दरवर्षीप्रमाणे २०२५ चा जागतिक महिला दिनसुद्धा उत्तम साजरा झाला. दरवर्षी प्रत्येक संस्था, संघटना आणि सरकारसुद्धा अनेक क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करतच असतात. त्यातच ८ मार्चला दोन महिलांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटसवर या दोन्ही महिलांचा फोटो टाकून त्यांचा गौरव केला होता. कोण आहे या दोन महिला ? ज्यांचं कर्तृत्व पंतप्रधानांपर्यंत पोहोचलं आहे, जाणून घेऊ. (Elina and Shilpi)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या दोन महिलांचे फोटो पोस्ट करत कौतुक केलं, त्यापैकी एक आहेत, न्युक्लीअर सायंटीस्ट एलिना मिश्रा आणि दुसऱ्या आहेत स्पेस सायंटीस्ट शिल्पी सोनी… पंतप्रधानांनी दोघींचा गौरव केल्यानंतर त्यांची देशभरात चर्चा होत आहे. न्युक्लीअर सायंटीस्ट एलिना मिश्रा यांच्याबाबत सांगायचं झालं तर, त्या मुळच्या उडीसामधील भुवनेश्वरच्या आहेत. घरात बालपणीपासूनच शैक्षणिक वातावरण, त्यामुळे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकंदरीत अनुकूल वातावरण त्यांच्या घरात होतं. वडिलांमुळे एलिना यांच्या अंगी विज्ञानाची गोडी वाढत गेली. याच वेळी त्यांनी न्युक्लीअर सायन्स विषयात काहीतरी करण्याचा निश्चय केला. त्यांची निवड मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रासाठी झाली होती. यानंतर त्यांच्या स्वप्नांना जणू बळच मिळालं. (political news)
इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, एक्सीलरेटर फिजिक्स आणि टेक्नॉलॉजी यामध्ये एलिना यांचा हातखंडा आहे. विज्ञान क्षेत्रात तशी फार लोकांना आवड नसते. पण काही मोजक्या लोकांमुळे हे क्षेत्र आज टिकून आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाचं आणि मानवजातीचं कल्याण करत आहे. याच क्षेत्रात योगदान देत आज एलिना मिश्रा या न्युक्लीअर सायंटीस्ट झाल्या आहेत. त्यांनी अणुक्षेत्रात विविध प्रयोगदेखील केले आहेत. ग्रामीण भागांमध्ये आरोग्यविषयक सुविधा फार कमी असतात. अशा भागांमध्ये सर्व सुविधा पोहोचाव्यात, यासाठी एलिना झटत आहेत. (Elina and Shilpi)
स्पेस सायंटीस्ट शिल्पी सोनी यांची गोष्ट फारशी अशीच आहे… शिल्पी या मुळच्या मध्यप्रदेशच्या सागरमधल्या… त्यांच्या घरची परिस्थितीही फारशी साधारण होती. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना संशोधन, शिक्षण आणि आपल्या संस्कृतीचा वारसा घरातूनच मिळाला. कल्पना चावला यांनी ज्याप्रमाणे आपल्या स्वप्नांना बळ देऊन अवकाशात भरारी घेतली. त्याच अवकाशाची आवड शिल्पी यांनाही होती. अथक परिश्रम करून त्यांनी डीआरडीओमध्ये रुजू झाल्या. इथे त्यांना प्रत्येक गोष्टींचा चांगला अनुभव मिळाला आणि गेल्या २४ वर्षांपासून डीआरडीओमध्येच कार्यरत आहेत आणि त्यांनी ३५ पेक्षा जास्त उपकरणं आणि नेव्हिगेशन मशीनसाठी त्या संशोधन करत आहेत. शिल्पी सांगतात की, इस्रो एक अशी संस्था आहे जिथे तुमच्या संशोधनाला खऱ्या अर्थाने बळ मिळते. (political news)
==============
हे देखील वाचा : America : अमेरिकेत जन्मलेल्या मुलांनाही देश सोडावा लागणार !
==============
आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहेत. यामध्ये महिलादेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रांमध्ये योगदान देत आहेत. मंगळयान मोहीम यशस्वी होण्यात महिलांचाच महत्त्वाचा वाटा होता. या दोन कर्तृत्ववान महिनाव्यतिरिक्त आणखी चार महिलांचा पंतप्रधानांनी गौरव केला. त्या म्हणजे चेन्नईच्या चेस प्लेयर वैशाली रमेशबाबू, दिल्लीच्या डॉ. अंजली अग्रवाल, नालंदाच्या व्यावसायिकां अनिता देवी आणि राजस्थानच्या entreप्रेन्योर अजैता शाह ! यांनीही आपापल्या क्षेत्रांमध्ये विशेष कामगिरी केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगानेही त्यांची दखल घेतली. (Elina and Shilpi)
ज्या गोष्टी पुरुषांना शक्य आहेत, त्या महिलांनाही शक्य आहेत. पण तरीही अनेकदा त्यांच्या स्वप्नांना चिरडलं जातं. मात्र काही स्त्रिया अशा असतात, ज्या आपल्या जिद्दीने जगाला हे दाखवून देतात की, वो स्त्री है… कुछ भी कर सकती है !