आपल्या हिंदू धर्मामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावण्याला मोठे महत्त्व आहे. सकाळी अंघोळ झाल्यानंतर घरातील व्यक्ती देवासमोर दिवा लावतात. तर संध्याकाळी पुन्हा फ्रेश होऊन देवासमोर दिवा लावला जातो. देवासमोर दोन वेळा दिवा लावणे हा प्रत्येक घरातील एक अलिखित नियमच आहे जणू. हाच नियम आपोआपच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. केवळ घरातील देवासमोरच नाही तर मंदिरात देखील दिवा लावण्याला मोठे महत्त्व देण्यात आले आहे. मात्र देवासमोर दिवा लावण्याचे कारणं तुम्हाला माहित आहे का?, देवा समोर नक्की तेलाचा की, तुपाचा कोणता दिवा लावणे शुभ मानले जाते?, दिवा लावण्याचे कोणते फायदे आहेत? चला याच गोष्टींबद्दल जाणून घेऊया. (Marathi)
आपल्याकडे असे म्हटले जाते की, अग्निदेव यांना साक्षी ठेऊन जी कामं केली जातात ती यशस्वी होतातच. आपल्या शरीराच्या निर्मितीला मदत करणाऱ्या पाच घटकांपैकी अग्नि हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय अग्नि हा भगवान सूर्याचेच रुप समजले जाते. दिवा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. मान्यता आहे की देवासमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा विकसित होते. काही लोकांच्या मते मंदिरात दिवा लावल्याने देव आपल्या मनाला प्रकाशाकडे नेते. दिवा हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. शास्त्रात सांगितले आहे की दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते. (Religious)
अनेकदा बरीच ठिकाणी देवासमोर तुप आणि तेलाचे दिवे लावल्याचे आपण पाहतो. पण तुपाचा दिवा कधी लावायचा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा असा संभ्रम लोकांच्या मनात नेहमीच असतो. कोणता दिवा लावणे अधिक लाभदायक असते असा प्रश्न देखील विचारला जातो. हिंदू धर्मात देवी-देवतांच्या समोर तूप आणि तेलाचे दोन्ही दिवे लावले जातात. विविध पूजांमध्ये देखील देवासोर एका समईमध्ये तेलाचा तर एका समईमध्ये तुपाचा दिवा लावला जातो. माहितीनुसार देवाच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. (Todays Marathi News)

घरामध्ये तेलापेक्षा तुपाचा दिवा लावणे सर्वात शुभ मानले जाते, असे शास्त्रात सांगितले आहे. असे मानले जाते की घरात तुपाचा दिवा लावल्याने देवता प्रसन्न होतात आणि देवी लक्ष्मी घरात वास करते. याशिवाय घरामध्ये तुपाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात. तुपाचा दिवा घरात शुभ ऊर्जा आकर्षित करतो. जिथे दररोज तुपाचा दिवा लावला जातो तिथे अंधार, गरिबी आणि नकारात्मकता कधीच टिकत नाही. जळणारा तुपाचा दिवा हा चुंबकासारखा असतो तो नेहमी दैवी शक्तींना स्वतःकडे आकर्षित करतो. यामुळे घरात आनंद, शांती आणि समृद्धी येते. (Marathi Trending News)
घरात तुपाचा दिवा लावला तर सकारात्मक ऊर्जा आणि शुद्धता राहते. देवी-देवता यांची कृपादृष्टी प्राप्त होते तसेच सुख समृद्धी वाढते, पितृदोष, कालसर्प दोष आणि राहु-केतु कमी होतो असे सांगितले जाते. विशेषतः भगवान विष्णु, माता लक्ष्मी, महादेव, प्रभू श्रीराम आणि श्री कृष्ण, गणपती, सूर्य देव, दुर्गा माता, सरस्वती माता यांच्यासमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावणे लाभदायक असते. दिव्यात कापसाची वात ठेवून पूर्व किंवा उत्तर दिशेला दिवा लावावा. (Top Trending Headline)
तुपाचा दिवा लावणे जरी लाभदायक असले तरी तेलाच्या दिव्याचे देखील मोठे महत्त्व आहे. तेलाचा दिवा लावल्याने तांत्रिक आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते, वाईट शक्ती आणि ग्रह दोष शांत होतात. तसेच शनी, राहु आणि केतुचे अशुभ प्रभाव देखील कमी होतात. तुमच्या कामातील अडचणी होतात. या उद्देशांसाठी बजरंगबली हनुमान आणि शनि महाराजांसाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावणे उत्तम मानले जाते. काळ भैरवासाठी ही तीळाचा दिवा लावतात. त्याशिवाय काली माता, महावीर अशा देवतांसाठी तेलाचा दिवा लावणे शुभ आणि फलदायी मानले जाते. (Top Marathi News)
दिवा लावताना या गोष्टी लक्षात घ्या
– दिवा लावताना लक्षात ठेवा की दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर ठेवावा.
– चुकूनही पश्चिमेला दिवा लावू नका. असे केल्याने गरीबी येते आणि संपत्तीची हानी होते.
– संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते.
– सकाळ-संध्याकाळ घरात दिवा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. (Latest Marathi Headline)
– आपण स्वतःहून दिवा कधीही विझवू नये, दिव्यातील तूप किंवा तेल कमी झाले की तो आपोआप विझतो.
=======
Chhath Pooja : छठ पूजा म्हणजे काय? जाणून घ्या चार दिवसांच्या या सणाबद्दल माहिती
=======
– शनि किंवा भैरवासाठी देवघराबाहेर किंवा कोणत्याही मंदिरात दिवा लावणे शुभ मानले जाते. (Top Trending News)
– देवी-देवतांसमोर दिवा लावताना आपले विचार पवित्र आणि शुद्ध हवेत.
– तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत.नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, शनिच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच मानसिक समाधानासाठी तिळाच्या तेलाचा दिवा शास्त्रात सर्वोत्तम मानतात.
– कुंडलीतील राहू-केतुचे दोष दूर करण्यासाठी घराच्या मंदिरात अलसीच्या तेलाचा दिवा लावावा. याशिवाय शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनि ग्रहापासून मुक्तता मिळते.
– जर आपण आर्थिक अडचणीत असाल तर देवी लक्ष्मीसमोर सात दिवे लावा. यामुळे आपले सर्व त्रास दूर होईल. देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दोन दिवे लावावेत. उत्पन्न वाढवण्यासाठी बुधवारी गणेशासमोर तीनमुखी तुपाचा दिवा लावा. (Social News)
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
