Home » भात खाण्याचे ‘हे’ आश्चर्यचकीत करणारे फायदे वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

भात खाण्याचे ‘हे’ आश्चर्यचकीत करणारे फायदे वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

0 comment
White Rice Benefit
Share

अनेकांना त्यांच्या जेवणात भात खाण्याची सवय असते. खरतर डाळ,भात,भाजी चपाती हेच परिपूर्ण जेवण समजले जाते. भात खाल्ला नाही तर  पोटभरल्यासारख वाटत नाही अस तुम्ही अनकेकांकडून ऐकल असेल. मात्र आजकाल वजन कमी करण्याच्या नादात अनेकांनी भात खाण्याला फूली मारली आहे. भात खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. हेच आता सगळ्यांच्या डोक्यात बिंबवले जात आहे. त्यामुळे भात न खाण्याचे 10 बहाणे तुमच्याकडे असतील. मात्र तुम्हाला माहीत आहे का भातात असे काही गुण आहेत जे तुम्हाला दुसऱ्या कशातूनही तेवढ्या जास्त प्रमाणात मिळू शकत नाहीत. आणि भातातील याच गुणामुळे  जगभरातील अब्जावधी लोक तांदूळ खातात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांचेही असेच काहीसे मत आहे. ती लोकांना भात खाण्यासाठी प्रवृत्त करते.त्या म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आपल्या जेवणात तांदळाचा समावेश केला पाहिजे.भात खाण्याचा नेमका कसा आणि काय फायदा होतो ते आज आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.(White Rice Benefit)

White Rice Benefit
White Rice Benefit


– सर्वप्रथम, आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की तांदळात प्रोबायोटिक्स असतात. हे केवळ आपले पोट भरत नाही तर आपल्या शरीराच्या वैविध्यपूर्ण परिसंस्थेत वाढणार्या लाखो सूक्ष्मजंतूंचे पोषण देखील करते.वेगवेगळ्या पद्धतीने भात शिजवून तुम्ही कांजीपासून खीरपर्यंत काहीही अतिशय चविष्ट पदार्थ तयार करू शकता.

– भात खाल्ल्याने तुम्ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेऊ शकता. विशेषत: जेव्हा तुम्ही ते भारतीय पद्धतीने खाता. म्हणजे डाळ, दही, कढीपत्ता, तूप आणि अगदी माशासोबत भात खाल्ला तरीही उत्तम. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता याबद्दल म्हणतात की, ज्यांना मधुमेह आहे ते लोक तांदूळ देखील खाऊ शकतात, तांदळाचा चयापचय सिंड्रोमशी कोणताही संबंध नाही.

– फक्त एक वाटी तांदूळ खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, त्यात भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे मेंदू चांगले काम करण्यास तसेच चयापचय वाढण्यास मदत होते.

White Rice Benefit
White Rice Benefit

– सोयाबीन आणि डाळींसोबत तांदळाचे सेवन केल्याने शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो. त्यामुळे बहुतांश भात डाळीबरोबर किंवा खिचडीच्या स्वरूपात खाल्ला जातो.(White Rice Benefit)

– आपण रात्रीचे जेवण फक्त भात ही खाऊ शकता, रात्रीच्या जेवणाच्या बाबतीत ते खूप हलके आहे. रात्रीच्या जेवणात भात खाल्ल्याने चांगली झोप येते आणि भरपूर विश्रांती मिळते. यामुळे तुमचे हार्मोनल बॅलन्स चांगले राहते.आणि हार्मोनल संतुलन खूप महत्वाचे आहे, विशेषत: मध्यम वयीन आणि तरुणांसाठी .

======================================

हे देखील वाचा: पांढरे मीठ आणि सैंधव मीठ यामध्ये काय असतो फरक? जाणून घ्या फायदे आणि नुकसान 

======================================

अल्झायमरच्या रुग्णांसाठी तांदूळ खूप फायदेशीर आहे, असे मानले जाते.कारण तांदूळ खाल्ल्याने मेंदूत न्यूरोट्रांसमीटर च्या विकासाला गती मिळते, जे अल्झायमर रोगाशी लढण्यास उपयुक्त आहे. 

– जर तुम्हाला तुमच्या सौंदर्याची आणि त्वचेच्या काळजी असेल आणि तुम्हाला तुमची त्वचा चमकावी अस वाटत असेल तर तुम्ही भात अजिबात नाकारू नये. तांदूळ उच्च प्रोलॅक्टिन पातळीमुळे होणार्या मोठ्या छिद्रांना मुक्त करते. तसेच जे लोक तांदूळ खातात त्यांच्या केसांची वाढ चांगली होते आणि केस गळती कमी होते. 

लक्षात घ्या कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो त्यामुळे ते पदार्थाला ही लागू होते. अगदी भाताच ही तसेच आहे तुम्ही भात प्रमाणात खाल्लात तर त्याचा कधीही त्रास होणार नाही मात्र तो तेवढाच प्रमाणात खाणे गरजेचे आहे. 

 (डिस्क्लेमर: वरील लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. वरील सर्व माहिती पूर्णपणे खरी असल्याचा आम्ही कोणताही दावा करत नाही.) 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.