अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेले व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या प्रतिष्ठेचे प्रमाण मानले जाते. या व्हाईट हाऊससोबत अमेरिकेचा इतिहास जोडला गेला आहे. व्हाईट हाऊसचे बांधकाम १७९२ मध्ये सुरू झाले आणि १८०० मध्ये पूर्ण झाले. या व्हाईट हाऊसमध्ये पहिले अध्यक्ष जॉन अॅडम्स १८०० मध्ये आले. १८१४ च्या युद्धात ब्रिटीश सैन्याने जाळल्यानंतर व्हाईट हाऊस पुन्हा बांधण्यात आले. १९०१ मध्ये अधिकृतपणे “व्हाईट हाऊस” असे नामकरण करण्यात आले. (America)

अमेरिकन लोकशाहीचे प्रतीक असलेले हे व्हाईट हाऊस अनेक गुढ कथांनी गाजलेही आहे. सध्या या व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या कुटुंबियांसह रहात आहेत. हेच व्हाईट हाऊस अध्यक्षांचे अधिकृत कार्यालय देखील आहे. आत्तापर्यंत या व्हाईट हाऊसबद्दल जनमानसात अनेक चर्चा होत होत्या. व्हाईट हाऊसखाली आणखी एक व्हाईट हाऊस असून तिथे आधुनिक यंत्रणा असलेले विमान अध्यक्षांसाठी चोवीस तास तैनात असते, असेही सांगितले जाते. मात्र या सर्व चर्चांमध्ये आता ट्रम्प यांच्या एका कृतीने अधिक भर घातली आहे. कारण या व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प एक अलिशान बॉलरुम बांधत आहेत. या बॉलरुमसाठी ट्रम्प यांनी थोडा थोडके नव्हे तर ₹२,१०० कोटी खर्च केले आहेत. यासाठी व्हाईट हाऊसचा ईस्ट विंगचा भागही पाडण्यात आला आहे. या भागात अमेरिकेच्या फर्स्ट लेडीचे कार्यालय असते, मात्र आता तो भाग बॉलरुमसाठी वापरण्यात येणार आहे. (International News)
पण हे सर्व होत असतांना ट्रम्प या बॉलरुमच्या नावाखाली व्हाईट हाऊसखाली एक बंकर खोदत आहेत का, अशी चर्चा होऊ लागली आहे. कारण गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या बॉलरुमच्या कामाला अद्यापही उशीर लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हे काम जेवढ्या दिवसात पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती, त्याच्या दुप्पट वेळ लागूनही बॉलरुमचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळेच बॉलरुमचे नाव पुढे करुन ट्रम्प या भागाखाली स्वतंत्र बंकर उभारत असल्याची माहिती येत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा दुस-यांचा पदभार स्विकारल्यावर ट्रम्प यांची कारकिर्द पाहता, त्यांनी अनेकांना दुखावले आहे. त्यातून त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. असा हल्ला झाल्यास सुरक्षित असे बंकर हवे, म्हणून व्हाईट हाऊसखाली जगातील सर्वात सुरक्षित बंकर ट्रम्प उभारत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. (America)
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुस-यांदा विराजमान झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वात आधी व्हाईट हाऊसच्या नुतनीकरणास सुरुवात केली. त्यासोबतच त्यांचे ड्रीम असलेल्या बॉलरुमच्या उभारणीचीही तयारी सुरु केली. व्हाईट हाऊसच्या पूर्व विंगमध्ये ट्रम्प यांनी बॉलरुमचे काम सुरु केले आहे. मात्र हेच बॉलरुम आता नेमके काय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या बॉलरुमच्या कामाची न्यायालयीन कागदपत्रे आणि अहवाल यावरुन या बॉलरुमच्या खाली स्वतंत्र बंकर तयार होत असल्याचे स्पष्ट होत आहे. व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुसी विल्स यांनाही यासंदर्भात विचारणा करण्यात आल्यावर, अद्याप बॉलरुमचा प्रकल्प नेमका कसा असेल याचे कोणतेही पेपर आपल्याजवळ नसल्याचे सांगितले. (International News)

तेव्हापासून या बॉलरुमबाबत शंका निर्माण झाली आहे. व्हाईट हाऊसमध्ये बॉलरूमचे बांधकाम थांबवण्यासाठी एका संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या उत्तरात, ट्रम्प प्रशासनाने सांगितले की, हे बांधकाम राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक आहे आणि ते थांबवता येणार नाही. सोबतच अमेरिकन गुप्तचर सेवेच्या सुरक्षेसंदर्भात गरजा पूर्ण करण्यासाठी ईस्ट विंग साइटवर पुढील काम आवश्यक असल्याचे या उत्तरात सांगण्यात आले. याशिवाय न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये असेही म्हटले आहे की, येथे भूमिगत काम चालू आहे आणि पायाचे काम जानेवारीमध्ये सुरू होईल. एप्रिल २०२६ पूर्वी जमिनीवरील कोणतेही बांधकाम सुरू होणार नाही हेही यात सांगितल्यामुळे, बॉलरुमच्या नावाखाली ट्रम्प व्हाईट हाऊसच्या खाली जगातील सर्वात सुरक्षित असे बंकर तयार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (America)
=======
हे देखील वाचा : Kunar River : पाकिस्तानचे पाणी बंद !
=======
या बॉलरुमच्या बांधकामासाठी ट्रम्प यांनी स्वतः 2,711 कोटी रुपये दिल्याची माहिती आहे. या नव्या बॉलरुमचे स्वरुप व्यापक आहे. त्यात एकाचवेळी ९९९ पाहुणे बसण्याची सोय आहे. त्याचे काम चालू असल्यामुळे व्हाईट हाऊसच्या ईस्ट विंगची कार्यालये तात्पुरती स्थलांतरित करण्यात आली आहेत. १९४८ मध्ये ट्रुमन बाल्कनी बांधल्यानंतरचा हा बॉलरूम व्हाईट हाऊसमधील सर्वात मोठा संरचनात्मक बदल आहे. आता तिथे बॉलरुम होत आहे, की त्याच्या नावाखील बंकर हे काही वर्षात उघड होणार आहे. (International News)
सई बने
