Home » Dalai Lama : कोण आहे दलाई लामांचा उत्तराधिकारी !

Dalai Lama : कोण आहे दलाई लामांचा उत्तराधिकारी !

by Team Gajawaja
0 comment
Dalai Lama
Share

तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा हे लवकरच वयाची नव्वदी पूर्ण करत आहेत. दलाई लामा यांचा हा 90 वा वाढदिवस साजरा करतांना त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याचा शोध घेण्यात येत आहे. तिबेटी धर्मगुरुंनुसार दलाई लामांचा उत्तराधिकारी नेमतांना पुनर्जन्माबाबातच नियम पाळणे गरजेचे असते. त्यासाठी आता तिबेटमध्ये तयारी सुरु झाली आहे. हुल येथील तिबेटी बौद्ध नेत्यांच्या एका पुनर्जन्म धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले होते. मात्र कम्युनिस्ट पक्षाच्या राजकीय शाखेचे प्रमुख वांग हुनिंग यांनी या सोहळ्याला अचानक भेट दिली. यामुळे तिबेटमध्ये खळबळ निर्माण झाली असून दलाई लामांच्या उत्तराधिका-याची निवड आता चीनतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे तिबेटमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (Dalai Lama)

14 वे दलाई लामा 90 वर्षांचे होणार आहेत आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणजेच 15 वे दलाई लामा कोण असणार यासाठी तिबेटमध्ये धार्मिक सोहळे असतांनाच यात आता चीनच्या अधिका-यांनी दखल द्यायला सुरुवात केली आहे. वास्तविक दलाई लामा यांचा 89 वा वाढदिवस 6 जुलै 2024 रोजी तिबेटी समुदायाच्या नेतृत्वाखाली साजरा होत असतांनाच चीननं पुढचा दलाई लामा निवडण्याची प्रक्रिया सुरु केली होती. त्यानुसारच चीनचे वरिष्ठ अधिकारी आता तिबेटमध्ये ठाण मांडून बसले आहेत. दलाई लामा यांच्या 90 व्या वाढदिवसाला चीन ही घोषणा करणार असल्याची बातमी आल्यानं तिबेटमधील जनजीवन पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. 14 व्या दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडण्यावरून चीन आणि तिबेटमधील वाद पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे. चीननं तिबेट हा आपला अविभाज्य भाग असल्याचे जाहीर करत दलाई लामांचा उत्तराधिकारी आपण निवडण असणार असेही जाहीर केले आहे. (International News)

मात्र तिबेटमधील जनतेनं या विधानांचा तीव्र शब्दात विरोध केला आहे. तिबेट हा चीनचा भाग कधीच नव्हता, त्यामुळे दलाई लामांचा उत्तराधिकारी निवडणे ही तिबेटची बाब असल्याचे येथील जनतेचे म्हणणे आहे. मात्र चीननं या सर्व विरोधाला बाजुला सारत दलाई लामांच्या उत्तराधिका-याच्या शोधासाठी तिबेटमधील धर्मगुरुंच्या धार्मिक सोहळ्याला उपस्थिती लावायला सुरुवात केली आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या राजकीय शाखेचे प्रमुख वांग हुनिंग यांनी तिबेटी बौद्ध नेत्यांच्या पुनर्जन्माबद्दलच्या प्रदर्शनात हजेरी लावली. हा सोहळा दलाई लामा यांच्या निवडीसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यातच वांग हुनिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळेच वांग यांच्याकडेच दलाई लामांचे उत्तराधिकारी निवडण्याची जबाबादारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Dalai Lama)

तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु म्हणून दलाई लामांकडे बघितले जाते. पोपप्रमाणेच दलाई लामांचा उत्तराधिकारीही निवडला जातो. परंतु दलाई लामांचा उत्तराधिकारी नेमतांना पुनर्जन्माचा आधार घेतला जातो. यासाठी वयाचीही मर्यादा असते. काही संकेत हे तपासले जातात. ही सर्व प्रक्रिया गेल्या काही वर्षापासून खुद्द दलाई लामा 14 वे यांच्या देखरेखीखाली पार पडत असतांनाच यात आता चीननं प्रवेश केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या स्थापनेनंतर हा सर्व वाद सुरु आहे. कम्युनिस्ट चीनी राजवटीने तिबेटवर आपला ताबा असल्याचे जाहीर केले. शिवाय तिबेटी संस्कृतीही मिटवण्यासाठी पद्धतशीरपणे कार्यक्रम राबवला. तिबेटी मुलांना जबरदस्तीनं चीनमधील शाळांमध्ये भरती करुन घेतलं आहे. शिवाय तिबेटी तरुणींचा विवाह चीनी तरुणांबरोबर करुन दिला. यामुळे तिबेटमधील नव्या पिढीला त्यांची बोलीभाषाही निट बोलता येत नाही. (International News)

=======

हे देखील वाचा : Salman Rushdie : पुन्हा ‘सॅटनिक व्हर्सेस’ चे वादळ !

Bashar Al-Assad : बेशुमार संपत्तीसाठी अस्मा यांचा घटस्फोटाचा अर्ज

=======

या सर्वांवर तिबेटमधील तरुणांमध्येही नाराजी असली तरी चीनी दडपशाहीविरोधात त्यांना आवाज उठवता आलेला नाही. गेल्या काही वर्षांनी तिबेटी तरुणांच्या संघटनेनं यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघातही दाद मागितली होती, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता याच चीनकडून थेट दलाई लामांचा वारसदार नेमला जाणार असल्यामुळे अधिक संताप व्यक्त होत आहे. 1959 मध्ये दलाई लामांना भारतात आश्रय घ्यावा लागला. तेव्हापासून चीन (china) आणि दलाई लामा (Dalai Lama) यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. आता त्याच दलाई लामांऐवजी चीनचे दलाई लामा आले तर त्यांच्यासाठी चीन ही प्राथमिकता रहाणार आहे. असे झाल्यास चीन तिबेटची सर्व ओळख पुसून टाकेल अशी भीती व्यक्त होत आहे. (Dalai Lama)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.