Home » Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Rakesh Kishore
Share

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश असलेल्या भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. राकेश किशोर असे या वकिलाचे नाव असून, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या वकिलाला वेळीच रोखले. या घटनेनंतर राकेश यांना कोर्टाबाहेर काढण्यात आले. या घटनेच्या वेळी राजेश किशोर यांनी ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही’ असा आरडाओरडा देखील केला. (Rakesh Kishore)

या दुर्दैवी घटनेनंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने या वकिलाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यामुळे बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर यांचे लायसन्स रद्द केले आहे. त्यामुळे राकेश किशोर यांना आता कोणतेही न्यायालय, न्यायाधिकरण किंवा न्यायाधिकरणासमोर वकिली करता येणार नाही. थोडक्यात सांगायचे तर राकेश भविष्यात पुन्हा कधीही वकिली करू शकणार नाहीत. (Top Marathi Headline)

शिवाय सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश किशोर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. या संपूर्ण घटनेनंतर राकेश किशोर यांना अटक करण्यात आली. मात्र पोलिसांनी राकेश किशोर यांना लगेच सोडून देखील दिले. बार कौन्सिल ऑफ इंडियाने या प्रकरणाची दखल घेत राकेश किशोर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. सोबतच त्यांना १५ दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल, ज्यामध्ये त्यांना कारवाई का करू नये हे स्पष्ट करावे लागणार आहे. त्यांनी दिलेल्या उत्तरानंतर कौन्सिल ऑफ इंडिया निर्णय जाहीर करणार आहे. (Marathi News)

दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर चर्चेत आलेले राकेश किशोर कोण आहे ते जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार, ७२ वर्षीय राकेश किशोर हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत आणि ते दिल्लीच्या मयूर विहार परिसरात राहतात. त्यांनी २००९ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली होती. ज्येष्ठ वकील असलेले राकेश किशोर हे अनेक वर्षांपासून विविध बार असोसिएशन्सचे सदस्य राहिले आहेत. पोलिसांना राकेश किशोर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन, शाहदरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार कौन्सिलचे सदस्यत्व कार्ड असल्याचे सांगितले आहे. (Todays Marathi Headline)Rakesh Kishore

राकेश किशोर यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून मेडिकल एंटोमोलॉजीतून पीएचडी केलीय. तो जागतिक आरोग्य संघटनेचा सल्लागारही होता आणि आपण मानसिकदृष्ट्या निरोगी असल्याचंही सांगितलं. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र राकेश किशोरची घटना ही श्रद्धेपेक्षा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेलं कृत्य वाटत असल्याचं म्हटलंय. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. (Trending Marathi Headline)

दरम्यान वकील राकेश किशोर यांनी हे कृत्य का केले याबद्दल स्पष्टीकरण दिले आहेत. सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर म्हणाले, “भगवान विष्णूंबद्दल सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ विधानाने मला खूपच वाईट वाटले. त्यांच्या त्या विधानावर ही माझी प्रतिक्रिया होती. मी कोणत्याही नशेत नव्हतो. जे घडले त्याबद्दल मला अजिबातच पश्चात्ताप नाही आणि मी कोणाला घाबरत देखील नाही. मी या कृत्यासाठी तुरुंगामध्ये जाण्यास देखील तयार आहे.” (Top Marathi News)

राकेश किशोर पुढे म्हणाले, “मी स्वतः हिंसेविरुद्ध आहे, पण एका अहिंसक, प्रामाणिक व्यक्तीला, ज्याच्यावर कोणतेही खटले नाहीत आणि ज्याचा कोणत्याही गटाशी संबंध नाही, अशा व्यक्तीला असे कृत्य का करावे लागले? ही गोष्ट विचार करण्यासारकखी आहे. मी कमी शिकलेला माणूस नाही. मी माझे एम.एस्सी., पीएच.डी. आणि एलएलबी पूर्ण केले आहे आणि मी सुवर्णपदक विजेता आहे.” (Latest Marathi Headline)

नक्की कोणत्या विधानामुळे राकेश यांनी हे कृत्य केले पाहूया. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूंच्या ७ फूट उंच शिरच्छेदित मूर्तीच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश गवई यांच्या टिप्पण्यांमुळे वकील राकेश हे नाराज असल्याचे सांगितले जाते. १६ सप्टेंबर रोजी, सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी (वामन) मंदिरात भगवान विष्णूची ७ फूट उंच तुटलेली मूर्ती पुनर्संचयित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. (Top Trending News)

=========

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

Railway : आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

=========

ते म्हणाले, “हा निर्णय आमच्या धार्मिक भावना दुखावतो. न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की ही मूर्ती मूळ स्थितीत राहील. जर भाविकांना पूजा करायची असेल तर ते इतर मंदिरांमध्ये जाऊ शकतात.” मुघल आक्रमणांदरम्यान मूर्तीचे नुकसान झाले होते आणि तेव्हापासून ती त्याच स्थितीत आहे, असा याचिकाकर्त्याचा दावा आहे. म्हणून, सर्वोच्च न्यायालयाने भाविकांच्या पूजा करण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आणि मंदिराचे पावित्र्य पुनर्संचयित करण्यासाठी हस्तक्षेप करावा. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.