Home » Sunrise : ‘या’ ठिकाणी पहाटे ४ वाजताच होतो भारतातील पहिला सूर्योदय

Sunrise : ‘या’ ठिकाणी पहाटे ४ वाजताच होतो भारतातील पहिला सूर्योदय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Sunrise
Share

प्रत्येकालाच नवनवीन जागी फिरायला आवडत असते. नव्या ठिकाणी जाऊन तेथील सुंदर सुंदर ठिकाणे पाहणे जणू अनेकांचा छंदच आहे. बहुतकरून आपण ज्या नवीन ठिकाणी फिरायला जातो तिथे सनसेट आणि सन राइज असे दोन पॉईंट्स असतातच असतात. कारण सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे हे सुंदर दृश्य डोळ्यात साठवणे एक वेगळाच अनुभव असतो. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटनस्थळांवर सनराईज आणि सनसेट पॉईंट्स सुद्धा असतात. या ठिकाणी भल्या पहाटे आणि संध्याकाळी पर्यटकांची तोबा गर्दी असते. नवी आशा घेऊन येणार सूर्योदय पाहणे वेगळेच सुख असते. आपण सर्वानी आजवर अनेक ठिकाणी जाऊन किंवा घरातून सुद्धा सूर्योदय होताना पाहिले असेल. मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात सर्वात पहिला सूर्योदय कुठे होतो? चला जाणून घेऊया याच ठिकाणाबद्दल. (Sunrise)

भौगोलिक हालचालींमुळे, सूर्यकिरणे भारताच्या पूर्वेकडील भागात प्रथम पडतात आणि शेवटचे सूर्यकिरणे पश्चिमेकडील भागात दिसतात. भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वात आधी सूर्योदय होतो. अरुणाचल प्रदेश हे राज्य भारतातील ईशान्येकडील राज्य आहे. अरुणाचल प्रदेशातील डोंग व्हॅली येथे सर्व प्रथम सूर्याची किरणे पडतात. या ठिकाणी असलेले डोंग हे गाव पहिल्या सूर्योदयासाठी ओळखले जाते. भारत, चीन आणि म्यानमारच्या ट्राय जंक्शनवर वसलेले हे छोटेसे गाव ईशान्य सीमेवर असलेले देशाचे पहिले गाव म्हणता येईल. (Happy New Year)

यापूर्वी अंदमानच्या कटचल टापूवर सूर्याची पहिली किरणे पडतात असे मानले जात होते. मात्र आता डोंग हे भारतावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडणारे गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. १९९९ पासून हे गाव पर्यटकांच्या नकाशावर आले असून देश विदेशातून अनेक पर्यटक येथे आवर्जून सूर्योदय पाहायला येतात. डोंग गावाची भौगोलिक रचना अशी आहे की, ज्यामुळे या गावात सर्वात आधी सूर्योदय होतो. सूर्य पूर्व दिशेकडून उगवतो आणि डोंग हे भारताच्या सर्वात पूर्वेकडील भागात, उंचीवर स्थित आहे. त्यामुळे देशातील इतर भागांच्या तुलनेत येथे सुमारे एक ते सव्वा तास आधी सूर्योदय होतो. त्यामुळे येथे सूर्योदय पाहायचा असेल, तर पहाटे ४ वाजण्यापूर्वीच जागे होणे आवश्यक असते. हवामानानुसार साधारण साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान सूर्यदर्शन घडते. (Todays Marathi HEadline)

Sunrise

डोंग हे अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्याचे पूर्वेकडील गाव आहे. जे समुद्रसपाटीपासून १,२४० मीटर म्हणजे जवळपास सुमारे ४,०७० फूट उंचीवर आहे. या गावाची ओळख त्याच्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यासाठी आहे. प्रवासाची आवड असलेल्यांसाठी आणि छायाचित्रकारांसाठी हे एक उत्तम ठिकाण मानले जाते. भारत, म्यानमार आणि चीन या तीन देशांच्या सीमावर्ती भागात हे गाव वसलेले आहे. येथे पोहोचण्यासाठी ट्रेकिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. ज्या प्रमाणे या गावात सूर्योदय लवकर होतो त्याच प्रमाणे सूर्यास्त सुद्धा लवकर होण्यास सुरुवात होते. सायंकाळी ४ वाजल्यापासून येथे सूर्य मावळण्यास सुरुवात होते. त्यामुळे या गावातील नागरिक आपली कामे लवकर आटोपतात आणि संध्याकाळी जेवणाची तयारी सुरू करतात. तसेच झोपतात सुद्धा लवकरच. या गावातील नागरिक संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत चहा आणि नाश्ता करतात. (Top Marathi News)

अतिशय निसर्गसुंदर अशा या गावाची लोकसंख्या फक्त ३५ आहे. डोंगचा सूर्योदय पाहण्यासाठी येथून ८ किमीचा ट्रेक करून जावे लागते. भारतातील बहुतेक भाग जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा म्हणजे पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्यकिरणे पडतात. पहाटे चार वाजता येथे स्वच्छ उजाडलेले असते आणि येथील लोक त्यांच्या रोजच्या कामाला लागलेले असतात. येथे १२ तासांचा दिवस असतो. आपण जेव्हा दुपारी चारच्या सुमारास चहा पाणी घेण्याच्या तयारीत असतो तेव्हा हे छोटुसे गाव रात्रीच्या गडद अंधारात झोपण्याच्या तयारीत असते. (Top Trending Headline)

डोंग व्हॅली केवळ देशातील पहिल्या सूर्योदयासाठीच नव्हे, तर अप्रतिम निसर्गसौंदर्यासाठी सुद्धा ओळखली जाते. इथल्या उंच पर्वतरांगांमधून वाहणारी आकर्षक लोहित नदी आणि तिचे स्वच्छ, निळसर पाणी. शिवाय इथे तिलम हॉट स्प्रिंग देखील बघण्यासारखे आहे. डोंग ट्रेकनंतर गरम आणि खनिजयुक्त पाण्यात डुबकी मारणे थंडीत सुखावणारा अनुभव आहे. सांधेदुखीवरही हे पाणी उपयुक्त मानले जाते. याशिवाय डोंग व्हॅलीजवळील सिको डिडो धबधबा, तसेच तेजूजवळील हवा कॅम्प येथून दिसणारे मनमोहक दृश्य सगळ्यांनी एकदातरी पाहिलेच पाहिजे. (Latest Marathi News)

========

New Year : का दरवर्षी १ जानेवारीलाच साजरे केले जाते नवीन वर्ष?

Hindu : ‘हा’ आहे जगातील एकमेव असे देश आहे जिथे आजही हिंदू कॅलेंडर पाळले जाते

========

डोंग गावात कसे पोहचाल?
भारतातील मोठ्या शहरांमधून तुम्हाला विमानाने गुवाहाटी किंवा डिब्रुगड येथे जावे लागेल. हे अरुणाचल प्रदेशातील अंजु जिल्ह्याजवळ डोंग गावाजवळ स्थित आहे. याशिवाय आपण ट्रेनने दिब्रुगड (DBRG) जाऊ शकता किंवा तिनसुकिया (TSK) जाण्यासाठी ट्रेनने जाऊ शकता. येथून तुम्हाला गाडीने अंजु जिल्ह्यातील तेझू येथे जावे लागेल, ज्यासाठी आपण बस किंवा टॅक्सी घेऊ शकता. ह्याच्या पुढे वालोंग आहे येथून तुम्ही काही वेळ ट्रेकिंगनंतर डोंगला पोहोचाल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.