आजच्या लेखात आपण जगामध्ये पहिला कम्प्युटर व्हायरस (first computer virus) तयार करणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती घेणार आहोत. कम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप यांचा वापर जवळपास सगळेच करत असतात. त्यामुळे सर्वानाच यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या व्हायरस बद्दलही माहीतच आहेच. आपल्या गॅजेट्सना व्हायरस पासून सुरक्षित ठेवण्यासाठी अँटी व्हायरस, क्लीन मास्टर अशा अनेक ॲप्सचा आजच्या काळात सर्रासपणे वापर होत असतो.
गॅजेट्स हाताळताना अनेक प्रकारचे व्हायरस सिस्टीम अथवा ठराविक सॉफ्टवेअरवर अटॅक करूनत्यामधील फाईल्सना हानी पोचवतो. तसेच आपल्याकडे सेव्ह करून ठेवलेल्या, आपल्या खाजगी व गोपनीय माहितीची चोरी करून त्याचा गैरवापरही केला जाऊ शकतो. याचबरोबर या माहितीच्या आधारे ब्लॅकमेलिंगही केले जाते.
या व्हायरसमुळे एखादा महागडा फोन पूर्णपणे खराब झाल्याच्या किंवा मोबाईलमधील अथवा लॅपटॉप, कम्प्युटरमधील सर्व महत्वपूर्ण माहिती डिलीट झाल्याचा अनुभवही अनेकांनी घेतला असेल. या व्हायरसमुळे केवळ व्यक्ती नाही, तर कित्येक संस्था किंवा कंपन्यांनाही त्रास सहन करावा लागतो. कित्येकांचे आर्थिक नुकसानही यामुळे झाले आहे, तर काहींचे आयुष्य उद्धवस्थ झाले आहे. तर, अशा या व्हायरसचा शोध नक्की कसा आणि कोणी लावला, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण व्हायरसचा शोध आपल्या शेजारच्या देशात- पाकिस्तानमध्ये लागला आहे. १९८६ मध्ये पाकिस्तानमधील लाहोर येथे राहणाऱ्या दोन बंधूनी जगातील पहिला कॉम्प्युटर ‘व्हायरस’ (first computer virus) बनवला व त्याला ‘ब्रेन’ असे नाव दिले. स्वतःचा कम्प्युटर नसल्याने हे बंधू सायबर कॅफेमध्ये जाऊन सॉफ्टवेअर तयार करत असत. आयटी कंपनीत काम करणाऱ्या अमजद फारुद अल्वा आणि बसिद फारुद अल्वा या बंधूनी पाकिस्तान मध्ये जगातल्या पहिल्या व्हायरसचा शोध लावला.
हे सुद्धा: एसबीआय (SBI) संबंधित या ७ महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
सॉफ्टवेअरचा चुकीच्या पद्धतीने होणारी विक्री थांबविण्याचे उद्देश असलेल्या या दोन बंधूनी ‘ब्रेन’ व्हायरसची निर्मिती केली. पाकिस्तानसारख्या देशात जिथे शिक्षणाची कमतरता, बिकट आर्थिक परिस्थिती आणि तांत्रिक सामग्रीचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीतही या बंधूनी जगातल्या पहिल्या व्हायरसचा शोध लावत सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात पाकिस्तानचे नाव वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
हे ही वाचा: हिंदू धर्मात मृत्यूपश्चात लहान मुलांना अग्नी न देता दफन का करतात?
अरे बापरे! जगातील सर्वात लहान सिरीयल किलर आहे अवघ्या आठ वर्षाचा…
आपले गॅजेट्स व्हायरस पासून दूर ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे ॲप्स प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. कोणतेही ॲप्स डाउनलोड करण्याआधी आपण त्याची योग्य माहिती तपासतो. कम्प्युटरचा व्हायरस पासून बचाव करण्यासाठी ‘ब्रेन’ व्हायरस तयार करणाऱ्या या बंधूंच्या कामगिरीचे महत्त्व खूप मोठे आहे. तर, जगातला पहिला कम्प्युटर व्हायरस (first computer virus)कम्प्युटर बिघडविण्यासाठी नाही, तर व्हायरसपासून कम्प्युटरच्या बचाव करण्यासाठी तयार करण्यात आला होता. ‘
-निवास उद्धव गायकवाड