धास्तावले आहेत.  ३० वर्षीय आंतरराष्ट्रीय पॉप गायक असलेल्या जस्टिनने एका संगीत महोत्सवात गाणे सादर केले.  दोन वर्षानंतर झालेल्या या कार्यक्रमामुळे जस्टिन प्रचंड भावूक झाला होता.  त्यामुळे त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते.  जस्टिन सोबत त्याची पत्नी  हेली बीबरही होती.  हेलीनेच त्याचा हा रडणारा फोटो सोशल मिडियावर शेअर करत आम्ही सर्व तुझ्यासोबत असल्याचे जस्टिनला सांगितले आहे. एका मोठ्या आजारातून सावरत पुन्हा गाण्याकडे येतांना आपण भावूक झाल्याचे जस्टिनने सांगितले.  

२०२२ मध्ये, जस्टिन बीबरला रामसे हंट सिंड्रोम (RHS)  या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल रोगाचे निदान झाले.  त्यात त्याच्या चेहऱ्याची डावी बाजू अर्धांगवायू झाल्यामुळे लुळी पडली.  हा जस्टिनच्या गाण्याच्या करिअरला ब्रेक असल्याचे मानले गेले.  त्याच दरम्यान त्याची पत्नी हेली बीबर हिलाही आरोग्याची मोठी समस्या जाणवू लागली.   या सर्व अडचणींवर मात करत जस्टिन पुन्हा उभा राहिला आहे.  जस्टिन बीबरच्या बेबीया गाण्याने अनेक विक्रम केले.  वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कारावर त्याचे नाव लिहिले गेले.  जस्टिन बीबरने थोडेथोडकडे नव्हे तर तब्बल ३९ जागतिक विक्रम केले आहेत. (Justin Bieber)

जस्टिनचे बालपण अतिशय वेदनामयी आठवणींचे आहे.  त्याची आई पॅटी ही तिच्यावर झालेल्या शारीरिक अत्याचारामुळे  लहानपणापासूनच ड्रग्जच्या आहारी गेली.  तिला शाळेतून काढून टाकल्यावर तिची  जस्टिनचे वडिल जेरेमी बीबर यांच्यबरोबर भेट झाली.  मार्च १९९४ रोजी जस्टिन बीबरला जन्म झाला.  त्याचा जन्म झाल्यावर पॅटी आणि जेरेमीच्या नात्यात दुरावा आला आणि ते दोघे वेगळे राहू लागले.  जस्टिनला शिकवण्यासाठी पॅटीने मिळेल ती नोकरी केली.  जस्टिनची लहानपणापासून संगिताकडे अधिक गोडी होती.  सँटफोर्ड स्कूलमध्ये शिकत असताना जस्टिनला संगीताची आवड निर्माण झाली.

तो स्वतः पियानो, ड्रम, गिटार आणि ट्रम्पेट वाजवायला शिकला. वयाच्या १२ व्या वर्षापासून जस्टिनने शाळेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात परफॉर्म करायला सुरुवात केली.  हेच व्हिडिओ त्याची आई पॅटी सोश मिडीयात शेअर करु लागली आणि जस्टिन बीबर या आंतरराष्ट्रीय पॉप गायकाचा जन्म झाला.  १३ व्या वर्षी जस्टिनने पहिले गाण्याचे रेकॉर्डिंग केले.  हे पहिलेच गाणे कित्येक दिवस बेस्ट १०० च्या लिस्ट मध्ये होते.  वयाच्या १५ व्या वर्षी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासाठी परफॉर्म करण्याची संधी त्याला मिळाली. जस्टिनचा पहिला अल्बम माय वर्ल्ड २.०’ जानेवारी २०१०  मध्ये रिलीज झाला.  त्याचे बेबी‘  गाणे हे यूट्यूबवर सर्वाधिक पाहिले गेलेले गाणे होते.  जस्टिनला बेबी या गाण्यासाठी ग्रॅमी नामांकन मिळाले. या गाण्याने सर्वाधिक लोकप्रिय ऑनलाइन व्हिडिओ होण्याचा जागतिक विक्रमही नोंदवला आहे.  २०१२ मध्ये कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी त्याला ज्युबिली पदक प्रदान केले होते. (Justin Bieber)

===========

हे देखील वाचा : साठ वर्षाची आजी बनली मिस युनिव्हर्स

===========

एकीकडे यशाचा हा आलेख चढत असतांना जस्टिनसंदर्भात अनेक वादही झाले.  त्याच्या अनेक अफेअरनंही त्याच्यावर टिका होत असतांना त्याने  मॉडेल हेली बाल्डविनबरोबर लग्न केले.  २०१४ मध्ये, त्याला फ्लोरिडाच्या मियामी बीचवर दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल अटक झाली.  त्यावेळी त्याने ड्रग्जचे सेवन केल्याचेही सिद्ध झाले.  कॅलिफोर्निया येथील जस्टिन बीबरच्या शेजाऱ्याने त्याच्यावर अंडी फेकल्याचा आरोप केला.  हा आरोपही सिद्ध झाला.  जस्टिनच्या या वागणुकीमुळे त्याला चीनमध्ये बंदी घालण्यात आली आहे.  २०२० मध्ये, जस्टिनला  रॅमसे हंट सिंड्रोम नावाचा दुर्मिळ रोग झाला.  त्यात त्याच्या अर्ध्या चेह-याला अर्धांगवायू झाला.  तेव्हापासून प्रसिद्धी आणि गाण्यापासून दुरावलेला जस्टिन पुनरागमन करत आहे.  आता त्याच्यात झालेला हा बदल पाहून चाहते धास्तावले आहेत.  आतातरी जस्टिनने त्याची वागणूक सुधारून फक्त गाण्याकडे लक्ष द्यावे अशीच चाहत्यांची इच्छा आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.