मुंबईमध्ये ३० ऑक्टोबर रोजी एक थरारक नाट्य प्रकरण घडले. मुंबईतील पवई भागातील एका स्टुडिओमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या १५ वर्षांखालील १७ मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचा प्रकार घडला. मुलांना ऑडिशनसाठी एका स्टुडिओत बोलवण्यात आले होते. पवईच्या आरए स्टुडिओ इथे ही १७ मुलं ऑडिशनसाठी आली होती, ही मुलं जेवणाच्या ब्रेकसाठी बाहेर न आल्याने पालकांना काळजी वाटू लागली. अशातच एका व्यक्तीने या १७ मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती देणारा व्हिडीओ पालकांना पाठवला. (Marathi News)
रोहित आर्य असे या ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव होते. रोहितने व्हिडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवल्याचे सांगत जर त्याचे ऐकून घेतले नाही तर स्टुडिओला आग लावेल अशी धमकी देखील दिली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पालकांमध्ये एकच खळबळ आणि गोंधळ उडाला. त्यानंतर पालकणी थेट पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर सुदैवाने अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी सर्व मुलांना सुखरुप तिथून बाहेर काढले. मात्र या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये रोहित आर्य हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. मात्र ही घटना घडवून आणणारा रोहित नक्की होता तरी कोण? जाणून घेऊया. (Who is Rohit Arya)
रोहित आर्या कोण होता?
रोहित आर्या मूळचा पुण्याचा रहिवासी होता. नागपूरमधील एका महाविद्यालयात प्राध्यापक होता. सध्या तो चेंबूरमध्ये राहत होता. रोहित आर्याने ऑगस्ट २०२४ मध्येही गोंधळ घातला होता. ऑगस्ट २०२४ मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात रोहित आर्याने उपोषण केले होते आणि त्यावेळी त्याला अचानक फिट आली होती. फिट आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माझी शाळा, सुंदर शाळा या प्रकल्पाचे डिझाईनही त्यानेच केल्याचा दावा रोहितने केला होता. पण त्याची दखल घेतली नसल्याने त्याने सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. (Todays Marathi Headline)

त्याच्याकडे पोलिसांना एक एअरगन देखील सापडली आहे. शिवसेना नेते दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना त्याला एका शाळेच्या कामाचं टेंडर मिळालं होते. पीएससी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे दोन कोटी रुपये सरकराने थकवल्याचा आरोप देखील रोहित आर्या याने केला होता, त्याने दीपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री असताना केसरकर यांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण देखील केलं होतं, त्यामुळे तेव्हा तो चर्चेत आला होता. शाळेच्या दुरूस्तीच्या कंत्राटाचे पैसे थकले होते. सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. आत्महत्या करण्याचा विचार होता. मात्र त्याने काहीही होणार नसल्याने लक्ष वेधण्यासाठी रोहीत याने हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. (Top Marathi Headline)
रोहितच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो, ‘प्रोजेक्ट लेट्स चेंज’ या संस्थेचा संस्थापक आणि संचालक होता. ही एनजीओ शाळांमध्ये स्वच्छता जनजागृती आणि मुलांना ‘स्वच्छता दूत’ बनवण्यावर काम करत होती. त्याने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या प्रकल्पासाठी ‘स्वच्छता मॉनिटर’ ही संकल्पना मांडल्याचा दावा केला होता. २०१३ मध्ये त्याने गुजरातमध्येही हा उपक्रम सुरू केला होता. मुख्य म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी त्याचे कौतुकही केले होते. (Marathi Latest News)
रोहितने या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पावर आणि अन्य सरकारी योजनांमध्ये ६० ते ७० लाख रुपये स्वतःच्या खिशातून खर्च केले होते. मात्र, शिक्षण विभागाने त्याला त्याच्या प्रकल्पाचे पैसे थकवल्याचा आरोप त्याने केला. या प्रकल्पासाठी जवळपास २ कोटी रुपयांची तरतूद असूनही त्याचे पैसे थकवल्याचा त्याचा दावा होता. या आर्थिक नुकसानीमुळे त्याने २०२४ मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उपोषण आणि आंदोलनही केले होते. या दरम्यान त्याला १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन मिळाले होते, तसेच केसरकर यांनी वैयक्तिक पातळीवर १५ लाख रुपये दिले होते, असे त्याने पत्रकार परिषदेत सांगितले होते. (Top Trending News)
=========
Donald Trump : शटडाऊनमुळे अमेरिकेतील परिस्थिती बिकट !
=========
दरम्यान रोहितने पालकांना पाठवलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले होते की, “मला कोणालाही मरायचे नाही, मला आत्महत्या करायची नाही. मी कोणताही दहशतवादी नाही, माझ्या काही मागण्या आहेत, खूप साध्या मागण्या आहेत. खूप मॉरल आणि एथिकल मागण्या आहेत. तसेच माझी काही प्रश्न आहेत मला काही लोकांशी बोलायचे आहे. त्यांना प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरे देखील हवी आहेत.मला दुसरे काहीच नको. ना मी दहशतवादी आहे ना माझी पैशांची मागणी आहे. जर मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मी संपूर्ण स्टूडियोला आग लावेल अशी धमकी देखील त्याने दिली होती.” (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
 
			         
														