भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये मागील काही दिवसापासून मोठ्याप्रमाणावर हिंसा आणि आंदोलन सुरु आहे. सोशल मिडिया बॅनवरुन शिवाय नेपाळमधला भ्रष्टाचार आणि बेरोजगारी सुरु झालेल्या या आंदोलनाने उग्र रुप घेतले. आंदोलनाच्या केवळ दोनच दिवसात के.पी. शर्मा ओली यांचे सरकार पडले. GEN-Z लोकांनी केलेल्या आंदोलनात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. अनेकांचा यात मृत्यू झाला तर मोठ्या प्रमाणावर लोकं जखमी झाले. नेपाळमधील नेत्यांना, मंत्र्यांना अक्षरशः पळवून पळवून मारण्यात आले. मात्र आता प्रश्न होता की, नेपाळचे नवीन पंतप्रधान कोण असणार?, नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर कोणाची सत्ता स्थापन होणार? आता यावर एक नाव समोर येत आहे. (Marathi News)
नेपाळच्या पंतप्रधान पदाच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की या आता नेपाळच्या पंतप्रधान होणार असल्याचे समजत आहे. सुशीला कार्की ह्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनणार आहेत. नेपाळचे राष्ट्रपती रामचन्द्र पौडेल त्यांना पंतप्रधान पदाची शपथ देतील. GEN-Z समर्थकांनी देखील कार्की यांच्या नावावर एकमत दिले आहे. काठमांडूचे महापौर आणि PM पदाचे पक्के दावेदार समजल्या जाणाऱ्या बालेन शाह यांनी देखील कार्की यांना समर्थन दिले आहे. (Todays Marathi HEadline)
सुशीला कार्की नक्की आहे तरी कोण?
७ जून १९५२ रोजी नेपाळमधील बिराटनगर येथे जन्मलेल्या सुशीला कार्की या नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश आहेत. बिराटनगरच्या कार्की कुटुंबातील सुशीला कार्की या त्यांच्या पालकांच्या सात मुलांपैकी सर्वात मोठ्या आहेत. सुशीला कार्की या नेपाळच्या पहिल्या आणि एकमेव महिला सीजेआय आहेत. त्यांनी २०१६ मध्ये सीजेआय म्हणून पदभार स्वीकारला. सुशीला कार्की या नेपाळच्या न्यायव्यवस्थेतील एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहेत. १९७२ मध्ये, सुशीला यांनी बिराटनगरमधीलच महेंद्र मोरंग कॅम्पसमधून बीएची पदवी घेतली. (Latest Marathi News)
सुशीला यांनी त्यांनी वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातून राजनीतिशास्त्रात पदवी घेतली आणि पुढे नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. १९७९ मध्ये त्यांनी विराटनगर येथे वकिली सुरू केली आणि त्यानंतर सहाय्यक शिक्षिका म्हणूनही काम केले. पुढे २००७ मध्ये त्या सीनियर ॲडव्होकेट बनल्या. २००९ मध्ये ॲड-हॉक न्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती झाली आणि २०१० मध्ये त्या स्थायी न्यायाधीश बनल्या. ११ जुलै २०१६ ते ७ जून २०१७ पर्यंत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाची धुरा सांभाळली. नेपाळच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनण्याचा ऐतिहासिक मान त्यांना मिळाला. (Top Marathi Headline)
महिलांच्या अधिकारांवरील ठोस निर्णय, भ्रष्टाचाराविरोधी कारवाई आणि पोलीस भरतीतील अनियमिततेवर केलेल्या कडक कारवायांमुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या. २०१७ मध्ये त्यांच्याविरुद्ध संसदेत महाभियोग प्रस्ताव आणला गेला होता, मात्र जनतेच्या दबावामुळे तो मागे घ्यावा लागला. आज नेपाळच्या अस्थिर राजकारणात पुन्हा एकदा कार्की यांचे नाव नागरिकांकडून मोठ्या आशेने घेतले जात आहे. (Top Trending News)
========
Nepal : राजकारण्यांच्या मुलांच्या अतीलाडानं पडलं ओली सरकार !
========
एका मुलाखतीमध्ये सुशीला कार्की यांनी भारताबद्दल आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ” भारत आणि नेपाळचे नाते खुप जुने आहे. भारताने नेपाळला नेहमीच मदत केली आहे. मात्र आमच्यात वादही झाले. मात्र यामुळे आमचे नाते अधिकच पक्के झाले.” पुढे मोदींबद्दल त्या म्हणाल्या, “मी नरेंद्र मोदी यांना प्रणाम करते. माझ्यावर नरेंद्र मोदी यांचा चांगला प्रभाव आहे. मी नेपाळचे नेतृ्त्व आणि जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. नेपाळमधील आंदोलनात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या Gen-Z गटाने माझ्यावर विश्वास दर्शवला आहे. हा विश्वास मी नक्कीच सार्थकी लावले. या आंदोलनामध्ये ज्यांनी प्राण गमावले, अशा लोकांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी करणे आमचे पहिले काम असणार आहे.” (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics