हिंदू धर्म हा वेद, शास्त्रांनी संपन्न आणि समृद्ध असा देश आहे. आपण जितका याचा अभ्यास करू तितका कमीच वाटतो. आपले जुने वेद, ग्रंथ याचा अभ्यास करणे हे वाटते तितके सोपे नाही. यासाठी ध्यास हवा. उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी या शहरामध्ये देशभरातून किंबहुना जगभरातून लोकं आपल्या वेदांचा अभ्यास करण्यासाठी येतात. याच वाराणसीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याने इतिहास रचला आहे. देवव्रत महेश रेखे नावाच्या केवळ १९ वर्षाच्या मुलाने महाराष्ट्राच्या मुलाने दंड कर्म पारायणाचा अभ्यास पूर्ण केला. २०० वर्षात पहिल्यांदा शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनी शाखेचा संपूर्ण एकाकी कंठस्थ दंडक्रम पारायण पूर्ण झाले आहे. दंड कर्म पारायण हे अत्यंत कठीण पारायण मानले जाते. मात्र महाराष्ट्राच्या या लेकाने हा भीम पराक्रम केला आहे. याआधी नाशिकच्या वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी दंडकर्म पारायण पूर्ण केले होते. (Devvrat Rekhe)
महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील १९ वर्षांच्या देवव्रत महेश रेखे यांची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. देवव्रत महेश रेखे यांनी दंडक्रम पारायण हे वेद पठणातील सर्वात कठीण प्रकारांपैकी असणारे पूर्ण केले आणि दंडक्रम विक्रमादित्य ही पदवी संपादित केली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीचे खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी देवव्रतचे कौतुक केले आहे. (Marathi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रत महेश रेखेंचं कौतुक करताना म्हटले की, “१९ वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी जे केलं ते येणाऱ्या पिढ्या नक्की लक्षात ठेवतील. भारतीय संस्कृतीबाबत आस्था असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी ५० दिवसांत शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील २००० मंत्रांचा समावेश असलेले दंडक्रम पारायण कोणत्याही व्यत्ययाशिवाय पूर्ण केलं आहे. यामद्ये अनेक श्लोक आणि पवित्र शब्दांचा समावेश असतो. ते आपल्या गुरु परंपरेच्या सर्वोत्तमत्तेचं मूर्त रुप आहेत. काशीचा खासदार म्हणून मला आनंद आहे की, या पवित्र शहरात हे घडलं. त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या संतांना, विद्वानांना आणि भारतातील विविध संघटनांना माझा प्रणाम, असं मोदी म्हणाले. ” (Todays Marathi Headline)

तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले, “वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी श्रीक्षेत्र काशी येथे ५० दिवसांपासून १६५ तासांपेक्षा जास्त काळ अत्यंत कठीण अशा दण्डक्रमचे पारायण करुन दण्डक्रम विक्रमादित्य पदवीस पात्र झाल्याबद्दल अहिल्यानगर, महाराष्ट्र येथील वेदमूर्ती चि. देवव्रत महेश रेखे यांचे मनापासून अभिनंदन. आणि वैदिक परंपरेचे तेज असेच उजळत राहो ही मनस्वी शुभेच्छा असं मुख्यमंत्री म्हणाले.” (Latest Marathi News)
देवव्रत रेखे कोण आहे?
महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील रहिवासी वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे यांचे पुत्र असलेले देवव्रत रेखे हे केवळ १९ वर्षाचे आहेत. त्यांनी काशीच्या रामघाट येथील सांगवेद विद्यालयातून शिक्षण घेतले. २९ नोव्हेंबरला दंडक्रम पारायण पूर्ण केल्यानंतर शृंगेरी शंकराचार्य यांनी देवव्रत यांचा सन्मान करत त्यांना सोन्याचे कडे आणि १ लाख १ हजार ११६ रूपये दिले. वाराणसीच्या रामघाट येथील वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयातील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी कठोर अभ्यास आणि समर्पणातून हे यश मिळवले. (Marathi News)
१२ ऑक्टोबरपासून सुरू झालेले हे तप २९ नोव्हेंबरला पूर्ण झाले. दंडक्रम पारायणकर्ते अभिनंदन समितीचे पदाधिकारी चल्ला अन्नपूर्णा प्रसाद, चल्ला सुब्बाराव, अनिल किंजवडेकर, चंद्रशेखर द्रविड घनपाठी, प्रा. माधव जर्नादन रटाटे यांनी देवव्रत यांच्या यशाबद्दल सांगताना ते नित्यनियमाने साडे तीन ते ४ तास पठण करून दंडक्रम पारायण पूर्ण केल्याचे सांगितले. या पारायण काळामध्ये देवव्रत यांनी सुमारे 25 लाखांपेक्षा जास्त श्लोकांचं पठण करून वैदिक क्षेत्रात विश्वविक्रम केला. देवव्रतने २००० मंत्र आणि वैदिक श्लोक परिपूर्ण स्वरात पठण केले. भारताच्या शाश्वत गुरु परंपरेत, याला “दंडक्रम पारायण” असे म्हटले जाते. ते पूर्ण करणाऱ्यांना वेदमूर्ती ही पदवी देऊन सन्मानित केले जाते. महाराष्ट्रातील रहिवासी देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांनंतर ते पूर्ण केले आहे. (Latest Marathi News)
========
Datta Jayanti : वाराणसीमध्ये स्थित आहे उत्तर भारतातील एकमेव जागृत दत्त मंदिर
Audumbar Tree : औदुंबर वृक्षाचे महात्म्य आणि कथा
========
दंडक्रम पारायण म्हणजे काय?
वेदपठणातील सर्वात कठीण प्रकारांपैकी एक म्हणजे दंडक्रम पारायण. मंत्रांची विशिष्ट, कठोर क्रमाने पुनरावृत्ती यामध्ये होते. रोज जवळपास दोन हजार मंत्रांचं पठण, ५० दिवस केले जाते. यामध्ये मंत्रांचे सरळ, उलटे आणि पुन: सरळ स्वरुप क्रम अचूक स्वरसंयमासह उच्चारावे लागतात. (Top trending News)
‘दंडक्रम पारायण’ हे शुक्ल यजुर्वेदातील सुमारे २००० मंत्रांचे एक अत्यंत गुंतागुंतीचे आणि कठीण पठण आहे, जे देवव्रत यांनी ५० दिवस कोणत्याही व्यत्ययाशिवाय सतत पूर्ण केले. जवळजवळ 200 वर्षांनंतर वैदिक परंपरेत पहिल्यांदाच ते शुद्ध शास्त्रीय शैलीत सादर केले जात असल्याचे मानले जाते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
