प्रत्येकालाच सुंदर दिसायचे असते. अशातच आपला चेहरा स्वच्छ असणे महत्त्वाचे असते. मात्र ज्या महिलांच्या चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स असतात त्यांना नेहमीच आपण अधिक सुंदर कसे दिसणार याची चिंता वाटत असते. यापैकीच आणखी एक समस्या अशी की बहुतांश महिला त्यांना व्हाइडहेड्सच्या समस्येचा सामना करतात.यासाठी त्या स्टीम, फेशिअल किंवा अन्य काही ब्युटी ट्रिटमेंट्स सुद्धा घेतात. तरीही ही समस्या पुन्हा होते. त्वचेवर जेव्हा डेड स्किन आणि ऑइल जमा होते तेव्हा चेहऱ्यावर लहान-लहान व्हाइट रंगाचे दाणे येऊ लागतात. जे स्किन पोर्सवर दिसून येतात. जर तुम्हाला व्हाइड हेड्सच्या समस्येपासून दूर रहायचे असेल तर पुढील काही घरगुती उपाय वापरू शकता. (Whiteheads Remedies)
टी-ट्री ऑइल
टी-ट्री ऑइलच्या मदतीने तुम्ही व्हाइटहेड्स अगदी सहज काढू शकता. यासाठी कॉटन पॅडवर टी-ट्री ऑइलचे काही थेंब टाकून व्हाइटहेड्सवर अप्लाय करा. जर तुमची स्किन सेंसिटीव्ह आहेत तर ते ऑइल कॉटन पॅडवर लावण्यापूर्वी कॉनट पॅड पाण्याने भिजवा आणि नंतरच ते चेहऱ्यावर अप्लाय करा. असे तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता.
टुथपेस्टचा वापर
टुथपेस्ट वापरून ही तुम्ही व्हाइटहेड्स काढू शकता. यासाठी थोडी टुथपेस्ट काढून घेत ती व्हाइटहेड्सच्या येथे लावा. अर्धा तास ती तशीच राहू द्या. त्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा स्वच्छ करू शकता. हा उपाय तुम्ही दिवसातून दोन ते तीनवेळा करू शकता.
बेकिंग सोड्याचा वापर
बेकिंग सोड्याचा वापर करून तुम्ही स्किन संदर्भातील सर्व समस्या दूर करू शकता. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करा आणि व्हाइटहेड्सच्या येथे अप्लाय करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून १५-२० मिनिटे ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळेस करू सकता.
मधाचा वापर
व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी मधं वापरू शकता. यासाठी मधं हलक गरम करा आणि त्यानंतर चेहऱ्यावर जेथे व्हाइटहेड्स आहेत तेथे अप्लाय करा. २० मिनिटांपर्यंत ते मध तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून तीन ते चार वेळेस हा उपाय तुम्ही करू शकता. (Whiteheads Remedies)
हेही वाचा- डार्क सर्कल दूर करण्यासाठी डाएटमध्ये खा ‘हे’ फूड्स
अॅप्पल साइडर विनेगर
अॅप्पल साइडर विनेगर स्किन प्रॉब्लेमस दूर करण्यास मदत करते. व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी अॅप्पल साइडर विनेगर कॉटन पॅडवर घेऊन अप्लाय करा. त्यानंतर ते तसेच थोडावेळ ठेवून चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)